नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी होऊन जल्लोष करताना महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या चिचोंडी पाटील सेवा सोसायटीच्या निवडणुकीकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणूक होऊन लगेच निकाल लागला.यात माजी सभापती इंजी.प्रवीण कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने मातब्बर विरोधकांचे पानिपत केले.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव. या गावातील सेवा संस्थेचे निकालाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या .
विजयी उमेदवार-
सर्वसाधारण जागा - महादेव खडके,डॉ.मारुती ससे, दिलीप पवार,संदीप कोकाटे,सुरेश ठोंबरे, काशिनाथ वाडेकर,बबन कोकाटे,
महिला - शोभा विठ्ठल कोकाटे, अल्का अर्जुन वाडेकर,
इतर मागास वर्ग - पंडित मुरलीधर कोकाटे
अनु. जाती - बेबी चंद्रकांत सदाफुले
विशेष मागास प्रवर्ग - अंबादास धोंडीबा फिसके
चौकट -
--
मा.सभापती प्रवीण कोकाटे



























