Tuesday, June 29, 2021

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींच्या वारसदारांना व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज योजना ; अर्ज करण्याचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आवाहन

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींच्या वारसदारांना व्यवसायासाठी पाच लाख रुपये कर्ज योजना एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास  महामंडळ यांच्या मार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी  सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ढ इनडिव्हीज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अॅन्ड इंटरप्राईज (SMILE) ही कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत प्रकल्प मुल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये  एन.एस. एफ.डी.सी. सहभाग 80 टक्के व भांडवली अनुदान 20 टक्के  असे आहे. व्याज दर 6 टक्के प्रमाणे असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे आहे. कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील (एससी) कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLKnWGt6K7 ह्या लिंकवर दिनांक 30 जून 2021 पर्यंत भरावी, असे  असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहमदनगर यांनी कळविले आहे.


या योजनेत सहभाग नोंदविण्यासाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे.- अर्जदार अनुसूचित जातीतील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक). मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता  आवश्यक कागदपत्रे महानगर/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी  प्राधिकरणाने दिलेली पावती अथवा एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकार्‍यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच अर्ज करताना  मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखापर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. रेशनकार्ड,  वयाचा पुरावा आदी बाबतची कागदपत्रे आवश्यक असतील. अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.



नगरच्या महापौरपदी रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड निश्चित

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


महापालिकेच्या नूतन महापौरपदी रोहिणी शेंडगे यांची व  उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड निश्‍चित झाली आहे .या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली. या मुदतीत महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला होता तर मंगळवारी राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांनी अर्ज दाखल केला.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने महापौरपदी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे. 


राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे हे नगरला आले होते.त्यांनी आमदार जगताप यांच्यासह नगरसेवकांशी चर्चा केली यात भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगर मध्ये प्रथमच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. वरिष्ठ पातळीवरूनच हा निर्णय झाल्याने स्थानिकांना तो मान्य करावा लागला.या निवडीची अधिकृत प्रक्रिया 30 जून रोजी पार पडणार आहे.



Sunday, June 27, 2021

चिचोंडी पाटील येथे सुमारे 84 लक्ष रुपयाचा बंधारा मंजुर

 


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर तालुका शिवसेना युवा नेते व  मा.सभापती इंजि.श्री.प्रविणदादा कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नाने चिचोंडी पाटील येथे मेहेकरी नदीवर मारूतीचा माळ या ठिकाणी स्थानिक स्तर,जलसंधारण विभागामार्फत सुमारे 84 लक्ष रुपयांचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर झाला आहे.


याकामी विद्यमान आमदार मा.पालकमंत्री बबनदादा पाचपुते,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांतजी गाडे सर,उपजिल्हाप्रमुख संदेशजी कार्ले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर बंधाऱ्यामुळे जवळपास 250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.यामुळे परिसरातील शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सदर बंधारा मंजूर होण्यासाठी मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी मा.जलसंधारण मंत्री ना.विजयबापू शिवतारे तसेच विद्यमान जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.


या कामाबद्द्ल चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी नामदार शंकरराव गडाख,मा.मंत्री विजयबापू शिवतारे,मा.पालकमंत्री तथा आमदार बबनदादा पाचपुते,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांतजी गाडे सर,जि.प.सदस्य संदेशजी कार्ले व मा. सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांचे विशेष आभार मानले.



Wednesday, June 23, 2021

आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये समावेश

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड वर्ष  कोरोणा बाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष फराह सुलतान अहमद यांनी दिली.आज गुरुवारी दिनांक 24 दुपारी एक वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार निलेश लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्यावतीने गौरविण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले.


देशातील पहिले आमदार !

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झालेले निलेश लंके देशातील देशातील पहिले आमदार ठरले आहेत.


वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाल्याने आमदार निलेश लंके यांनी कोरोना संकट काळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेता सोनू सूद यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी च्या सुरवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार,मजूर, तालुक्यात विलगीकरणमध्ये असलेल्या नागरिकांसाठी नगर पुणे रस्त्यावर आमदार निलेश लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.

