Wednesday, February 22, 2023

भोयरे पठार येथुन घरफोडी करून चोरीस गेलेले सुमारे दिड लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन फिर्यादीस परत नगर तालुका पोलिसांची कामगिरी.

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी अविनाश बाबासाहेब साठे राहणार - भोयरे पठार ता नगर हे त्यांच्या कुटुंबीयांसह समारंभास गेले असताना घरास कुलूप लावून गेले होते ,चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन चोरून नेले होते, सदर बाबत नगर तालुका पोलिस ठाणे गु र न 75/2021भा द वी कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचे कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला होता.


सदर चे दिड लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन आज दिनांक 22/02/23 रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादी अविनाश बाबासाहेब साठे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले,अविनाश साठे यांनी नगर तालुका पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

सदर ची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि राजेंद्र सानप , PC संभाजी बोराडे, PC जयदत्त बांगर यांनी केलेली आहे.



Tuesday, February 14, 2023

अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांची बदली ; अहमदनगर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी पदी श्री.सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज

अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली
अहमदनगर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी पदी श्री.सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती



Friday, February 10, 2023

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

 


💥 लोकमन महाराष्ट्र न्यूज

हेडलाईन्स ताज्या बातम्या

📌कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदेंनी फटकारलं; म्हणाल्या, ही त्यांची पहिलीच टर्म, पोरकटपणा असतोच!  

📌चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम; माघार नाहीच, म्हणाले..  

📌आता प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', राज्यात 500 दवाखाने सुरु होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती   

📌मुंबईहून साईनगर शिर्डी आणि सोलापूरसाठी दोन स्वतंत्र 'वंदे भारत' ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील.. 


📌स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच? सुप्रीम कोर्टाला सुनावणीला वेळ मिळेना, आता पुढची तारीख 14 मार्च  

📌'आम्हाला तुमचा अभिमान आहे', तुर्कीमध्ये NDRF ने वाचवला सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून एनडीआरएफच्या कामगिरीचं कौतुक 

📌राजधानीत बळीराजाचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर 'किसान महापंचायत'  

📌कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द