Thursday, March 5, 2026

सरपंचांना मोठा दणका, उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतींसंदर्भात दिला महत्वाचा निर्णय

लोकमन महाराष्ट्र न्युज 

अहिल्यानगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सरपंचांना पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सरपंचांना पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याचिकेमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप

या प्रकरणी विजय राहणे, सोपान आगलावे यांच्यासह इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतरही निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत. राज्यात सुमारे १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपली असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुका लगेच घेणे शक्य नसल्यामुळे शासनाने अंतरिम व्यवस्था म्हणून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला होता.

शासनाच्या आदेशांमध्ये बदल

२३ जानेवारी रोजी राज्य सरकारने आदेश काढून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर ग्राम विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला काही ठिकाणी विरोध झाला आणि त्याविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

यानंतर राज्य सरकारने २१ फेब्रुवारी रोजी आधीचा निर्णय मागे घेत नवा आदेश जारी केला. या नव्या आदेशानुसार ग्राम विस्तार अधिकाऱ्यांऐवजी संबंधित गावांच्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले.

न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वाचे आदेश दिले. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सरपंचांना पुढील आदेश येईपर्यंत आर्थिक स्वरूपाचे कोणतेही निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती न करता सध्याची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्था पूर्ववत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निकालाची व्याप्ती राज्यभर लागू होणार का?

न्यायालयाचा हा निर्णय सध्या केवळ दोन जिल्ह्यांतील प्रशासक नियुक्ती संदर्भातील याचिकेवर दिला असला तरी या निर्णयाचा प्रभाव राज्यभर पडू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असल्याने सरकार या निर्णयावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामीण भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम

दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ७५३ ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्रशासक म्हणून सरपंचांनी सूत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच न्यायालयाने आर्थिक निर्णयांवर निर्बंध घातल्यामुळे विकासकामे, निधी वितरण आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातमी व जाहिरात संपर्क 

पत्रकार सोहेल मनियार 

9284856967

Friday, October 25, 2024

अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या ; आरोपी जेरबंद ; कँडल मार्च काढून श्रद्धांजली

अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या

-------------------------------

खुनाच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद, 

-----------------------------------

 गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली.

----------------------------------------

लोकमन महाराष्ट्र न्यूज : पत्रकार सोहेल मनियार 

दिनांक 24/10/2024 रोजी फिर्यादी महेश विठ्ठल पवार, वय 40, रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर यांच्या पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करतात.फिर्यादीच्या पत्नी या अंगणवाडीमधुन घरी आल्या नाहीत म्हणुन फिर्यादी यांनी आसपास शोध घेतला परंतु त्या मिळून न आल्याने म्हणुन त्यांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले.याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 806/2024 बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घडलेल्या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मा. श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर व मा.श्री.प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्वत: घटनाठिकाणी भेट देऊन, आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा याचे अधिपत्याखालील तपास पथक तयार करण्यात आले. 

पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हेमंत थोरात व पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, शरद बुधवंत, सोमनाथ    झांबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर, चंद्रकात कुसळकर तसेच विजय ठोंबरे, हदय घोडके, मेघराज कोल्हे नेम.तपास पथक अहमदनगर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. 

 24/10/2024 रोजी तपास पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नामे सुभाष बंडू बर्डे, वय 25, रा.कुक्कडवेढे, ता.राहुरी हल्ली रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. पथकाने आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे  पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगीतली आहे. 

  ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.  

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. संपतराव भोसले साहेब, उपविभागीय  पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

चिचोडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेचा खून झाल्या प्रकरणी  गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून श्रधांजली अर्पण केली.

Friday, July 5, 2024

सलीम नदाफ याची महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात निवड ; सर्व क्षेत्रातून कौतुक

लोकमन महाराष्ट्र न्यूज : (प्रतिनिधी)

सलीम हसन नदाफ याची महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात निवड झाली आहे. त्याचं मूळ गाव सातारा बायको आणि एक छोटी मुलगी सोबत नगर येथे एमआयडीसी परिसरात राहतो. रात्री एमआयडीसी मध्ये सुरक्षारक्षक चा जॉब करून तिथेच अभ्यास करत सलीम ने हे यश मिळवले आहे.आई वडील गावाकडे शेती करतात.

सलीम हा मागील ४ वर्षांपासून नगर मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता.

सलीम ने आत्ता पर्यंत ५/६ वेळा परीक्षा दिल्या पण तिथे थोडक्यातून अपयश यायचे आत्ता त्याच वय ३१ असून हा त्याचा शेवटचा प्रयत्न होता जर यात निवड नसती झाली तर सलिम ने स्पर्धा परीक्षा मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

पण जिद्द मेहनत चिकाटी च्या जोरावर अखेर त्यांनी यशाला गवसणी घातलीच. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात निवड झाल्याबद्दल सलीम नदाफ याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Friday, April 5, 2024

श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव शेवाळे यांची आत्महत्या

 अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार 

आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे वय 63 वर्ष राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर यांनी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.