दोन महिने अहोरात्र सुरू असलेले अन्नछत्रा चा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला. निर्बंध शिथिल झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली. कोरोणा बाधित यांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुलेहर्या येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले.या उपचार केंद्रात चार हजार ६६८ बाधितांनी कोरोणावर मात केली. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे एक हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे.मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधिताबरोबरच परराज्यातील कोरोना बाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले.आज पर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आमदार लंके कोरोना संसर्गाची काळात करीत असलेल्या कामाची देशात चर्चा झाली उत्तर प्रदेश सरकारने आमदार लंके यांचे कामाची दखल घेत उपचार केंद्रातील उपचारांची व्यवस्थापनाची माहिती घेतली आमदार लंके यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये केला आहे.


Saturday, June 19, 2021

साईबाबा संस्थान चा अध्यक्ष काँग्रेसचाचं करुन आमदार डाॅ.सुधीर तांबेंची अध्यक्षपदी निवड करा ; राहाता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव


राहाता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव


राहाता : (प्रतिनिधी)

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानाप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हाउपध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांची प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राहाता येथिल कार्यालयात संपन्न झाली.

सदर बैठकीत राहाता काँग्रेस च्या वतीने तालुक्यातील शिर्डी संस्थान चा अध्यक्ष काँग्रेसचाचं करुन त्याचे अध्यक्षपद आपल्या तालुक्याचे सुपुत्र नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आमदार डाॅ सुधीर तांबे यांना द्यावे असा एकमताने ठराव करण्यात आला.

याप्रसंगी ठरावाबाबत सखोल चर्चा करण्यात आली यावेळी डाॅ एकनाथ गोंदकर यांनी संस्थानसह परिसराचा विकास होण्याकरिता संस्थान चे

अध्यक्षपद डाॅ तांबेना मिळाले पाहीजे असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस च्या सरचिटणीस प्रियंका सानाप यांनी आपण आजच्या कार्यकारीच्या बैठकीत घेतलेला संस्थान अध्यक्ष चा ठराव पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री ना बाळासाहेब थोरात यांना देणार असल्याची माहिती उपस्थितीतांना दिली.

यावेळी स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी, बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे, यांची भाषणे झाली.

या बैठकीस भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, आमृत गायके, सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, युनुसभाई, मुन्ना फिटर, अरुण जाधव, आभिषेक वाघमारे, मदन मोकाटे, अमृत धुमाळ  यांच्यासह काँग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले.



Wednesday, June 16, 2021

जिल्ह्यासाठी मिळणार साडेसात हजार टन खते




मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची कंपन्यांसोबत चर्चा



अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

सध्या खरिपाच्या काळात जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई सुरू आहे.त्यामुळे ऐन खरिपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणून जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी खत कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर येत्या आठ दिवसात जिल्ह्यात साडेसात हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली.त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खताचा प्रश्न सुटणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

खरीप हंगामातील कपाशी,बाजरी, मका, सोयाबीन, ऊस व इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून मंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला. नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतांमधून ६९१ मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक केलेला आहे. त्यातील ७० टक्के म्हणजेच ४८३.७० मेट्रिक टन युरिया परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली.नेवासा तालुकासाठी ४८३.७० मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. युरिया खताची मोठी टंचाई असताना मुळा बाजार मार्फत सोनई व नेवासा येथून १३० मेट्रिक टन युरिया खताची ९३९ शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. मुळा बाजार तर्फे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया खत मिळावे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून प्रति गोणी २६६ रुपये दराप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.



घरकुल आणि रोजगार हमी च्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सभापती आणि उपसभापतींनी सुरू केल्या आढावा बैठका


          सौ.सुरेखाताई संदीप गुंड

       सभापती पंचायत समिती नगर

अहमदनगर (प्रतिनिधी):सोहेल मनियार

कोरोना आजाराच्या काळात लॉक डाऊन बराच काळ असल्याने नगर
तालुक्यातील घरकुल आणि रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजने संदर्भातील विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच घरकुल प्राप्त लोकांचे अनुदान जमा करण्यासाठी सभापती सुरेखाताई गुंड, उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी जिल्हा परिषद गट निहाय बैठक घेण्यास सुरुवात केली.

