चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या चिचोंडी पाटील सेवा सोसायटीच्या निवडणुकीकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणूक होऊन लगेच निकाल लागला.यात माजी सभापती इंजी.प्रवीण कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने मातब्बर विरोधकांचे पानिपत केले.
यात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी आमदार राहुल जगताप गटाचा दारुण पराभव झाला.नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव. या गावातील सेवा संस्थेचे निकालाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या .
यात शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व युवा नेते प्रवीण कोकाटे,मच्छिंद्र खडके, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे ,माजी उपसरपंच शरद पवार ,शिवसेनेचे डॉ. ययाती फिस्के, माजी सरपंच शंकर पवार यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत एकत्र येऊन आव्हान उभे केले होते.
विरोधात किसान क्रांति पॅनेलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे, सरपंच तथा तालुक्याचे भाजपचे नेते मनोज कोकाटे,सुनील कोकाटे, प्रभाकर कोकाटे,अमोल कोकाटे,भाजप नेते बबन शेळके यांनी आघाडी तयार केली.
यामध्ये तालुक्यातील भाजप माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,राहुल जगताप यांना शिवसेना व समविचारी आघाडीने आव्हान उभे केले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली.तालुक्यात ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली होती.मागील चेअरमन कर्डिले समर्थक बाजीराव हजारे गटाचा होता.
शेतकरी विकास पॅनलचे बारा उमेदवार मोठ्या मताधिक्काने विजयी झाले. एका उमेदवाराचा निसटता पराभव झाला.
विजयी उमेदवार-
सर्वसाधारण जागा - महादेव खडके,डॉ.मारुती ससे, दिलीप पवार,संदीप कोकाटे,सुरेश ठोंबरे, काशिनाथ वाडेकर,बबन कोकाटे,
महिला - शोभा विठ्ठल कोकाटे, अल्का अर्जुन वाडेकर,
इतर मागास वर्ग - पंडित मुरलीधर कोकाटे
अनु. जाती - बेबी चंद्रकांत सदाफुले
विशेष मागास प्रवर्ग - अंबादास धोंडीबा फिसके
महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे १२ उमेदवार निवडून आल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
चौकट -
सर्व मतदारांनी महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही खूप ऋणी आहोत.सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत.--
मा.सभापती प्रवीण कोकाटे
No comments:
Post a Comment