नगर : सावेडी - (प्रतिनिधी)
श्रीमद् भागवत कथा सामान्य कथा नाही तर अमर कथा आहे. जगामध्ये असा कोणताही ग्रंथ नाही अवघ्या सात दिवसात जीवाला मुक्ती प्रदान करेल. श्रीमद् भागवत पुराण असा ग्रंथ आहे विधीने श्रवण केल्याने, मनन केल्यानंतर अनुष्ठान केल्याने जीवाला सात दिवसात मुक्ती प्रदान करतो.एक जन्माच्या नाही तर अनेक जन्माच्या पुण्याइने श्रीमद् भागवत कथा श्रवणाचे भाग्य आपणास लाभत असते.
कथा म्हणजे काय? कथेची काय व्याख्या करणार? सेवन केल्यानंतर काय फळ मिळेल? जीवाला ब्रह्म स्वरूपात परमात्मा स्वरूपात स्थिर करते तिला कथा म्हणतात.कथा म्हणजे दर्पण आहे.दर्पण आपल्याला आपण कसे दिसतो हे दाखवितो. त्याप्रमाणेच कथा आपले जीवन कसे आहे हे दाखवते.आपण राम आहोत की रावण, कौशल्या आहोत की कैकयी,देवकी का पुतणा हे कथा दाखवीत असते.
भगवंताची कृपा आम्हाला प्राप्त व्हावी यासाठी आपण शरण आले पाहिजे.धर्म कथेच्या आज्ञेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो.मानवी जीवनाचे कल्याण करण्याचे काम कथा करत असते.कथा तर्पण,अर्पण आणि समर्पण या तीन गोष्टी शिकविते. अर्पण हे देशावर प्रेम करायला शिकवते. देशासाठी प्राणांची अहुती देऊन संसाराची राख रांगोळी केली त्यांच्या प्रति कृतज्ञ राहिले पाहिजे हे शिकवते.तर्पण आपल्याला आई-वडिलांविषयी प्रेम करायला शिकवते.ज्या आई-वडिलांनी आपल्याला हाल अपेष्टा सहन करून तळहाताच्या हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले.अशा आई-वडिलांविषयी कृतज्ञ राहायला शिकवते.
पाईपलाईन रोड ,संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे पहिले पुष्प गुंफताना देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी निरूपण केले.याप्रसंगी पाईपलाईन रोड परिसरातील तसेच नगर शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज पुढे म्हणाले,साक्षात भगवंताचे वाड:मय स्वरूप असणारे श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजनासाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाने अथक परिश्रम घेतले आहे.संत किसनगिरी नगर येथे साक्षात देवगड नगरीच अवतरलेली आहे. कथेचे सुंदर नियोजन करून भक्तीमय व मंगलमय वातावरण या ठिकाणी निर्माण केले आहे.कथेनिमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत पुष्पवृष्टी करून संत किसनगिरी बाबांच्या पालखीचे संत किसनगिरी नगर येथे मोठ्या आनंदाने उत्साहाने स्वागत करण्यात आले.
कथेच्या समाप्तीनंतर श्रीमद् भागवत ग्रंथाची महाआरती करण्यात आली.
चौकट-
वृद्धाश्रम हे महाराष्ट्राचे भूषण नाही.आपण आदर्श देशामध्ये जन्माला आलो आहोत. ज्या देशाची संस्कृती सांगते सर्वेश्वर भगवंताची प्राप्तीसाठी योगी जप,तप करतात.ऋषीमुनी यज्ञा करतात.माता-पितांची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते.अशा आई-वडिलांना आपण सांभाळू शकत नाही.ही समाजातील मोठी शोकांतिका आहे.असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी कथाकार हभप प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी केले आहे.







No comments:
Post a Comment