Wednesday, June 15, 2022

एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या शिराढोण शाखेचा शुभारंभ

 

एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या शिराढोण शाखेचा शुभारंभ करताना पदाधिकारी, कार्यकर्ते...(छाया : सोहेल मनियार)


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

तालुक्यातील शिराढोण येथे एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी च्या नवीन शाखेचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष रघुनाथ शिवराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.


त्याच्या ध्येयधोरण नियम व अटींचे अधीन राहून पार्टीचे ध्येयपूर्तीसाठी सदैव कार्यरत राहून समाजपरिवर्तनाच्या या राष्ट्रीय चळवळीमध्ये आपले संपूर्ण योगदान द्या असे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.


शुभारंभप्रसंगी कमिटी मेंबर संतोष निकम,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दीपक साहेबराव चांदणे , दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नारायण जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख संजय विष्णू साठे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोळुके, 


राहुरी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब गांगुर्डे, कार्याध्यक्ष दगडू हिरामण बर्डे, शिराढोण उपसरपंच तथा राष्ट्रवादी नगर श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष दादासाहेब दरेकर, 


शिराढोन सरपंच मच्छिंद्र थोरात, नगर तालुका अध्यक्ष अनिल मोहन बर्डे, शाखाप्रमुख अमोल बर्डे, उपशाखाप्रमुख महेश बरडे, खजिनदार विजय बर्डे,सचिव राजेंद्र माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.





No comments:

Post a Comment