Tuesday, April 25, 2023

चक्क नव वधू-वराकडून लाडक्या नेत्याचा कार्यालयात येऊन वाढदिवस साजरा

 

चक्क नव वधू- वराने मंडपातून  राष्ट्रवादीचे नेते घनश्याम आण्णा शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट श्रीगोंदा येथील  कार्यालयावर वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा 

अहमदनगर प्रतिनिधी : सोहेल मनियार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम आण्णा शेलार यांचा वाढदिवस आहे.नवरदेव प्रतीक झेंडे याचा श्रीगोंदा तालुक्यातील चिखली या गावी शुभविवाह पार पडल्या,नंतर  त्यांनी आपल्या घरी न जाता व वधू बरोबर जाऊन आपल्या लाडक्या नेत्याला घनश्याम आण्णा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या कार्यालयावर जाऊन शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले, 


नवरदेवाचे आपल्या नेत्या वरील प्रेम या घटनेतून दिसून आले त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात अण्णांच्या वाढदिवसाचे चर्चा रंगू लागले आहे आणि त्या नवरदेवाचे नेत्यावरील प्रेम  सिद्ध झाले आहे



Friday, April 21, 2023

राजमाता जिजाऊ सहकार पॅनेलच्या कपबशी चिन्हावर मतदान करुन मराठा पतसंस्थेच्या उत्कर्षात सामील व्हा..; संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक सध्या सुरु असून गेली १ महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु आहे. मात्र या कालावधीत पतसंस्थेच्या उत्कर्षाबदद्ल बोलण्या ऐवजी काहीजन परिवर्तनाच्या नावाखाली संस्थेला बदनाम करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. २३ वर्षापुर्वी सुरु केलेल्या या संस्थेने ३० कोटी ठेविंचा टप्पा ओलांडला आहे. नफाही चांगला होत असून नुकतेच नव्याने दोन नविन शाखा सुरु केल्या आहेत. संस्थेत १ रुपयाचाही गैरव्यवहार नसून संस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शक आहे. सभासदांच्या ठेविदारांच्या व कर्जदारांच्या हिताचा विचार करुन अनेक तरुणांना रोजगारासाठी सहकार्य केलेले असून वसुलिचे प्रमाणही अत्यंत चांगले असुन पाथर्डी, संगमनेर, भिंगार, शेवगाव या शाखांचा एनपीए शुन्य आहे.


जे आज २३ वर्षात ३० कोटींच्या ठेवी हे लज्जास्पद आहे बोलतात ते संस्थेला व स्वत:ला बदनाम करत आहेत कारण या २३ पैकी २० वर्षात ते संस्थेत संचालक, पदाधिकारी होते. आज बेताल आरोप करतात मात्र आज संस्थेत असलेल्या ३० कोटी ठेवी पैकी यांचा १ छदामही नाही किंवा यांनी ठेविदारांना ठेवी ठेवण्यासाठी प्रयत्न ही केले नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी सहकार विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मॉडेल बायलॉज (आदर्श उपविधी) ९७ वी घटना दुरुस्ती नुसार सर्वच पतसंस्था, सहकारी संस्था बँकासाठी लागू केले यामध्ये अत्यंत चांगल्या तरतुदी असून सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक राहील त्यामुळे आपल्या संस्थेने हे उपविधी स्विकारले. यामध्ये मानदसचिव हे पदच नाही मात्र तरीही या पदाच्या नियुक्तीचा आग्रह धरण्यात आला त्यासाठी काही पत्र व्यवहार करण्यात आला की ज्या पत्रव्यवहारातील एका पत्रात जिल्हा उपनिबंधक नमुद करतात की मानद सचिव पद फसवून घेतले आहे. अस सगळे असल्याने सदर पद नियुक्ती बाबत संस्थेत मंथन झाले व नाममात्र म्हणुन नियुक्ती करु असा विचार पुढे आला मात्र या परिवर्तन वाल्यांना अधिकार हवे होते ते नाकारल्याने या लोकांनी राजीनामे दिले. संस्था अल्पमतात नसताना पत्रकारासोबत संगनमत करत संस्था त्या पत्रकाराच्या दावनीला बांधण्याच्या आणाभाका घेत संस्थेवर प्रशासक आणला. सदर पत्रकाराने संस्थेला बदनाम केले. राजकीय दबाव वापरत प्रशासक नियुक्त करुन घेतला. ज्या दिवशी प्रशासक आले त्यावेळी त्या पत्रकाराने व या परिवर्तन वाल्यांनी प्रशासका सोबत फोटोग्राफर, बातमीदार पाठवून संस्थेला त्रास दिला सलग ८ ते १५ दिवस त्या पत्रकाराने संस्थेबद्दल लेखनी चालवत मोठे मोठे रकाने छापले आज त्या पत्रकाराची काय अवस्था झाली हे आपण सर्वजण जाणून आहोत.. पुढे संस्थेचे प्रशासक नियमानुसार हटवले व संस्थेचा कारभार संचालक मंडळाकडे आला त्यावेळी अवघ्या १७ कोटींच्या ठेवी होत्या त्यानंतर इंजि. विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या दिड वर्षात संस्थेने ३० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला संस्थेत कदीही एकाधिकारशाही कोणीही केली नाही. कोण कोठे राहातो यापेक्षा संघटनेसाठी, संस्थेसाठी किती धडपडतो हे महत्त्वाच आहे. आज इंजि. विजयकुमार दुबे हे अहमदनगरच नव्हे महाराष्ट्रात मराठा सेवा संघाच्या चळवळीत लोकप्रिय आहेत. त्यांनी एकाधिकारशाही केली असती तर ते लोकप्रिय असते का ?

