फोटो कॅप्शन:- चिचोंडी पाटील तालुका नगर येथील वारकरी दिंडीने निघाले पांडुरंगाच्या भेटीला..
चिचोंडी पाटील : पत्रकार सोहेल मनियार
श्री संत सदगुरू गणेशनाथ महाराज यांच्या कृपेने श्री रामतीर्थ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याचे अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथुन श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. स्वामींच्या आशीर्वादाने गावात दिंडी सुरु झाली यंदा दिंडीचे दुसरे वर्ष आहे. श्री सद्गुरू गणेश नाथ बाबा मंदिरात अभिषेक करून दिंडीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विविध मंडळे,प्रतिष्ठान व चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे सभापती,सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, यांच्यातर्फे महाराजांचे व वारकऱ्यांचे,दिंडीचे,उस्फुर्त असे स्वागत करण्यात आले.
चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी दारोदारी रांगोळ्या काढून,फुलांची उधळण करत,फटाक्यांची आतषबाजी, बँड पथक, इंग्लिश स्कूलचे झांज पथक, ढोल ताशा, टाळ मृदंग यांच्यासह पालखी व रथाची, वारकऱ्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
सर्व वारकऱ्यांचे व महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी दिंडी सोहळ्यासाठी आर्थिक रूपाने मदत केली.ह.भ.प. स्वामी रामानंद पुरीजी महाराज, ह. भ.प. संजय महाराज घोडके व आयोजकांनी दिंडीचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.
याप्रसंगी गावातील बहुसंख्य वारकरी व ग्रामस्थ या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले होते. चिचोंडी पाटील गाव व गावातील रस्ते सडा- रांगोळ्या, भगव्या पताका व वारकऱ्यांच्या घोषणेने दुमदुमून गेले होते.
अप्रतिम फोटो व माहिती सुध्दा
ReplyDelete