शेवाळे यांनी 31 मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगर मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री 8.49 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मयत शेवाळे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी दिनांक 4 रोजी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शेवाळे यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

मयत शेवाळे यांनी वडगाव गुप्ता गावात श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली होती. अल्प कालावधीतच या पतसंस्थेचा विस्तार होत नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये शाखा सुरू झाल्या मात्र काही कालावधीनंतर ही संस्था आर्थिक डबघाईला गेली आणि एक एक करत सर्व शाखा बंद पडल्या. पतसंस्थेत अनेक ठेवीदारांचे ठेवी अडकल्या होत्या त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर शेवाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शेवाळे यांना पोलिसांनी अटकही केली ते अनेक दिवस कारागृहात होते गेले काही दिवस ते जामिनावर सुटलेले होते घरी असताना 31 मार्च रोजी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Tuesday, January 30, 2024

प्रजासत्ताक दिनी सीईओ आशिष येरेकर यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान

लोकमन महाराष्ट्र न्यूज 

अहमदनगर (सोहेल मनियार)

जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा विशेष कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

     अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मुंबईत झालेल्या, टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ४२ कि.मी. अंतर ५ तासात पूर्ण करण्याची कामगिरी केली. मुंबई मॅरेथॉन ची तयारी त्यांनी एक वर्षापासून चालवली होती अहमदनगर रनर्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी रोज सकाळी सहा वाजता धावण्याचा सराव अहमदनगरच्या भुईकोट किल्ला परिसरात केला. मुंबई मॅरेथॉन मध्ये जगभरातील ५९ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. अहमदनगर मधून शंभरहून अधिक स्पर्धक मुंबईला गेले होते.            अधिकाऱ्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना नेहमी ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशावेळी सकारात्मक राहून प्रश्नांची सोडवणूक करणे महत्त्वाचे असते यासाठी नियमित चालणे,व्यायाम करणे,योगासने करणे यामुळे शरीराची कार्यक्षमता ही वाढते आणि मनाला ऊर्जाही मिळते असा संदेश या टाटा मॅरेथॉनच्या निमित्ताने जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी व आपल्या शरीराचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना आशिष येरेकर साहेब प्रेरित करीत असतात. टाटा मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने अनेक अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सीईओ आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदी उपस्थित होते.

आपले दैनंदिन काम करून कर्तव्य बजावतानाच नियमित व्यायाम चालू ठेवून,पायी चालून इतरांनाही त्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल विखे यांनी येरेकर यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले. आशिष येरेकर यांनी अतिशय व्यस्त दिनक्रम असतानाही अनेक वर्षापासून नियमित व्यायामावर, फिजिकल फिटनेस वर भर दिलेला आहे हे विशेष.सीईओ येरेकर साहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अधिकारी,कर्मचारी शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायामाचे धडे गिरवत आहेत.

( पत्रकार सोहेल मनियार अहमदनगर )

Saturday, December 23, 2023

शासकीय कामात अडथळा आणून शिक्षकास धक्काबुक्की ; पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

लोकमन महाराष्ट्र न्युज 

अहमदनगर : सोहेल मनियार 

नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव येथे शासकीय कामात अडथळा आणून शिक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शिक्षक विजय सुदाम कडूस हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव, तूकाई मळा तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहेत. दिनांक २३.१२.२०२३ रोजी ११.३० वाजता केंद्रप्रमुख मंदा जगताप यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांची बैठक / मीटिंग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केली होती. शिक्षकांची व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक १२ वाजेच्या सुमारास सुरू झाली. सदर बैठकीत शालेय पोषण आहार अधीक्षक प्रदीप शिंदे, केंद्रप्रमुख मंदा जगताप, संजय सहादू शेलार, ईश्वर मोहन नागवडे, सुहास भास्कर बोठे, भाऊसाहेब साहेबराव जाधव, संगीता शिवाजी भुजबळ, दीपस्वी अशोक पवार,शुभांगी मारुती मोरे, मनीषा धोंडीराम भालसिंग, ज्ञानदेव गंगाराम कुसळकर, अलका वसंत क्षीरसागर, मंदा तुकाराम शिंदे, गहिनीनाथ पांडुरंग पिंपळे,विलास मोहन कदम, प्रतिभा मोहन निक्रड, जयश्री एकनाथ दिवटे, पद्मावती बबन धुमाळ असे शिक्षक व अधिकारी हजर असताना साधारण १२:१५ वाजण्याचे सुमारास भाऊसाहेब शिंदे हा इसम तेथे आला व खुर्ची टाकून दारात बसला व शिक्षकांना म्हणाला, तुम्ही शाळेवर व्यवस्थित काम करत नाही, तुम्ही शाळेत उशिरा येतात, तुमचे शाळेत दिला जातो तो आहार त्याचा दर्जा खराब आहे. तेव्हा शिक्षक गहिनीनाथ पिंपळे यांनी प्रदीप शिंदे यांना विचारले की बाहेरचे माणसांना बैठकीत बसण्याचा अधिकार आहे का ? असे विचारले असता तुम्हाला लाज वाटते का, घर भाडे फुकट घेता. तेव्हा विजय कडूस यांनी त्यास का विनाकारण आमचे बैठक मध्ये व्यत्यय आणतो असे विचारले असता, जा तुम्हाला काय करायचं आहे,मी कलेक्टर साहेबांना ओळखतो,तुमची बदली करतो अशी धमकी दिली. धुमाळ मॅडम यांनी भाऊसाहेब शिंदे यास का आमच्या कामात व्यत्यय आणतो असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे हा धुमाळ मॅडम यांच्यावर धावून गेला.आम्ही त्यास असे का करतो असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे यांनी विजय कडूस यांची कॉलर धरून जीवे मारण्याची धमकी देऊन मीटिंग होऊ दिली नाही.

