Friday, January 27, 2023

चिचोंडी पाटीलच्या सरपंचपदी शरद पवार ;महाविकास आघाडीचा विजय ; माजी मंत्री कर्डीले गटाला मोठा धक्का

 

लोकमन : (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच पदाची आज २७ जानेवारी रोजी निवडणूक पार पडली असून महाविकस आघाडीचे नेते शरद पवार यांची नूतन सरपंच पदी निवड झाली. तर भाजप आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे अशोक कोकाटे व अपक्ष उमेदवार वैभव कोकाटे यांचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक वेळी असणारे सत्ता समिकरन बदलून वेगळ्या आघाड्या यावेळी तयार झाल्या आहेत.यापूर्वी भाजपा चे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे हे सरपंच होते. आता महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली असून शरद पवार यांना सरपंच पदावर विरामान करून शिवसेनेचे सभापती प्रवीण कोकाटे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. सरपंच पदासाठी शरद पवार यांना 9 मते पडली आहेत तर अशोक कोकाटे यांना ६ मते मिळाली.


ही ग्रामपंचायत एकुण १५ सदस्यांची आहे. यापैकी ८ सदस्य पंधरा दिवसापूर्वीच सहलीला गेले होते.माजी सरपंच मनोज कोकाटे व उपसरपंच कल्पना ठोंबरे यांनाही आपल्या पदाचा राजीमा दिला असल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.


त्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली होती. आज शुक्रवारी दुपारी २ वाजता ही निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पावर यांनी ८ मते घेऊन सरपंच पदावर बाजी मारली. पवार यांची निवड होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जलोष केला आसून गावात उत्साहाचे वातावरण आहे.



No comments:

Post a Comment