 आज  निंबळक  गटाची बैठक पंचायत समिती कार्यालयात पार पडली या बैठकीला शिवसेना नेते संदिप गुंड, माजी सभापती रामदास भोर,गट विकास अधिकारी सचिन घाडगे,संबंधित कक्ष प्रमुख,गटातील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.




निंबळक शाळेत विविध उपक्रमांनी शैक्षणिक वर्षाची सुरुवात


निंबळक (ता.नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवगतांचे स्वागत व वृक्षारोपण करताना  जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे , पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार आदी... (छाया:सोहेल मनियार)

अहमदनगर : (प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेच्या नगर तालुक्यातील  निंबळक शाळेत नवागतांचे स्वागत तसेच वृक्षारोपण आदी उपक्रमांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली .शाळेच्या प्रांगणात वड, अशोक, शेवगा, कढीपत्ता लिंबू अशी विविध प्रकारची पन्नास झाडे लावण्यात आली . तसेच मार्च महिन्यापासूनच इयत्ता पहिलीतील दाखल पात्र मुलांचे प्रवेश सुरु केलेले होते . इयत्ता पहिलीच्या या प्रवेश उपक्रमास निंबळक येथील पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद असून आजपर्यंत ६५ मुले इयत्ता पहिली मध्ये दाखल झाली आहेत .  नवागत उपस्थित मुलांचे स्वागत व वृक्षारोपण जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व पंचायत समितीचे उपसभापती डॉ . दिलीप पवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .उपस्थित मान्यवरांना शाळेचे मुख्याध्यापक पोपट धामणे यांनी  तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले

सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार, निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे ,उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव गायकवाड, उद्योजक अजय लामखडे , माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कोतकर, दत्तूअण्णा कोतकर , ग्राम विकास अधिकारी अनिल भाकरे,शालेय  व्यवस्थापन समिती अध्यक्ष साधना लामखडे, स्वाती लामखडे, रूपाली होळकर ,समीर शेख , दत्तात्रय धावडे व शाळेतील शिक्षक दत्तात्रय कडूस, सुखदेव पालवे, प्रयागा मोहोळकर, कल्पना शिंदे ,सुनिता रणदिवे, प्रज्ञा हापसे, अलका कांडेकर, सुजाता किंबहुने, अर्चना जाचक, भागचंद सातपुते, विशाल कुलट उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय जाधव यांनी केले तर आभार राजेंद्र निमसे यांनी मानले .

(सोहेल मनियार पत्रकार 9284856967)

Sunday, June 13, 2021

मदडगाव येथे कोरोना लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील मदडगाव येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच अनिलराव शेडाळे,MO डॉ.अविनाश कांगुणे,CHO डॉ.आरती गीते, शिवसेना नेते आकाशजी आठरे, मा.सरपंच विलासजी शेडाळे,साहेबराव शेडाळे,शहाजीराव शेडाळे,श्रीधर शेडाळे,आरोग्य सेविका सरोजिनी देठे,सुनिता बिडवे,MPW डेव्हिड वाघमारे,आशा सेविका कल्पना भालेराव,अंगणवाडी सेविका नंदा सोनवणे,हौसाबाई शेडाळे,अंगणवाडी मदतनीस,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये - कृषी विभागाचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

गेल्या आठ दिवसंपासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी  तुरळक पाऊस पडत आहे.सोयाबीन,तूर,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिका ची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967

Saturday, June 12, 2021

आंतरराज्यीय चंदन तस्कर टोळी 650 किलो चंदनासह जेरबंद ; 70 लाखाचा मुद्देमाल जप्त

Dy.s.p.संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई  


राहुरी : (प्रतिनिधी) 

दि.  12/06/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना  गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी  राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर  मध्यप्रदेश येथे  चोरीचे चंदन घेऊन  जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून  छापा टाकला असता  अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे  चंदन (650 किलो चंदन प्रति किलो 9500 ₹ प्रमाणे) आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी   1) अब्दुल मोहम्मद निसाद  वय 32 वर्षे  राहणार अंजामैल हाऊस  ता. बैदाडका. जिल्हा कासारगुड, केरळ 

2)  अब्दुल फक्रुद्दीन रहमान वय 41 वर्ष रा. अमितकला हाऊस  ता.    ऐनमाकजा  जिल्हा कासारगुड  केरळ  यांचेविरुध्द  राहुरी पोलीस  स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. स

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके, PSI मधुकर शिंदे, PSI निलेश कुमार वाघ, स. फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश  औटी,  पो. ना.जानकीराम खेमनर, पो. कॉ. गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदींनी केली.

Friday, June 11, 2021

नगर पंचायत समितीच्या प्रलंबित कामांना मिळणार गती


अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवले आहे.त्यामुळे  नगर पंचायत समितीने कात टाकली असून तालुक्यातील प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा होणार आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक व ग्रामपंचायतीचे अनेक कामे प्रलंबित होते.लॉकडाऊन हटवल्यानंतर पंचायत समितीचे सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी सर्व विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या समवेत बैठक घेतली.यानुसार कृषी विभाग,पशुधन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,स्वच्छता विभाग,समाज कल्याण विभाग,महिला बालकल्याण विभाग,शिक्षण विभाग,घरकुल विभाग आदी विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे.तसेच तालुक्यातील पाणीपुरवठा योजना,अपूर्ण बांधकामे,रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याप्रसंगी माजी सभापती रामदास भोर,पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे यांसह सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान केले जाणार असून नागरिकांना अडचणी आल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी केले आहे.

खते,कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नका ; पंचायत समिती प्रशासनाच्या कृषीसेवा केंद्रांना सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी) - सोहेल मनियार

खते,बी-बियाणे,कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नये तसेच शेतकऱ्यांना खरेदीची पक्की दिले द्यावीत अशा सूचना नगर तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कृषी सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत.नगर तालुक्यात खरिप च्या पेरणीसाठी शेतकरीवर्ग खते,बी-बियाणे खरेदसाठी शहरांमध्ये गर्दी करू लागला आहे.दरम्यान अनेक दुकानदारांकडून शेतकऱ्यांना विनाकारण अडवणूक करणे व गरज नसणाऱ्या वस्तू विक्री करणे याबाबत तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील मार्केट यार्ड मधील कृषी सेवा केंद्रांची सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार,तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले,विस्तार अधिकारी ढेरंगे यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यावेळी विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या खते,बियाणे,किटकनाशकांची माहिती घेण्यात आली तसेच साठा उपलब्धतेबाबत साठाभाव फलक अद्यावत करून खताचा पूर्वीचा शिल्लक साठा जुन्या दराने विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांनी बियाणे दुकाना संदर्भात तक्रार असल्यास बिलासह तक्रार करावी असे आवाहन पंचायत समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

समाजासाठी अनवाॅटेंड चित्रपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल- जंगले


नेवासा (प्रतिनिधी) : बाळासाहेब नवगिरे 
समाजासाठी स्त्रीभ्रूणहत्या वर आधारित अनवाॅटेंड लघुपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास पानेगाव (ता.नेवासा) कै.पोपटराव सभागृहात लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले श्रीफळ वाढवून कॅमेरा पुजन करते  वेळी  व्यक्त केला. 
अध्यक्षस्थानी तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप हे होते. यावेळी जंगले बोलताना सांगितले की,मुळाथडी परीसर हा निसर्गाची मोठी देणगी लाभली असून नदी,वृक्ष, तसेच बागायती भाग, नामदार शंकरराव गडाख पाटील तसेच सभापती सुनीलभाऊ गडाख पाटील यांनी परीसराचा केलेल्या विकासकामांमुळे हे शक्य झालं असून येणारे- जाणारे आपल्या परीसरातील निसर्ग सौंदर्य रमणीय वातावरण बघून अनेकांचे लक्ष वेधून घेत असते.त्यामुळेच या अगोदरही मकरंद अनासपुरे तसेच इतर कलाकारांनी येथे भेटी देवून चित्रपट चित्रिकरण करण्यात आले होते.तसेच चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात आल्याचं सांगितलं होतं.  आज अनवाॅटेंड स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी लघुपट चित्रपट चित्रिकरणमुळे आपल्या परीसराचा नावलौकिक वाढून भविष्यहि मोठा वाव आपल्या परीसराला मिळेल असा विश्वास तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप यांनी व्यक्त केला. 
या लघुपट विषयी असिस्टंट डायरेक्टर सौ.दिपाली पुराणीक यांनी कलाकारांन माहिती दिली. डायरेक्टर पटकथा संवाद शुभम जैन, निर्माता सुनील क्षिरसागर, कॅमेरामन सचिन गायगोवे,रंगभुषा विकास घोगरे, कलाकार म्हणून प्रमोद कसबे,झी मराठी फेमदत्ता उबाळे, भार्गवी पुराणिक,आरोही जाधव,बासुरी घोगरे,मोहिनी पुराणिक, प्रविण जंगले, मनिषा बोडॅ,किसन जगताप आदी सह मान्यवर कलाकार या मध्ये दिसणार आहे. 
कार्यक्रमासाठी उपसरपंच-रामभाऊ जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले संदिप जंगले, सतिश जंगले निवृत्ती जंगले, कै पोपटराव संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जंगले, सचिव भाऊसाहेब बोडॅ, बाबासाहेब शेंडगे, मोहनराव जंगले,गिताराम जंगले ज्ञानेश्वर जंगले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संदिप जंगले यांनी केले.                       

मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून निंबोडी येथे लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प

 

नगर तालुक्यातील निंबोडी येथे मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून आयोजित केलेल्या लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्पचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य संदेश कार्ले, मा. सभापती प्रविण कोकाटे आदी...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार 

गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील निंबोडी येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच शंकरराव बेरड,CHO डॉ.नंदा वाघ मॅडम,शिवसेना नेते संदीपजी खामकर,मा.सरपंच अशोक आवारे,संतोषराव बेरड,उपसरपंच भीमा बेरड,नाथा बेरड,LHV सरोजिनी देठे,आरोग्य सेवक C B पाटील,आरोग्य सेविका S V जाधव, सुपरवायझर सुनीता साठे,आशासेविका शहनाज शेख,रंजना शेंडगे,महेश जाधव,नितीन जाधव,किरण बेरड,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.



Tuesday, June 8, 2021

निधन वार्ता - कै.दत्तात्रय सोनाजी घुसाळे

 निधन वार्ता

कै.दत्तात्रय सोनाजी घुसाळे


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी)

 नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील रहिवासी दत्तात्रय सोनाजी घुसाळे वय ७०वर्ष यांचे सोमवार दि.७-६-२०२१रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते इरिगेशन डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी आशाबाई दत्तात्रय घुसाळे, भाऊ रामदास सोनाजी घुसाळे, पुतणे अतुल घुसाळे व संदीप घुसाळे, नातू रुद्र सुनील घुसाळे, सून अश्विनी सुनील घुसाळे, मुलगी सुरेखा नारायण ईवळे व सारिका वैभव सुडके असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घुसाळे,हजारे,दळवी, झगडे,इवळे, सुडके कुटुंबियांना दुःख झाले आहे. चिचोंडी पाटील गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

(सोहेल मनियार पत्रकार चिचोंडी पाटील)

Monday, June 7, 2021

पंचायत समिती नगर येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

 पंचायत समिती नगर येथे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा

पंचायत समिती नगर येथे शिवस्वराज्य दिन साजरा करताना सभापती सुरेखाताई संदीप गुंड ,उपसभापती डॉ.दिलीप पवार समवेत उपस्थित पदाधिकारी (छाया:सोहेल मनियार)

पंचायत समिती नगर येथे मंगलमय वातावरणात भगव्या स्वराज्यध्वजासह सभापती सुरेखाताई गुंड यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ६ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करून शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत त्याअनुशंगाने पंचायत समिती नगर येथे पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर, शिवसेना नेते संदिप गुंड, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, सहा. गट विकास अधिकारी केदारे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी माडगे मॅडम, गट शिक्षण  अधिकारी सोनार साहेब, पशुसंवर्धन अधिकारी गुंजाळ मॅडम व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, June 6, 2021

पर्यावरण दिनानिमित्त बार्टी संस्थेतर्फे चिचोंडी पाटील येथे वृक्षलागवड

पर्यावरण दिनानिमित्त बार्टी संस्था पुणे यांच्या समता दूत प्रकल्पाच्या वतीने चिचोंडी पाटील येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करताना सौ.प्रेरणा विधाते,सरपंच मनोज कोकाटे आदी...(छाया:सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील (वार्ताहर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने ५ जून “ जागतिक पर्यावरण दिना”  निमित्त अहमदनगर जिल्हा व तालुका स्तरावर “वृक्षारोपण  अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची) स्वायत्त संस्था द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात माहे जून 2021 मध्ये ५  जुन या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समतादूत प्रकल्पांतर्गत ५ जून ते २० जून या कालावधी मध्ये अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपन अभियान पंधरवड्याचे  आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त प्रती तालुका 50 वृक्ष लागवडीचे कार्य संस्थे मार्फत हाती घेतले आहे .
“लावूया रोपे,करुनी संवर्धन ...
मिळेल प्राणवायू, जपूया पर्यावरण”
सध्या सर्वत्र COVID-१९ चा वाढता प्रादुर्भाव व प्राणवायू (Oxygen) ची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले प्रदुषण पाहता त्यासाठी फक्त एकच आवश्यक उपाय आहे तो म्हणजे वृक्षारोपण करणे याचाच विचार करून संस्थेच्या वतीने  महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वृक्षारोपन करण्याचे निश्चित केलेले आहे. फक्त वृक्ष लागवड करणे हा एक प्रयास नसून  समतादूत प्रकल्पाच्या मार्फत हे सर्व वृक्ष मोठे होतील तोपर्यंत त्यांचे संगोपन देखिल करण्यात येणार आहे म्हणजे हे वृक्ष चिरकाल सर्वांना प्राणवायू व सावली देतील.या करिता बार्टी संस्थेचे  मा. महासंचालक यांनी आज औपचारिक रित्या पुणे येथून ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन केले व त्या नंतर स्थानिक  गाव पातळीवर ग्रामपंचायत/ सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधी यांच्या हातून  दि. 6 जून रोजी १० रोपे चिचोडी पाटील या गावातील सम्शानभूमी येथे 10 झाडे लावण्यात आली.  

संस्थेचे कार्य
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.
सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) ही कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाचे नियोजन नगर तालुका समतादूत सौ.प्रेरणा विधाते यांनी केले.प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.पुढील काही दिवस चिचोंडी पाटील गावातील तीस कुटुंब निवडून कुटुंबानुसार एक झाड असे झाडे लावण्यात येणार आहे अशी माहिती सौ.प्रेरणा विधाते यांनी दिली.
कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, संदीप काळे,वैभव कोकाटे, अर्चनाताई चौधरी,जयश्रीताई कोकाटे,यशोदाताई कोकाटे, रिताताई कांबळे,सविताताई खराडे,मनिषाताई ठोंबरे,मंगल बेल्हेकर,ग्रामसेवक देवीदास मोरे आदी उपस्थित होते.



पत्रकार सोहेल मनियार 9284856967

वृक्षलागवड काळाची गरज- सपोनि राजेंद्र सानप ; पत्रकार व पोलिस यांच्या हस्ते वृक्षारोपण

पत्रकार व पोलिस यांच्या हस्ते वृक्षारोपण,नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचा उपक्रम

  
अहमदनगर -सोहेल मनियार पत्रकार 
नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व नगर तालुका पोलीस स्टेशन तर्फे वृक्षारोपण करताना सपोनि राजेंद्र सानप व पत्रकार बांधव..
( छाया: सोहेल मनियार) 

नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे पर्यावरण दिनानिमित्त नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पत्रकार बांधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
       वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्षा संबंधी जागृती निर्माण करून,सार्वजनिक ठिकाणी,शासकीय कार्यालयांसमो र,मोकळी जागा,घर परिसर अशा ठिकाणी वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल व मानवास ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याच अनुषंगाने नगर तालुका पोलीस ठाणे आवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना सपोनि राजेंद्र सानप म्हणाले की, निसर्गाचे आपण देणे लागतो, वृक्ष निस्वार्थीपणे आपणाला अक्सिजन पुरवत असतात.कोरोना काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्याच बरोबर कोरोना काळात समाजाला ऑक्सिजनचे महत्वही समजले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही लोक चळवळ होऊन,जास्तीत जास्त वृक्ष लागवड कशी करता येईल,नुसते वृक्षलागवड करून चालणार नाही त्याचे संवर्धन आणि जतन सुद्धा झाले पाहिजे, झाडांची काळजी आपण घेतली पाहिजे झाडे आपले मित्र व्हावेत, वृक्ष आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे व उपयोगी आहेत. वृक्ष महत्त्वाचे कार्य बजावून जमिनीची धूप कमी करून पर्यावरण संतुलन ठेवतात. लाकूड, पाने फुले औषधी द्रव्य, सावली, फळे देत असतात त्यामुळेच नगर तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात ५०आंब्याची व इतर झाडे लागवड करण्यात आलेली आहेत.आंब्यांच्या या झाडांचा, फळांचा,सावलीचा लोकांना निश्चितच उपयोग होईल.नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त केलेले या उपक्रमाचे कार्य कौतुकास्पद असून यापुढेही असे उपक्रम राबवावे असे मत व्यक्त केले.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेद्र सानप यांनी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेला शुभेच्छा देत अशाच नवीन नवीन उपक्रम मधून समाजसेवेचे व पर्यावरणाचे काम करावे असे मत व्यक्त केले.
   यावेळी सपोनि राजेंद्र सानप, उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलीस नाईक सोनवणे, गुप्त वार्ता विभागाचे रावसाहेब खेडकर, महिला कॉन्स्टेबल मोहिनी तरडक,पवार मॅडम,शेख मॅडम,दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे,पत्रकार बबलू शेख,ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा खजिनदार खासेराव साबळे, महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार,अहमदनगर ड्रायव्हर सेवा ट्रस्ट चे जिल्हा सचिव संतोष शिंदे,नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्यामभाऊ कोतकर,रियाज पठाण,सोहेल मनियार,शिवा म्हस्के,अशोक तांबे,श्याम कांबळे,रफीक शेख,अन्सार शेख,संजय वायकर,सय्यद समील,मंदार धूपधरे,रवी कदम आदि उपस्थित होते.
पत्रकार सोहेल मनियार 9284856967

Wednesday, June 2, 2021

मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प

 

 माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून दशमी गव्हाण येथे कॅम्प घेण्यात आला.याप्रसंगी शुभारंभ करताना जि.प.सदस्य संदेश कार्ले. (छाया : सोहेल मनियार)

गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी CHO डॉ.आरती गिते,सुपरव्हायझर सरोज देठे,सुनिता बिडवे,आरोग्य सेवक डेव्हिड वाघमारे हे उपस्थित होते.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी मार्केट कमिटी संचालक उद्धवराव कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे, शिवसेना शाखाप्रमुख संतोषराव काळे,चेअरमन बाळासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य जयसिंग काळे,शिवाजी काळे,बाळासाहेब काळे,पोलीस पाटील जयसिंग काळे,रामेश्वर काळे,आशिष काळे,लक्ष्मण शिंदे,केशव काळे,श्याम कांबळे,साईनाथ काळे,पोपट कांबळे,ग्रामसेवक शशिकांत शेळके,आशा सेविका अर्चना काळे,सुवर्णा कांबळे,अंगणवाडी सेविका अनिता काळे,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

सोहेल मनियार पत्रकार 9284856967



कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर


मोठी बातमी

🎤राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. 


💰 *लाखोंचे बक्षीस* : 

🔸कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 


🔸राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जातील. यासाठी बक्षिसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. 


🔸याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देत विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.


📃 *२२ निकषांवर गुणांकन*

🔸स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967

मृत्यू दाखल्यांबाबत महापालिकेची सूचना

 मृत्यू दाखल्यांबाबत महापालिकेची सूचना

अहमदनगर(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. सामाजिक अंतर राखा असे सांगितले जात असताना कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू दाखले घेण्यासाठी नातेवाईकांना रांगा लावाव्या लागत होत्या.परंतु आता कोरोणाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दाखले उद्यापासून गुरुवार दि.3-6-2021 पासून नातेवाईकांना घरपोहोच तसेच महानगरपालिका माहिती सुविधा केंद्रात तात्काळ उपलब्ध करून दिले जातील हे दाखले मोफत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.




पत्रकार सोहेल मनियार 9284856967