संस्था निवणुक बिनविरोध व्हावी हि इच्छा नक्की होती मात्र जे थकबाकीदार आहेत त्यांना संचालक म्हणून घेणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नव्हते व यांचा अटहास होता त्यांनाच घ्या त्यामुळे या थकबाकीदारांनीच हि निवडणुक लादलीय हे सत्य आहे. यांचे एक समर्थक सेवा संघाचे माजी पदाधिकारी संस्थेचे माजी संचालक, पदाधिकारी यांनी पुतण्या कर्मचारी म्हणून घेण्याचा अटहास धरला तो पुतण्या घेतला तर त्याने संस्थेत १७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आज न्यायालयाने त्याचेकडून रक्कम वसुल करण्याचा आदेश तर दिलाच शिवाय त्या बोडखे कर्मचा-यावर पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. व त्यावेळी संस्था अडचणीत येवू नये यास्तव इंजि विजयकुमार ठुबे यांनी १२ लाख कर्ज स्वतःच्या नावे काढून भरले व संस्था टिकवली विशेष म्हणजे हा प्रकार झाला त्यावेळी इंजि. विजयकुमार ठुबे यांना या लोकांनी बाजुला सारले होते व संस्थेवर हे परिर्वन वाले पदाधिकारी होते मात्र ठुबे यांनी संस्थेसाठी व मराठा सेवा संघासाठी व सभासदाप्रती असलेली बांधीलकी जपत हे पैसे भरले.

गेल्या एक महिन्यापासून पहातोय परिवर्तनाच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर जाउन टिका टिपनी करतायेत, एकाच व्यक्ती बदद्ल बोलतायेत पण इंजि. ठुबे हे प्रामाणीकपणे व पारदर्शक पणे संस्थेच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्नशिल आहेत त्यामुळे त्यांना व राजमाता जिजाउ सहकार पॅनेलच्या उमेदवार, समर्थक, मार्गदर्शकांनी कोणावरही कसलिही टिका टिपनी न करता संस्थेच्या उत्कर्षाची व भरभराटीची भुमिका सभासदां समोर मांडली असून आजवर काय केले हे सांगत सभासदांना मतदान मागत आहेत. याउलट या मंडळींनी मात्र परिवर्तनाच्या नावाखाली संस्थेच्या उत्कर्ष व भरभराटीकडे दुर्लक्ष करत फक्त व्यक्तीगत टिका टिपनी सुरु केलीय कुठेही जनाधार नसलेली हि मंडळी असून यांच्या परिवर्तन पॅनेल मध्ये जे उमेदवार आहेत त्यातील ४-५ उमेदवारांचा मराठा सेवा संघाशी दुरान्वये संबंध नाही कधीही त्यांनी मराठा सेवा संघात काम केले नाही उलट मराठा सेवा संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाबददल अपशब्द वापरनारे यात असल्याने हयांना नेमक कसल परिवर्तन हवय हा प्रश्न पडतो

या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही आपणास नम्र आवाहन करतो की, मराठा पतसंस्थेच्या निवडणुकीत राजमाता जिजाउ सहकार पॅनेलच्या उमेदवारांना आपले बहुमुल्य मत दया, त्यांच्या कपबशी चिन्हावर फुलीचा शिक्का मारुन विजयी करा. पतसंस्था वाचवा, संस्थेच्या भरभराटीसाठी व उत्कर्षासाठी आपण रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी मतदान केंद्रावर जाउन मतदान करा. संस्था व सहकार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

जय जिजाऊ !

