Tuesday, August 16, 2022

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे -मा. बाळासाहेब हराळ

 

उद्योजक किरण कोतकर  यांचा वाढदिवस व सुभेदार संतोष चौधरी यांची नायब सुभेदार पदी बढती झाल्याबद्दल वृक्षलागवड करुन सत्कार..

लोकमन महाराष्ट्र न्यूज

तालुका प्रतिनिधी - 

आपल्या गावात खूप झाडे असावीत,वृक्षारोपण झालं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटत पण त्याची अंमलबजावणी खूप कमी लोक करतात.प्रत्येक वर्षी पावसाळा आला की वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो पण त्यातले किती झाड जगतात?मग झाडही लावली पाहिजे अन ती जगली पण पाहिजे म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी १५ आॅगस्ट रोजी गुंडेगाव येथील धावडेवाडी युवा प्रतिष्ठानच्या तरुणांनी गावातील यशस्वी उद्योजक किरण कोतकर,आयुष धावडे यांचा वाढदिवस व नायब सुभेदार पदी बढती झाल्याबद्दल संतोष चौधरी यांचा सत्कार करुन वृक्षलागवड उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवनाथ धावडे यांनी झाडे उपलब्ध करून दिली.


  वाढदिवसाच्या व वृक्षलागवड उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना मा.अर्थ व बांधकाम सभापती बाळासाहेब हराळ म्हणाले प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मिळालेली भेट प्रत्येक माणसासाठी खूप अभूतपूर्व असते.तो त्या वस्तूला खूप जपतो.मग आपण एक झाड जर त्याला या दिवशी भेट म्हणून दिलं तर त्या झाडाला ती व्यक्ती आपल्या जीवापाड जपेल आणि ते झाड हमखास जगणार.अशा प्रकारचा संकल्प करून हजारो झाडें लावण्याचं काम जर प्रत्येक गावातील तरुणांनी केले तर भविष्यात देश सुजलाम सुफलाम होऊन पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.


आज धावडेवाडी येथे वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या संकल्पनेतून वृक्षलागवड उपक्रमास अनुसरून "वाढदिवस तुमचा झाड आमचे " याप्रमाणे वाढदिवस साजरा व्हावेत असे ते म्हणाले यावेळी यशस्वी उद्योजक किरण कोतकर,धावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांमध्ये मा.सरपंच संजयकुमार कोतकर,मा.उपसरपंच सुनील भापकर, सोसायटी चेअरमन ॲड.चंद्रकांत निकम,संदीप भापकर,व्हा.चेअरमन शिवनाथ कोतकर,युवा उद्योजक किरण कोतकर, युवा उद्योजक रावसाहेब कोतकर,


सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब जावळे, विकास शिर्के,दिलीप धावडे,संतोष किसन चौधरी (नायब सुभेदार), दादासाहेब किसन चौधरी मेजर,बाबासाहेब रामचंद्र धावडे (ASI),अंबादास धावडे, मारुती धावडे (मा. सचिव वन समिती), राजेंद्र धावडे (मा.व्हा चेअरमन) रघुनाथ धावडे.मा.अध्यक्ष वन समिती स्व.परसराम(तात्या) धावडे फाउंडेशन.धावडेवाडी युवा प्रतिष्ठान चे सर्व सभासद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.



Friday, August 12, 2022

"हर घर तिरंगा" उपक्रमाच्या प्रसारासाठी प्रभात फेरीसह अनेक उपक्रमांचे आयोजन

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज

तालुका प्रतिनिधी : (दादासाहेब आगळे)


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासनाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट राबवण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी गुरुवार दिनांक ११ आॅगस्ट २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती.


तिरंगा हमारी शान है ,भारत का अभिमान है ! भारत माता की जय ! अश्या अनेक घोषणा देत विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. काही विद्यार्थी महात्मा गांधी, माता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा वेशभूषेत आले होते. हातात देशभक्तीची घोषवाक्ये असणारे फलक,तिरंगी झेंडे घेवून निघालेल्या या विद्यार्थ्यांच्या फेरीने गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब गायकवाड,परशुराम साबळे,मगर सर,वाळके सर,भोईटे सर,खडके मॅडम,पारेकर मॅडम,जाधव मॅडम,लोखंडे,अनिल कोतकर,भापकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,नागरिक फेरीत सहभागी झाले होते.


यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, पत्रकार संजय भापकर यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी संपूर्ण आठवडा हा 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या प्रसारार्थ शाळेत चित्रकला, रांगोळी, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात आले असून सोशल मीडियावर त्याला प्रसिद्धीही देण्यात आलेली आहे.