त्यानंतर शाळा सुटल्यानंतर शिक्षक विजय कडूस घरी येत असताना रस्त्यात अडवून विजय कडूस यांना वाईट वाईट शिवीगाळ करून  म्हणाला की तुला काय करायचे ते करून घे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. भाऊसाहेब शिंदे हा इसम गुंडेगाव येथील वस्तीवरील शाळेवर जाऊन आमचे इतर शिक्षकांना पण बरेच वेळेस शाळेवर जाऊन कर्तव्य करू देत नाही, विनाकारण शिवीगाळ करतो म्हणून भाऊसाहेब शिंदे यांनी आमचे शासकीय कर्तव्य करत असताना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून विजय कडूस यांनी भाऊसाहेब शिंदे राहणार गुंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे करत आहेत.

Wednesday, December 20, 2023

राज्यात थंडीचा कडाका वाढला ; घ्या आरोग्याची काळजी

लोकमन महाराष्ट्र न्यूज

अहमदनगर : सोहेल मनियार 

सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान खाली येत आहे.

याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग  यांचा वापर करावा.

सतर्क रहा , सावधान रहा

जनहितार्थ जारी!!

 महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग

Tuesday, December 19, 2023

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रफिक (मामु) पटेल यांची निवड

लोकमन महाराष्ट्र न्यूज 

चिचोंडी पाटील : सोहेल मनियार 

भाजपा अहमदनगर दक्षिण अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात रफिक (मामु) इस्माईलभाई पटेल यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. रफिक मामू पटेल हे माजी राज्यमंत्री तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे , खासदार सुजय विखे, आ. राम शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले,अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा हज कमिटी सदस्य सलीम बागवान, आ. बबनराव पाचपुते ,आ. मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अहमदनगर जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हाध्यक्ष तय्यबभाई बेग यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा दक्षिण अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रफिक इस्माईल भाई पटेल यांची निवड करण्यात आली.रफिक मामू पटेल यांनी विविध संघटनांमध्ये काम केले आहे. 

ते कुशल संघटक आहेत. तालुक्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. भारतीय जनता पार्टी ने माझ्यावर विश्वास ठेऊन जी जबाबदारी दिली आहे तो विश्वास मी सार्थ ठरविण्यार असून पक्ष संघटना वाढीसाठी प्रचार व प्रसार करणार असल्याचे रफिक (मामू) पटेल यांनी सांगितले.

Thursday, October 19, 2023

शिवाजी कर्डिले यांची मोबाईलवर लिंक पाठवून लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक

लोकमन महाराष्ट्र न्यूज : पत्रकार सोहेल मनियार 

शिवाजी कर्डिले यांची मोबाईलवर लिंक पाठवून बँक खात्याचा प्रॉब्लेम ऑनलाईन सोडविण्याच्या बहाण्याने, लिंक वर भरलेल्या माहितीच्या आधारे, बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने २ लाख ६१ हजार ६४८ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 जखणगाव तालुका नगर येथील राहणारे  शिवाजी भिकाजी कर्डिले वय वर्ष ४३ असे फसवणूक झालेल्या फिर्यादी व्यवसायिकाचे नाव आहे. फसवणूक झालेल्या शिवाजी भिकाजी  कर्डिले यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय असून त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्यांना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून मी आय सी आय सी आय बँकेतून बोलत आहे तुमच्या बँक खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तो ऑनलाइन सोडविण्यासाठी तुमच्या व्हाट्सअप वर एक लिंक पाठवतो त्यात तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा असे सांगितले. फिर्यादी कर्डिले यांचा त्या व्यक्तीवर विश्वास बसल्याने त्यांनी लिंक ओपन करून सर्व माहिती अचूक भरली.त्यानंतर बँकेच्या डेबिट कार्डचा फोटोही पाठवला त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने लिंक वर भरलेल्या माहितीचा व डेबिट कार्ड माहितीचा गैरवापर करत कर्डिले यांच्या बँक खात्यातून लागोपाठ चार वेळा विविध रकमा काढून घेतल्या आहेत. एकूण २लाख ६१हजार ६८४ रुपये शिवाजी कर्डिले यांच्या खात्यातून काढले गेल्याचे मेसेज कर्डिले यांना आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तीने मोबाईल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कर्डिले यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

 कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भा.द.वि.  कलम  ४२०,४१७,४१९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून सदरील गुन्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967