अहमदनगर(प्रतिनिधी):-
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोते मोठे उद्योग सुरू करून प्रपंचाला मोठा हातभार लावला. आता पर्यत बचत गटाना आठ कोटी रूपयाचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नगर व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप मेळावा देहरे येथे आयोजीत करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परीषद सदस्य राणी लंके, सरपंच हिराबाई करांडे, पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, व्ही. डि. काळे, सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक मयुर जामगावकर, सोमनाथ जगताप, संदिप गुंड, विश्वास जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव येथील ८० बचत गटाना दिड कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. आता पर्यंत वाटप झालेल्या कर्ज प्रकरणात एकही खाते थकीत नाही. महिला काळजी पूर्वक कर्जाचे हप्ते फेडत आहे. पाहिले कर्ज वेळेत फेडले तर दुसरे कर्ज ची रक्कम वाढवून मिळेल असे सेंट्रल बँकेचे यांनी सांगीतले.
यावेळी गाडे म्हणाले बचत गटाचा फायदा महिलांनी करुन घेतला पाहिजे. या माध्यमातून छोटे मोठे उदयोग सुरू होतील. बचत गटानी एकत्र येऊन आपण तयार केलेल्या मालाची किंमत ठरवावी. पवार यांनी सांगीतले बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विकी करण्यासाठी पंचायत समिती येथे व्यवस्था केली आहे.
या बचत गटाच्या मेळाव्यात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन पंढरीनाथ ठाणगे ज्ञाने गव्हाणे, बाबा सरोदे, वैभव धनवटे, सोनाली शिंदे,ग्रामविकास अधिकारी यांनी केले.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment