Sunday, July 23, 2023

नगर - दौंड रोडवरील आय पॅलेस हॉटेलमध्ये 28,150 रुपये किमतीचा देशी, विदेशी दारुचा साठा जप्त, नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

-----------------------------------------------

  नमुद बातमीतील हकीकत अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/आनंद घोडके, पोकॉ/कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, विक्रांत भालसिंग असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अवैध दारु विक्रीवर कारवाई करणेकामी पथक तयार करुन कारवाई करणेसाठी सुचना व मार्गदर्शन केले. 


सदर पथक हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वरिष्ठांच्या सुचना प्रमाणे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोंलीग करीत असतांना पोउनि युवराज चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की, नगर दौंड रोडवर आरणगांव शिवारात आय पॅलेस येथे एक इसम अवैध विदेशी व देशी दारुची विक्री करीत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी बातमी मिळाल्याने सदर पथक हे नगर दौंड रोडवरील आय पॅलेस येथे जावून चौकशी केली असता तेथे एक इसम विदेशी दारुची विक्री करताना दिसला सदर पथकाची व पंचाची खात्री पटताच सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाव  विचारले असता त्याने त्याचे नाव सागर मच्छिद्र कोठुळे रा. भूषणनगर केडगाव, अहमदनगर असे असलेचे सांगितले सदर इसम बसलेल्या ठिकाणची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये एकुण 28,150/- रुपये किमतीचा विदेशी व देशी दारुचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येवून सदर इसमाविरुध्द पोना/आनंद घोडके यांनी गुरनं 587/23 मुपोऍ़ 65(ई) प्रामणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले साो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/आनंद घोडके, पोकॉ/कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, विक्रांत भालसिंग यांचे पथकाने केलेली आहे.



Sunday, July 16, 2023

साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस तीन तासात पकडले ; एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर
----------------------------------------
साडे तिन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणा-या आरोपीस ०३ तासात पकडले. प्रतिक ला आईकडे सुखरुप सोपवले. एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
----------------------------------------
दिनांक १६/०७/२०२३ रोजी दुपारी ०२/१५ चेतना कॉलनी येथील रहीवासी असलेल्या फिर्यादी या दुपारी १२/३० वा चे सुमारास भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले असता त्यांचे सोबत साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक हा होता फिर्यादी चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता फिर्यादी रुम पाहुन खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही त्यांनी आजु बाजुला पाहीले त्यांना मुलगा प्रतिक कोठेच मिळुन आला नाही त्यांनी आजु बाजुला विचारले की येथे लहान मुलगा पाहीला का तेंव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगीतले की आत्ताच थोडया वेळापूर्वी एक ३०-३२ वर्षाच्या एका इसम त्याला त्याचे बरोबर घेवुन गेला तेंव्हा फिर्यादी यांची खात्री झाली की माझ्या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे त्यांनी लगेच डायल ११२ यावर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने माझे संमत्ती शिवाय घेवुन गेला आहे असे सांगीतल्यावर सदर घटनेचा फोन कंट्रोल वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी मा.सपोनि सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन ताबडतोप घटना ठिकाणी जावून भेट दिली त्यांनी, तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील कर्मचारी यांनी सदर घटने बाबत तात्काळ माहिती घेतली असता त्यांना मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीत रीत्या फिरत असल्याचे माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता जेथे एक इसम हा त्याचे सोबत असलेला मुलगा पथकातील कर्मचारी यांना दिसला. लगेच फिर्यादी यांना तो दाखवला असता फिर्यादीने ओळखले कि हा त्यांचाच मुलगा प्रतिक आहे त्यावेळी त्याला घेवुन फिरणाऱ्या संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र बबन थोरात रा. शेवगाव असे असल्याचे सांगीतले त्यास मुलाबाबत अधिक विचारपुस केली असता त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आनल्यावर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु. रजि. नंबर ६२३ / २०२३ भादवी कलम ३६३ प्रमाणे दि. १६/०७/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. व आरोपीस सदर गुन्हात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे..

सदरची कामगिरी मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री. संपत भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप, सो. पोसई गायकवाड सो, पोहेकॉ/ १७७५/सांगळे, पोना/१९४८ मिसाळ,पोकॉ/ २३८४ सानप, पोकों / २६३२ देशमुख, पोकॉ/७४३ शिंदे, मपोकॉ १७०८ पठाडे व अहमदनगर दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोकॉ/२५५६ राहुल गुंड व पोशि / २४३५ नितीन शिंदे, यांचे पथकाने केलेली आहे.