Monday, September 19, 2022

विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

लोकमन (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर शहरातील सक्कर चौक  येथे मोफत हाडाची ठिसूळता तपासणी शिबिर घेण्यात आले.


  विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ अखिल धानोरकर व डॉ महेश वीर यांच्या शुभहस्ते व नगर पंचायत समिती सभापती सौ सुरेखा ताई संदिप गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.


 या प्रसंगी रुग्णांना  हाडाच्या ठिसूळपणा बददल उपचार व मार्गदर्शन तसेच मान वा पाठदुखी कंबरदुखी समस्या गुडघे दुखी सांधेदुखी संधीवात या समस्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.


 तसेच पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने करण्यात येईल असे डॉ अखिल धानोरकर व डॉ महेश वीर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले.


या प्रसंगी युवा नेते संदिप गुंड डॉ रविराज गवळी  डॉ निलो फर धानोरकर डॉ सुप्रिया वीर मा सरपंच आदिनाथ काळे समाजसेवक शरद गांगर्डे अदि उपस्थित होते.



Sunday, September 18, 2022

राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान

 

मुंबई (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले.


यामध्ये सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती.



त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.


दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी  19 सप्टेंबर रोजी होणार आहे.




Saturday, September 17, 2022

दिव्यांग मुलांच्या कला गुणांना वाव देण्याची विशेष गरज - गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कौडा येथील ६ व्या इयत्तेत शिकणारी दिव्यांग विद्यार्थिनी श्रद्धा संतोष दळवी  हिने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये समावेशित सहभाग घेऊन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

याबद्दल तिचे विशेष कौतुक करताना नगर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी  दिव्यांग मुलांना इतर सर्व सामान्य मुलांप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून  घेऊन  त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याची विशेष गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .


 कु . श्रद्धा हिला  गौरवचिन्ह देऊन प्रोत्साहन मिळावे यासाठी चित्रकलेचा संपूर्ण संच भेट देण्यात आला . 


तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कौडा  येथील मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांचेसह विशेष शिक्षक लता बोरुडे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले


याप्रसंगी विस्तारअधिकारी रवींद्र कापरे ,रामनाथ कराड ,चंद्रकांत सोनार ,निर्मला साठे , चास केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,वर्गशिक्षक   राजेंद्र खडके , विशेषतज्ञ सुधीर लांडगे ,अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांचेसह सर्व विषयतज्ञ व विशेष शिक्षक उपस्थित होते .


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षक लता बोरुडे यांनी केले तर आभार  विशेषतज्ञ  सुधीर लांडगे यांनी मानले.



Friday, September 9, 2022

जुगार अड्ड्यावर छापा ; सहा जण ताब्यात ; 1 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ,06 जण ताब्यांत,1लाख 76 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

लोकमन महाराष्ट्र न्यूज : (प्रतिनिधी)


चिचोंडी पाटील ता. नगर येथे पेट्रोलिंग दरम्यान नगर तालुका पो.ठाणे चे स पो नि राजेंद्र सानप यांना डाक बंगला येथे जुगार चालू असल्याबाबत माहिती मिळाली .


त्यावरून छापा टाकला असता 06 आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडून जुगाराचे साहित्य,5 मोबाईल, 06 मोटारसायकल व रोख रक्कम असा 1 लाख 76 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदर प्रकरणी 1 .गिरीश महादेव कोकाटे 2.संजय रामराव शिंदे 3.गणेश सर्जेराव वाडेकर 4.नामदेव पांडुरंग खराडे,5.तात्या रामराव पवार,06.सुभाष बापूराव दानवे 07. दिगंबर पांढरे 08.रवी पवार यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाव्दारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नगर तालुका पो ठाणे स सुरू आहे.


सदरची कारवाई सपोनि राजेंद्र सानप,Asi कैलास इथापे,HC धर्मराज पालवे, रावसाहेब  खेडकर,PN रमेश शिंदे, PC निलेश खिळे यांनी केलेली आहे.