Friday, November 25, 2022

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज


➣वीज सवलत बंद, दिसू लागले 'साईड इफेक्ट'; 10 उद्योगांनी राज्यातून गाशा गुंडाळला, 36 कंपन्या बंद

➣गुजरातमधील सिंहाची जोडी बोरिवलीच्या उद्यानात तर इथले वाघ जाणार गुजरातला.



➣आता खुद्द मंत्री गुलाबराव पाटीलच म्हणाले, आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत...

➣छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र, बोम्मईचं जतबद्दल वक्तव्य भाजपाची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा घणाघात 

➣अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

➣पंढरपुरात विकास आराखड्यावरून वातावरण तापलं! आषाढी एकादशीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागेल, रामकृष्ण महाराज वीर यांचा इशारा  



➣ओला दुष्काळासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन, उद्या राज्यपालांना निवेदन देणार  15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांचा इशाराा





Thursday, November 17, 2022

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी महिलेला लाच घेताना 'एसीबी ' ने रंगेहात पकडले.

 


अहमदनगर-प्रतिनिधी


कोरोनात निधन झालेल्या पत्नीच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाची फाईल मंजूर करण्यासाठी प्राथमिक शिक्षकाला ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असून तिच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे श्रीरामपूर तालुक्यात एका शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.तक्रारदार यांची पत्नी मे व जुन २०२१ मध्ये कोरोनाने आजारी असलेने त्यांना उपचारासाठी नगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. तक्रारदार यांनी पत्नीचे वैद्यकीय उपचाराचे बील स्वतः भरले व त्यानंतर सदरचे बील जिल्हापरिषदेमधून मंजूर होऊन मिळणे करिता सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह श्रीरामपूर पंचायत समिती मार्फत जुलै २०२१ मध्ये प्रस्ताव दाखल केला. सदर बील मंजूर करणे करिता यातील आरोपी चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५, वरिष्ठ सहाय्यक,प्राथमिक शिक्षण विभाग, जि.प. अहमदनगर) यांनी तक्रारदार यांचे कडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.


याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्या तक्रारीचे अनुषंगाने दि.०७ नोव्हेंबर रोजी जि.प.शिक्षण विभाग येथे पंच, साक्षीदार समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेविका यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून गुरुवारी(दि. १७) आरोपी लोकसेविका यांचेविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाअसून त्यांना ताब्यात घेतले आहे.



महत्वाच्या बातम्या - घडामोडी

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज

महत्वाच्या घडामोडी 

📌 राज्यातील क आणि ड गटाच्या नोकरभरतीची स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन आणि आयबीपीएस मार्फत करण्यावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब


📌 भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी; महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा अडवण्याच्या खा. राहुल शेवाळे यांच्या मागणीवर राहुल गांधी यांचं सरकारला आव्हान



📌 श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी पाणी बिलाचा संबंध काय? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा 


📌 राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण


📌 विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ



📌 भारत- न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून रंगणार टी-20 मालिकेचा थरार; कधी, कुठे रंगणार


📌 शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचे आवाहन





महविकास आघाडी चे 22 नोव्हेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

 


अहमदनगर प्रतिनिधी - सोहेल मनियार


अतिवृष्टीमुळे जुन ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचे वीजबिल माफ करावे व .अती पावसामुळे हवाल दिलं झालेल्या,शेतकर्यांचे महावितरण ज्या प्रकारे शेतीची वीज खंडीत करीत आहे.


त्या साठी आज महविकास आघाडीच्या वतीने, MSEB अहमदनगर यांना निवेदन दिले आहे ,, येणाऱ्या  22 तारखेला MSEB अहमदनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.


शिवसेना जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे सर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेस चे नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डीले, शिवसेनेचे नगर तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, श्रीगोंदा नगर विधानसभा अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.



Monday, November 14, 2022

📌 दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

लोकमन महाराष्ट्र न्यूज -


➣लई भारी पुणे पोलीस! सीसीटीव्ही फुटेज, पाच पोलीस पथकं अन् 48 तास तपास; मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणात 7 जणांना अटक  

➣मुंबईत गोवरचे 740 संशयित रुग्ण, 50 बालकं कस्तुरबा रुग्णालयात


➣राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त 

➣होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल   

➣नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाकडून सात प्राध्यापकांना ब्लॅकमेल? कुलगुरुंसह राज्यपालांकडे लेखी तक्रार, प्रशासनाचं मौन   


➣कुख्यात गुंड अक्कू यादवच्या सामुहिक हत्येत नक्षलवाद्यांची प्रेरणा; नक्षलवाद्यांच्या पत्रकात धक्कादायक खुलासा  

➣पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम   

लोकमन महाराष्ट्र न्यूज