आपला स्नेहाकिंत 

राजेश गणपतराव परकाळे 

जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, अहमदनगर







Wednesday, April 19, 2023

मानवी जीवनाचे कल्याण करणारी श्रीमद् भागवत कथा आहे - ह.भ.प. प्रकाशानंद गिरीजी महाराज

 

 नगर : सावेडी - (प्रतिनिधी)

श्रीमद् भागवत कथा सामान्य कथा नाही तर अमर कथा आहे. जगामध्ये असा कोणताही ग्रंथ नाही अवघ्या सात दिवसात जीवाला मुक्ती प्रदान करेल. श्रीमद् भागवत पुराण असा ग्रंथ आहे विधीने श्रवण केल्याने, मनन केल्यानंतर अनुष्ठान केल्याने जीवाला सात दिवसात मुक्ती प्रदान करतो.एक जन्माच्या नाही तर अनेक जन्माच्या पुण्याइने श्रीमद् भागवत कथा श्रवणाचे भाग्य आपणास लाभत असते.       


कथा म्हणजे काय? कथेची काय व्याख्या करणार? सेवन केल्यानंतर काय फळ मिळेल? जीवाला ब्रह्म स्वरूपात परमात्मा स्वरूपात स्थिर करते तिला कथा म्हणतात.कथा म्हणजे दर्पण आहे.दर्पण आपल्याला आपण कसे दिसतो हे दाखवितो. त्याप्रमाणेच कथा आपले जीवन कसे आहे हे दाखवते.आपण राम आहोत की रावण, कौशल्या आहोत की कैकयी,देवकी का पुतणा हे कथा दाखवीत असते.  


भगवंताची कृपा आम्हाला प्राप्त व्हावी यासाठी आपण शरण आले पाहिजे.धर्म कथेच्या आज्ञेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो.मानवी जीवनाचे कल्याण करण्याचे काम कथा करत असते.कथा तर्पण,अर्पण आणि समर्पण या तीन गोष्टी शिकविते. अर्पण हे देशावर प्रेम करायला शिकवते. देशासाठी प्राणांची अहुती देऊन संसाराची राख रांगोळी केली त्यांच्या प्रति कृतज्ञ राहिले पाहिजे हे शिकवते.तर्पण आपल्याला आई-वडिलांविषयी प्रेम करायला शिकवते.ज्या आई-वडिलांनी आपल्याला हाल अपेष्टा सहन करून तळहाताच्या हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले.अशा आई-वडिलांविषयी कृतज्ञ राहायला शिकवते.  


 पाईपलाईन रोड ,संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे पहिले पुष्प गुंफताना देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी निरूपण केले.याप्रसंगी पाईपलाईन रोड परिसरातील तसेच नगर शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     


पुढे बोलताना हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज पुढे म्हणाले,साक्षात भगवंताचे वाड:मय स्वरूप असणारे श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजनासाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाने अथक परिश्रम घेतले आहे.संत किसनगिरी नगर येथे साक्षात देवगड नगरीच अवतरलेली आहे. कथेचे सुंदर नियोजन करून भक्तीमय व मंगलमय वातावरण या ठिकाणी निर्माण केले आहे.कथेनिमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत पुष्पवृष्टी करून संत किसनगिरी बाबांच्या पालखीचे संत किसनगिरी नगर येथे मोठ्या आनंदाने उत्साहाने स्वागत करण्यात आले.

कथेच्या समाप्तीनंतर श्रीमद् भागवत ग्रंथाची महाआरती करण्यात आली.                   

