सौ.सुरेखाताई संदीप गुंड
सभापती पंचायत समिती नगर
अहमदनगर (प्रतिनिधी):सोहेल मनियार
कोरोना आजाराच्या काळात लॉक डाऊन बराच काळ असल्याने नगर
तालुक्यातील घरकुल आणि रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजने संदर्भातील विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच घरकुल प्राप्त लोकांचे अनुदान जमा करण्यासाठी सभापती सुरेखाताई गुंड, उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी जिल्हा परिषद गट निहाय बैठक घेण्यास सुरुवात केली.
आज निंबळक गटाची बैठक पंचायत समिती कार्यालयात पार पडली या बैठकीला शिवसेना नेते संदिप गुंड, माजी सभापती रामदास भोर,गट विकास अधिकारी सचिन घाडगे,संबंधित कक्ष प्रमुख,गटातील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment