Wednesday, June 28, 2023

"धाकटी पंढरी" नांदुर विठ्ठलाचे येथे आषाढी एकादशीला यात्रोत्सव

 

चिचोंडी पाटील  प्रतिनिधी : सोहेल मनियार

२९ /६/२०२३ रोजी अहमदनगर बीड जिल्ह्यातील भाविकांना स्वयंभू विठ्ठल दर्शनासाठी गर्भगिरी रांगेतील नगर बीड सरहद्द रस्त्यावरील श्रीक्षेत्र नांदूर विठ्ठलाचे येथे दरवर्षी आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते पंचक्रोशीतील अनेक गावातून पायी दिंड्या घेऊन दर्शनासाठी भाविक येतात विठ्ठल मंदिर विश्वस्त व ग्रामपंचायत यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी १) नांदूर फाटा ते विठ्ठल मंदिर रस्ता दुरुस्ती केली आहे २) पार्किंग साठी व्यवस्था करण्यात आलेली आहे ३) मोफत फराळ पाणी व्यवस्था केली आहे ४) बाजारहाटासाठी व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुविधा पान फुले विक्रेत्याना विक्री करण्यासाठी सुविधा ५) मुलांना खेळण्यासाठी सुविधा ६) दर्शन बारी इत्यादी सोई करण्यात आलेल्या आहेत.




Tuesday, June 20, 2023

आषाढी वारी निमित्ताने पायी दिंडीचे पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला प्रस्थान

फोटो कॅप्शन:-  चिचोंडी पाटील तालुका नगर येथील वारकरी दिंडीने निघाले पांडुरंगाच्या भेटीला..

चिचोंडी पाटील : पत्रकार सोहेल मनियार 


श्री संत सदगुरू गणेशनाथ  महाराज यांच्या कृपेने श्री रामतीर्थ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याचे अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथुन श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. स्वामींच्या आशीर्वादाने गावात दिंडी सुरु झाली यंदा दिंडीचे दुसरे वर्ष आहे. श्री सद्गुरू गणेश नाथ बाबा मंदिरात अभिषेक करून दिंडीची सुरुवात करण्यात आली.


यावेळी विविध मंडळे,प्रतिष्ठान व चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे सभापती,सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, यांच्यातर्फे महाराजांचे व वारकऱ्यांचे,दिंडीचे,उस्फुर्त असे स्वागत करण्यात आले. 


चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी दारोदारी रांगोळ्या काढून,फुलांची उधळण करत,फटाक्यांची आतषबाजी, बँड पथक, इंग्लिश स्कूलचे झांज पथक, ढोल ताशा, टाळ मृदंग यांच्यासह पालखी व रथाची, वारकऱ्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
 

सर्व वारकऱ्यांचे व महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी दिंडी सोहळ्यासाठी आर्थिक रूपाने मदत केली.ह.भ.प. स्वामी रामानंद पुरीजी महाराज, ह. भ.प. संजय महाराज घोडके व आयोजकांनी दिंडीचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.


 याप्रसंगी गावातील बहुसंख्य वारकरी व ग्रामस्थ या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले होते. चिचोंडी पाटील गाव व गावातील रस्ते सडा- रांगोळ्या, भगव्या पताका व वारकऱ्यांच्या घोषणेने दुमदुमून गेले होते.




Friday, June 2, 2023

अमली पदार्थाची अवैधरीत्या विक्री करणारा आरोपी ताब्यात ; 327000 रुपयांचा मुद्देमाल जप्त; एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


दिनांक 02/06/2023 रोजी सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे केसाराम हेमाराम जाट हा विळद बायपास रोड हॉटेल चौधरी पॅलेस राजस्थानी धाबा येथे अवैष्य रित्या चोरुन अच्या बोंडापासून पावडर तयार करुन त्याची चोरुन विक्री करत आहे आत्ता गेल्यास मिळून येईल. अशी बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता त्या ठिकाणी 2,87,000 रुपयाचे 14 किलो वजनाचे अफुची बोंडे व त्या पासून तयार केलेली पावडर मिळून आली. हॉटेल चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव केसाराम हेमाराम जाट वय 34 वर्ष रा. चौधरी हॉटेल पॅलेस विळद मुळ रा. टापरा ता.पस्पदरा जि. बाडमेर राजस्थान असे सांगीतले. त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरजि नंबर 494/2023 एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चेकलम 18 (ब) प्रमाणे दाखल केला आहे.


तसेच सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना दुसरी गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे देविदास रंगनाथ टिमकरे हा इमामपुर येथे चोरुन गांजाची विक्री करत आहे आत्ता गेल्यास मिळून येईल अशी बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकला असता त्या ठिकाणी 40,000/- रु किमतीचा 2 किलो 162 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा मिळुन आला सदर इसमास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देविदास रंगनाथ टिमकरे वय 66 वर्ष रा. इमामपुर ता. जि. अहमदनगर असे सांगीतले त्यास ताब्यात घेवून घेवून त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनगु रजि नंबर 495/2023 एन. डी. पी. एस अॅक्ट 1985 चेकलम 20 (ब) प्रमाणे दाखल केला आहे. अशा प्रकारे वरील दोन ठिकाणी छापा टाकुन 3.27,000 /- रु किमतीचा अमली पदार्थ अफु व गांजा जप्त करण्यात आला आहे.


सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खेरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपत भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई चांगदेव हंडाळ, पोसई योगेश चाहेर, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोहेको/नंदकिशोर सांगळे, पोना/ चांगदेव आंधळे, पोना/संदीप आव्हाड, पोना राहुल शिंदे, पोकों/ किशोर जाधव, पोकों/सुरज देशमुख, पोकी भगवान बंजारी, पोकों/सचिन हरदास पोकों/सुरेश सानप यांचे पथकाने केली आहे.