 चौकट-

वृद्धाश्रम हे महाराष्ट्राचे भूषण नाही.आपण आदर्श देशामध्ये जन्माला आलो आहोत. ज्या देशाची संस्कृती सांगते  सर्वेश्वर भगवंताची प्राप्तीसाठी    योगी जप,तप करतात.ऋषीमुनी यज्ञा करतात.माता-पितांची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते.अशा आई-वडिलांना आपण सांभाळू शकत नाही.ही  समाजातील मोठी शोकांतिका आहे.असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी कथाकार हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी केले आहे.



नगर जामखेड रोडवरील जामखेड नाका परिसरातील जीव घेणी अतिक्रमणे काढून,जामखेड नाका ते आठवड गाव पर्यंतचे खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी ;जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन.

 


 अहमदनगर (प्रतिनिधी) - सोहेल मनियार

नगर जामखेड रोडवर नगर शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असनाऱ्या, जामखेड नाका परिसरात रोडच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या अंतरावर मागील 2 वर्षांमध्ये अनेक गाळे बांधण्यात आली आहेत. सदरची दुकाने गाळे, ही खाजगी मालकीची असून, त्यांचे बांधकाम हे शासनाच्या हद्दीत असणाऱ्या नगर जामखेड रोडच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधली गेलेली आहेत. मुख्य म्हणजे या दुकानांचे फलक हे रोड पासून अगदी एक ते दोन मीटर अंतरावर आहेत.

परिणामी त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करणे सुद्धा अवघड झाले आहे, एखादि व्यक्ती अचानक वाहनाच्या समोर आल्याने त्या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. मागील आठवड्यामध्ये एक आर्मी अधिकाऱ्याचा अपघात होऊन तो कोमा मध्ये जाऊन त्याचा मृत्यू झाला असून सदरील रस्त्यावरच्या अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व मागील दोन वर्षांपूर्वी याच नगर जामखेड रोडचे सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून आपल्या विभागाअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहे. 

परंतु या रोडवर पाच ते सहा ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे खड्डे पडलेले आहेत. त्यातच सदर रोड ची रुंदी कमी असल्या मुळे बाकीचा रोड हा चांगल्या प्रतीचा असल्यामुळे वाहनांना रात्रीच्या वेळी हे खड्डे समजून येत नाहीत त्यामुळे सातत्याने त्या खड्ड्यांमध्ये दुचाकीस्वारांचा अपघात होत आहे. यात मागील दोन ते तीन महिन्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत,

तसेच वेगवेगळ्या अपघातात होत असून दोन निष्पाप व्यक्तींनी आपला प्राण गमावलेला असून जामखेड नाक्यावरील सर्व अतिक्रमित बांधकामे तातडीने काढावीत. तसेच संपूर्ण रस्ता रुंदीकरण हे  शासकीय नियमात करावे. तसेच जे काही खड्डे पडलेले आहेत त्याचे व्यवस्थित पॅचींग करून रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन देताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत विजय मिसाळ, अमित गांधी, दीपक गुगळे, गौतमीताई भिंगारदिवे, मंगल पालवे, शहानवाज शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.



Tuesday, April 18, 2023

पंचायत समितीच्या माध्यमातुन उत्तम कामकाज प्रा.शशिकांत गाडे सर

 

नवनागापुर येथे माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार यांच्या निधीतून सभामंडपाचे लोकार्पण करताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर 

अहमदनगर  (प्रतिनिधी ) : सोहेल मनियार

 पंधरा वर्षांपासून महविकास आघाडीच्या ताब्यात पंचायत समिती आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून नगर तालुक्यात उत्तम कामकाज केले आणि सर्व शासकीय योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. दिलीप पवार यांनी केले. 


पवार यांना मिळालेल्या पदाचा वापर सर्व सामन्य नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केले. असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख मा. प्रा. शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले. नगर तालुका पंचायत समितीच्या पंधरावा वित्त आयोगातून माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या निधीमधन नवनागापर होत्या.



येथील मोहीनी नगर येथे सभापमंडपाचे लोकार्पन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


नवनागापूर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम येथील तरुण राबवत असतात. त्यासाठी येथे सभामंडपाची अत्यंत आवश्यकता होती.पंचायत समितीच्या कार्यकाळात डॉ. दिलीप पवार यांनी येथे सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. यावेळी ग्रा.पं. सदस्य आप्पासाहेब सप्रे, प्रविण सप्रे आदीसह या भागातील नागरिक, माहिला उपस्थित होत्या.