Saturday, February 26, 2022

40 लक्ष रु.निधीच्या विविध विकास कामांचा शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे सर यांच्या हस्ते शुभारंभ

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे 40 लक्ष रू.निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, संपतराव म्हस्के,बाबासाहेब गुंजाळ, प्रविण कोकाटे आदी...(छाया: सोहेल मनियार)


लोकमन(प्रतिनिधी):-

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे पंचायत समितीचे  मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे 40 लक्ष रु.कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ व जेष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर हे उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर यांनी मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या कामाचे कौतुक करताना पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या पदाला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचे काम केल्याचे आवर्जून सांगितले.

चिचोंडी पाटील गणामध्ये शासकीय योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याचे संपतराव म्हस्के यांनी संगितले.यावेळी मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ, शिक्षकनेते आबासाहेब कोकाटे सर, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन डॉ.ययाती फिसके व इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केले.


मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या चिचोंडी पाटील येथील पांढरी वस्ती व गावठाण येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,एल.ई.डी दिवे बसविणे,बंदिस्त गटार करणे,पाण्याची पाईपलाईन करणे,स्मशानभूमी परिसरात पाण्याची टाकी करणे अशा एकत्रित जवळपास 40 लक्ष रुपये किमतीच्या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी मा.उपसभापती दत्तात्रय हजारे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मा.चेअरमन महादेव खडके,मा.उपसरपंच शरद पवार,डॉ.मारुती ससे,व्हा.चेअरमन काशिनाथ बेल्हेकर, पंडितराव कोकाटे,लोकमान्य पतसंस्था चेअरमन अरुण दवने,शिवसेना नेते अजय कांकरीया,साहेबराव पाचारणे पाटील,रामदास कोकाटे,ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे,ग्रामपंचायत सदस्या सौ.रिता प्रकाश कांबळे,सौ.यशोदा विश्वसागर कोकाटे,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तू धुळे,महादजी कोकाटे,संदीप काळे,दिपक हजारे,बाळासाहेब बेल्हेकर,पै.राजू कोकाटे,नानाभाऊ कोंडीबा कोकाटे,रघुनाथ दळवी साहेब,मेजर भगवान थोरात,विजय कोकाटे,राजेंद्र कोकाटे,संजय कोकाटे,सुरेश तनपुरे,चंद्रकांत पवने,बबन कोकाटे,रघुनाथ कोकाटे,रमेश कुलथे,भाऊ गायवळ,अमर शेख,कृष्णा पाचारणे,लहानू तनपुरे,राजू तनपुरे,अंबादास कोकाटे,संतोष कोकाटे,संतोष विघे,नंदू गायकवाड,युवासेनेचे प्रशांत कांबळे,शेलेश देवकर,शशिकांत आगलावे,भाऊ सरोदे,रोहित काळे,बाबासाहेब सरोदे,शरद बळे,दिपक कांबळे,सुनिल कोकाटे,रमेश पवार आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ठोंबरे यांनी केले तर आभार मा.उपसरपंच डॉ.मारुती ससे यांनी मानले.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967





Friday, February 25, 2022

18 हजार 629 विद्यार्थी देणार उद्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

 

अहमदनगर : (प्रतिनिधी)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब, संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 शनिवार (दि.26) जिल्ह्यातील 60 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.1 हजार 747 अधिकारी-कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.


या परिक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरात 60 उपकेंद्रावर एकूण 18 हजार 629 उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. 


परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी 15, भरारी पथक प्रमुख 3, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख 60 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील 1669 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर सकाळी 9.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे.


उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य इ. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.


परीक्षार्थी उमेदवार यांनी मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य आहे. मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर इ. परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. 


या सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारास या परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 


तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे. अशी माहिती निश्चित यांनी दिली.


लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

Thursday, February 24, 2022

बचत गटांना आठ कोटी रुपयांचे कर्ज वाटप-सभापती गुंड



अहमदनगर(प्रतिनिधी):-


बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोते मोठे उद्योग सुरू करून प्रपंचाला मोठा हातभार लावला. आता पर्यत बचत गटाना आठ कोटी रूपयाचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नगर व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप मेळावा देहरे येथे आयोजीत करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परीषद सदस्य राणी लंके, सरपंच हिराबाई करांडे, पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, व्ही. डि. काळे, सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक मयुर जामगावकर, सोमनाथ जगताप, संदिप गुंड, विश्वास जाधव उपस्थित होते. 


या कार्यक्रमात देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव येथील ८० बचत गटाना दिड कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. आता पर्यंत वाटप झालेल्या कर्ज प्रकरणात एकही खाते थकीत नाही. महिला काळजी पूर्वक कर्जाचे हप्ते फेडत आहे. पाहिले कर्ज वेळेत फेडले तर दुसरे कर्ज ची रक्कम वाढवून मिळेल असे  सेंट्रल बँकेचे यांनी सांगीतले.


यावेळी गाडे म्हणाले बचत गटाचा फायदा महिलांनी करुन घेतला पाहिजे. या माध्यमातून छोटे मोठे उदयोग सुरू होतील. बचत गटानी एकत्र येऊन आपण तयार केलेल्या मालाची किंमत ठरवावी. पवार यांनी सांगीतले बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विकी करण्यासाठी पंचायत समिती येथे व्यवस्था केली आहे. 

या बचत गटाच्या मेळाव्यात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन पंढरीनाथ ठाणगे ज्ञाने गव्हाणे, बाबा सरोदे, वैभव धनवटे, सोनाली शिंदे,ग्रामविकास अधिकारी यांनी केले.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

१२ वी परीक्षा वेळापत्रकात बदल! प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याने निर्णय



लोकमन(प्रतिनिधी):-


राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने दाखल होत टेम्पोला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला.


राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

१२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, "यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल.



परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. 


"जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदीसह इतर २५ भाषांच्या प्रश्नपत्रिका":-

"जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदी आणि इतर २५ प्रकारच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. रशियन, फ्रेंच, जापनीज, उर्दू, तेलगू, मल्याळम या विषयांचाही यात समावेश आहे. त्या प्रश्नपत्रिका ओपन झाल्या आहेत. त्यामुळे हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला तरी अन्य ८ विभागांनाही या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागत आहेत, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

भारतीय दूतावासाने युक्रेनमधील नागरिकांसाठी जारी केला हेल्पलाइन नंबर



लोकमन(प्रतिनिधी):-

रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्धाला सुरुवात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकले असून, अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारत सरकारने 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. 

तत्पूर्वी भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युक्रेनला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला अर्ध्यावाटेतून माघारी परतले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अजूनही अंदाजे 20 हजाराहून अधिक भारतीय अडकून पडले आहेत.

दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव तत्काळ कमी करण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती न बदलल्यास हे संकट मोठ्या संकटात बदलू शकते असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये आणि समस्या शांततेने सोडवाव्यात असे आवाहन केले आहे.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

रुद्रा प्रतिष्ठानच्या देहरे शाखेचे नुतनीकरण



रूद्रा प्रतिष्ठानच्या देहरे शाखेचा नूतनीकरण करताना पदाधिकारी, कार्यकर्ते...(छाया: सोहेल मनियार)


लोकमन(प्रतिनिधी):-


देहरे ता.नगर येथे रूद्रा प्रतिष्ठान शाखेचा नूतनीकरण उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आमदार निलेशजी लंके यांनी कार्यक्रमाला धावती भेट दिली. 


जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. प्रताप पाटील शेळके व पारनेर नगरपंचायत चे नगराध्यक्ष मा. विजुभाऊ औटी आणि   शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य काळे पाटील यांच्या हस्ते शाखेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी रुद्रा प्रतिष्ठान देहरेचे अध्यक्ष शुभम भाऊ पुंड व स्वप्निल (सनी) लांडगे,बबन करंडे, महेश काळे पाटील,नितीन भांबळ, राजेंद्र लांडगे ,ज्ञानेश्वर लांडगे, दिलीप करंडे, किरण लांडगे,अनिल चोर, साजिद शेख,रमेश काळे, अजित काळे, यशवंतराव काळे, डॉ अनिल लांडगे, भाऊ अभंग,सोगराज जंगम,भाऊ पुंड, योगश पिंपळे  बापू चोर,अमोल काळे, 


सुहास गोपाळे, प्रणाम काळे, महेश पुंड मुन्ना लांडगे , प्रतिक भागवत शुभम बंगे निखिल पुंड  भरत लांडगे,अकाश काळे,प्रकाश बराट, जुनेद खान, निलेश लंके प्रतिष्ठान व संभाजीराजे ग्रुप चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,देहरे सोसायटीचे आजी माजी चेअरमन,व्हा. चेअरमन व मित्रपरिवार उपस्थित होते.


लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967



दोन चंदन तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 19 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

दोन चंदन तस्करांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.(छाया : सोहेल मनियार)

अहमदनगर :(प्रतिनिधी)


नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील 2 चंदन तस्करांना कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने नगर शहरात पकडले.


या कारवाईत त्यांच्या ताब्यातून 11 लाख 84 हजार रुपये किंमतीचे 370 किलो सुगंधी चंदनाचे लाकडासह सुमारे 18 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


चंदनाचे वृक्ष तोडण्यास बंदी असतानाही नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सुभाष भीमराज दिलवाले (वय 47) आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30) हे दोन आरोपी इनोव्हा कारमधून नगर शहरमार्गे सुगंधी चंदनाच्या लाकडाची वाहतूक करणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. संपतराव शिंदे यांना मिळाली होती. 


या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी (दि.24) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील पो.ना. योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, सागर पालवे, राजू शेख, अभय कदम, दीपक रोहोकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, बाबासाहेब तागड, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाला सापळा लावण्याचे आदेश दिले.


त्यानुसार पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीसकडे जाणार्‍या रोडवर सैनिक लॉनच्या गेटसमोर पहाटे 1 वाजेपासून सापळा लावला होता. पहाटे 3.30 च्या सुमारास चांदणी चौकाकडून 1 इनोव्हा गाडी येताना या पथकाला दिसली. 


सदर गाडी चालकाला थांबविण्यास सांगितले. या गाडीत दिलवाले व सासवडे हे दोघे जण होते. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता प्लॅस्टीकच्या 17 गोण्यांमध्ये अंदाजे 370 किलो वजनाचे चंदनाचे लाकूड आढळून आले. 


या पथकाने चंदनाच्या लाकडासह इनोव्हा गाडी, 1 मोबाईल, 2 हजार 890 रुपयांची रोकड असा 18 लाख 96 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांना अटक केली.


या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


पत्रकार सोहेल मनियार

लोकमन महाराष्ट्र न्यूज

9284856967