चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) ; सोहेल मनियार
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला फुलांचा हार अर्पण करून जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पाहुनी शौर्य तुझे तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. शंभुराजे ग्रुपचे दत्ताभाऊ वाडेकर, माजी सभापती प्रवीण कोकाटे, डॉ. मारुती ससे, विश्वसागर कोकाटे आदींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
अखिल भारतीय छावा संघटना व शंभूराजे ग्रुप यांच्या वतीने आयोजन करण्यात आले.
शंभुराजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ वाडेकर,पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे , सेवा सोसायटी चेअरमन महादेव खडके , उपसरपंच महादजी कोकाटे , सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मारुती ससे , माजी चेअरमन दिलीप भाऊ पवार , ग्रामपंचायत सदस्य विश्वसागर कोकाटे, पवार सर, बाबासाहेब परकाळे, महादेव खडके, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे, प्रणोत औटी, देविदास आगलावे, निखिल पवार ,चंद्रकांत पवणे यांसह सामजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




