Friday, January 27, 2023

चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी शरद पवार ;महाविकास आघाडीचा विजय ; माजी मंत्री कर्डीले गटाला मोठा धक्का

 

लोकमन : (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच पदाची आज २७ जानेवारी रोजी निवडणूक पार पडली असून महाविकस आघाडीचे नेते शरद पवार यांची नूतन सरपंच पदी निवड झाली. तर भाजप आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे अशोक कोकाटे व अपक्ष उमेदवार वैभव कोकाटे यांचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक वेळी असणारे सत्ता समिकरन बदलून वेगळ्या आघाड्या यावेळी तयार झाल्या आहेत.यापूर्वी भाजपा चे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे हे सरपंच होते. आता महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून शरद पवार यांना सरपंच पदावर विरामान करून शिवसेनेचे सभापती प्रवीण कोकाटे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. सरपंच पदासाठी शरद पवार यांना 9 मते पडली आहेत तर अशोक कोकाटे यांना ६ मते मिळाली.


ही ग्रामपंचायत एकुण १५ सदस्यांची आहे. यापैकी ८ सदस्य पंधरा दिवसापूर्वीच सहलीला गेले होते.माजी सरपंच मनोज कोकाटे व उपसरपंच कल्पना ठोंबरे यांनाही आपल्या पदाचा राजीमा दिला असल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.


त्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली होती. आज शुक्रवारी दुपारी २ वाजता ही निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पावर यांनी ८ मते घेऊन सरपंच पदावर बाजी मारली. पवार यांची निवड होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जलोष केला आसून गावात उत्साहाचे वातावरण आहे.



पत्रकार सोहेल मनियार यांचा कॅमेरा चोरणारा तब्बल सहा गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद ; पुणे येथून नगर तालुका पोलिसांनी आरोपी ला केली अटक

 नगर तालुका पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांची धडाकेबाज कामगिरी

अहमदनगर : (प्रतिनिधी)

पत्रकाराचा कॅमेरा व व्हिडीओग्राफीचे साधने चोरणारा सराईत आरोपी पुणे येथून अटक आरोपीकडून २ लाख ८९ हजार किंमतीचा कॅमेरा, लेन्स, अडॅपटर, फिल्टर जप्त, नगर तालुका पोलीस ठाणेची कामगिरी

नगर तालुका पो.स्टे. I गु.र.नं.१६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी सोहेल मुस्तफा मनियार रा.चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर यांचा भातोडी गावातून दि. ०२/१/२०२३ रोजी लग्न समारंभ सुरु असताना कॅमेरा, लेन्स व अडॅपटर असा २ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला असलेबाबत नगर तालुका पोलीस ठाणेस तक्रार दिलेली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सुरु होता.


दि. २६/०१/२०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि राजेंद्र सानप यांना सदरची चोरी ही संदीप धर्मा पवार रा. भोसरी जि.पुणे याने केली असल्याची व हे कॅमेऱ्याची चोरी करणारे सराईत गुन्हेगार भातोडी तालुका नगर येथील मूळ रहिवासी व सध्या भोसरी पुणे येथे उद्योग करित असलेला जावेद अफसर शेख याच्यासोबत लग्न समारंभासाठी भातोडी ता.नगर येथे आले होते. अनेक दिवस हे सराईत गुन्हेगार गुंगारा देत होते.

आरोपी संदीप धर्मा पवार भोसरी येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक पुणे येथे काल दिनांक २६/१/२०२३ रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते. स्थानिक भोसरी पोलीसांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेवून नगर तालुका पोलीसांनी आरोपीकडून खालील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत केला.


१) १,१८,०००:०० रुपये किंमतीचा एक कॅनान कंपनीचा कॅमेरा २) १,६५,००००० रुपये किंमतीच्या कॅमेऱ्याच्या लेन्स


३)४५००:०० रुपये किंमतीचा कॅमेरा अडॅपटर ४) १५०००० रुपये किंमतीचे कॅमेरा फिल्टर


२,८९,००० रुपये एकूण


वरील किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस आज दि. २७/०१/२०२३ रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वरील आरोपीवर पुणे जिल्हयामधे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


१)भोसरी MIDC पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. ४८८/ २०२० मुंबई पोलीस कायदा क. १२२ प्रमाणे २) MIDC पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. २२३२/२०२० भा.द.वि कलम १८८ प्रमाणे


३) चिखली पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. २८५ /२०२१ भा.द.वि. क. ४६१.३८०.४११ प्रमाणे ४) भोसरी पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ६९४ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे


५) भोसरी पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ३३/ २०२२ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे ६) भोसरी पोलीस स्टेशन, जिल्हा पुणे गु.र.नं.३६/२०२२ भा.द.वि कलम ३७९,३४ प्रमाणे


सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन, पो.उप.नि. रणजीत मारग, पो.हे.कॉ/शैलेश सरोदे, पोना/ आनंद घोडके, मपोना/ गायत्री धनवडे, पोकों/संदीप जाधव, पोकों/विशाल टकले, पोकों/ज्ञानेश्वर खिळे यांचे पथकाने केली आहे.


फोटो कॅपशन - 

पत्रकाराचा कॅमेरा चोरणारा तब्बल सहा गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी ला नगर तालुका पोलिसांनी केले जेरबंद स.पो.नी. राजेंद्र सानप, पो.उपनिरिक्षक रणजित मारग,पो.हे.कॉ. शैलेश सरोदे, पो.हे.काँ.खेडकर आदी.



Monday, January 23, 2023

मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; 13 महागडे मोबाईल जप्त

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी)

मोबाईल चोरी करून पसार होणा-या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून १३ महागडे मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.सौरभ कुमार शिंदे (वय-२२), शाश्वदिपक गुप३२,रा.स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्हाचा तपाससाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेतला. या दरम्यान मोबाईल चोरणारे दोघे संशयीत हे स्वारगेट मधील आंबिका झोपडपट्टी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताम्यान घेतले, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत स्वांची शहर परिसरात अनेक मोबाईल चोरी केल्याचे विष्पन्न झाले आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १३ मोबाईल जप्त केले आहेत


सदर कामगिरी स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीसनिरीक्षक श्री अशोक इंदलकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील श्री प्रशांत शंदे, पोलीस उपनिरीक्षक शशी चैव पोलीस अंमलदार, पोहया मुकुंद वाट सोमनाथ पुणे शहर मा. श्रीमती सुनारले, भरगुडे,

फिकटरोज शेख, संदीप घुले, रमेश चव्हाण, शेख दिपक खोदा, प्रविण गोडसे यांनी एकत्रीतपणे केली आहे.

Wednesday, January 18, 2023

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

लोकमन महाराष्ट्र न्यूज 


📌 पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान,  त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखाही जाहीर, मतमोजणी 2 मार्च रोजी 


📌 शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस


📌 लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणीही; वेगवेगळ्या सिनेमावरुन वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना झापलं


📌 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो हाती, आरोपी जयेश कांथाची नागपूर पोलिसांसमोर डायलॉगबाजी 

 


📌 महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन, ढुमेंविरोधात नागरिकांमध्ये संताप 

 

📌 त्र्यंबकनगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक 


📌 प्रसिद्ध महिला कुस्तीपटूकडून  भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंकडून निदर्शनं 


📌 हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द 


 📌 मुंबईकरांनो पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद

लोकमन महाराष्ट्र न्यूज

9284856967