तसेच याविषयी अधिक लोकजागृती करण्याच्या उद्देशाने गावातील चौकात सभांचेही आयोजन करण्यात आलेले आहे.उपस्थितांमध्ये संतोष सकट,पत्रकार दादासाहेब आगळे,माजी सैनिक संघटना सदस्य राहुल चौधरी, कारभारी आगळे, शामराव कासार, अब्बास शेख,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,गावातील नागरिक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहाय्य केले असून सर्व उपक्रमांना पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.



Thursday, August 11, 2022

वामन गंगाराम कोकाटे यांचे निधन

 

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी, रयत शिक्षण संस्था प्रवरानगर व कोल्हार संस्थे मधील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कै.वामन गंगाधर कोकाटे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दि.६.८.२०२२ रोजी रात्री २.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी पारूबाई वामन कोकाटे आणि २ मुले प्रदीप वामन कोकाटे (सर) व  प्रशांत वामन कोकाटे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  त्यांचा अंत्यविधी शनिवार दि. ६/८/२०२२ रोजी  सकाळी १० वाजता चिचोंडी पाटील अमरधाम येथे करण्यात आला. त्यांच्या निधनाने कोकाटे परिवार व चिचोंडी पाटील गावावर शोककळा पसरली. निधनामुळे प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.




ठाकरे - शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 22 ऑगस्टला

 

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

महाराष्ट्रातील ठाकरे - शिंदे सत्तासंघर्षाविषयीची मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयातील सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलली आहे.


ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाविषयीची सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी तब्बल 10 दिवस लांबणीवर पडली आहे. मात्र ही सुनावणी लांबणीवर का पडली? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


दरम्यान, राज्यातील ठाकरे - शिंदे सत्तासंघर्षावर आधी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर 12 ऑगस्टला ही सुनावणी पार पडणार होती.


मात्र पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडली असून आता 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.




Wednesday, August 10, 2022

राज्य सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार मिळणार

 


मुंबई  (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली. तर दुसरा निर्णय मुंबई मेट्रो संदर्भात घेण्यात आला.


दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. राज्यात आत्तापर्यंत तब्बल 15 लाख हेक्टर शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे.




Wednesday, August 3, 2022

मंदीरात रक्ताचा अभिषेक करून आत्महत्येचा प्रयत्न

 

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील बाळू तारू राठोड हा व्यक्ती लमाण तांडा येथील रहिवाशी आहे अंभोरा येथील श्रीआंबेश्वर मंदिरात दारूच्या नशेत स्वतःच्या हाताची नस कापून रक्ताचा अभिषेक करण्याचा प्रयत्न त्याने केला. 

मात्र हा प्रकार काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने राजू आटोळे.सचिन आमले, बाळासाहेब रक्ताते लखन राठोड, संदीप राठोड यांनी ऍम्ब्युलन्स बोलावून त्याला नगर सिविल येथे दाखल केले.




श्रीगोंदा येथील शनि मारुती मित्र मंडळ शनिचौक ची कार्यकारणी जाहिर

अहमदनगर (सोहेल मनियार वार्ताहर): 

श्रीगोंदा शहरातील शनि मारुती मित्र मंडळ, शनिचौक च्या अध्यक्षपदी सागर वांगणे, उपाध्यक्षपदी सोमनाथ जगताप, खजिनदार पदी पत्रकार सोहेल शेख तर कार्याध्यक्ष पदी प्रसाद धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


मानाची दहीहंडी व गणेशत्सव २०२२ करीता सालाबाद प्रमाणे शनि मारुती मित्र मंडळाच्या नुतन कार्यकारणी ची निवड करण्यात येते त्या अनुषंगाने रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी शनि मंदीर, श्रीगोंदा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दहीहंडी-गणेशउत्सवा सह वर्षाभरात विविध कार्यक्रमा बाबत चर्चा करण्यात आली. त्या नंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष व नुतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


यावेळी शनि देवालय ट्रस्ट अध्यक्ष राणा खेतमाळीस, अजीजभाई शेख, आनंद खेतमाळीस, प्रवीण काळे,चंद्रकांत धोत्रे,तौसिफ ताडे, मेहबुब पठाण, राजेश काळे, राहुल काळे, गफ्फार पठाण, प्रतिक मडके, सुरज खेतमाळीस,आदित्य मते, प्रवीण गोंधळी, कृष्णा सुर्यवंशी, ऋतिक जाधव, अनिकेत खेतमाळीस, शुभम गोसावी, ओंकार काळे, तेजस भागवत आदि सदस्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


शनि मारुती मित्र मंडळाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.