Saturday, September 25, 2021

नामदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत चिचोंडी पाटील गणांमध्ये शिवसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

शिवसंपर्क अभियान अंतर्गत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गणात शाखा नूतनीकरण करताना जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, माजी सभापती प्रवीण कोकाटे यांसह उपस्थित पदाधिकारी...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी)


नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील पंचायत समिती गणामध्ये आज निंबोडी,सारोळा बद्दी,कोल्हेवाडी, टाकळी काझी,मदडगाव,दशमी गव्हाण,सांडवे या गावांमध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे नूतनीकरण व फलकांचे अनावरण करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा निर्माण करून प्रा.शशिकांत गाडे सर यांच्यासह नगर तालुक्यात शिवसेना भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी नामदार शंकरराव गडाख यांनी केले.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे अनेक युवक शिवसेनेकडे आकर्षित होत असून त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीस लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे सर यांनी नामदार शंकरराव गडाख यांच्या कामांचे कौतुक केले व त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण नगर तालुक्यात शाखा नूतनीकरण करणार असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे यांनी चिचोंडी पाटील गणामध्ये केलेल्या दर्जेदार विकासकामांचे तसेच प्रभावीपणे राबविलेल्या शासकीय योजनांचे कौतुक केले.


यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सभापती संदीप गुंड,उपसभापती डॉ. दिलीप पवार,मा.सभापती प्रविण कोकाटे,पंचायत समिती सदस्य पोपट निमसे,तालुकाप्रमुख राजेंद्र भगत,युवा सेना प्रमुख प्रविण गोरे, उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, प्रकाश कुलट,गणेश कुलट,शंकर ढगे, डॉ.मारुती ससे,अविनाश पवार, शहाजी आटोळे,संदीप खामकर, बाबुराव बेरड,शंकर बेरड,अशोक आवारे,प्रकाश बोरुडे,सचिन लांडगे, आकाश आठरे,विलास शेडाळे,संतोष काळे,राजेंद्र काळे,जयसिंग काळे, नामदेव काळे,अजय बोरुडे,अमोल निक्रड,बाळासाहेब खांदवे,बाप्पू खांदवे,रमेश गव्हाणे,सुरज कराळे, संतोष कुटे,चंद्रकांत सदाफुले,भाऊसाहेब वाडेकर,विश्वसागर कोकाटे,राजेंद्र कोकाटे,प्रशांत कांबळे,सुधीर कोकाटे, देविदास शिंदे रवींद्र मस्के,वैभव पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Friday, September 17, 2021

हरिभाऊ कर्डिले बनले गोरगरिबांचे कैवारी-मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्रमंडळ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात नेत्र तपासणी करताना. या प्रसंगी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले आदी (छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळाच्यावतीने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते विष्णू खांदवे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्रमंडळ आयोजित के.के.आय बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमाने २३६ वे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की कोरोणा काळात सर्वत्र रुग्ण संख्या वाढत असल्याने ज्यांना मोतीबिंदू डोळ्यांचे आजार आहेत अशा रुग्णांनी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रुग्णालयात जाणे टाळले. नेत्र रुग्णांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर चे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे चिचोंडी पाटील येथे आयोजन केले आहे. गोरगरिबांची सेवा करण्यात हरिभाऊ कर्डिले नेहमीच पुढाकार घेतात.हरीभाऊंचा मुलगा आजारी असून  रुग्णालयात आहे तरीही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी हरिभाऊंनी या शिबिराचे आयोजन केले. यापूर्वी वाकोडी येथे मोफत मोतीबिंदू शिबिर घेतले त्यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून उपचार केले.शस्त्रक्रिया केली, मोफत चष्म्यांचे वाटप केले. हरिभाऊ कर्डिले हे जनसामान्यांचे कैवारी ठरले आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभरात ८० कोटी लोकांना मोफत लस दिली,रेशन दुकानातून ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप केले, देशातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा होत आहेत,उज्वला गॅस योजना अंतर्गत आठ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन दिले,तीन कोटी पेक्षा जास्त लोकांना घरकुल निर्मिती करून दिली,शौचालय दिल्यामुळे देशातील सहा लाखापेक्षा जास्त गावे हागणदारीमुक्त झाली, जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवला,अतिरेक्यांचा नाश सर्जिकल स्ट्राइक केले, जनधन योजना अंतर्गत ४३ कोटी लोकांचे बँकेत खाते उघडले अशी अनेक लोकोपयोगी कामे भारतीय जनता पार्टी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. काही पुढारी मंडळींना आमच्यावर आरोप करणे शिवाय दुसरी कामेच नाहीत. त्यांनी ज्या चोऱ्यामाऱ्या केल्यात,जिल्हा परिषद मध्ये जी टक्केवारी गोळा केली ती झाकण्याचा प्रयत्न होतोय .त्याचा आरोप आमच्यावर करण्याचं काम काही पुढारी मंडळी करत आहेत.आम्ही मनाचा मोठेपणा ठेवून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीला माजी खासदार कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती असे नाव दिले.त्याचं सुद्धा त्यांना दुःख झालं.ज्यांच्या मतांवर ते निवडून आले त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहण्याचे काम त्यांनी केलं नाही. प्रताप शेळके यांची सीना वाहतूक दूध संघ ही संस्था होती. जिल्हा बँकेने पैसे दिले. ४ कोटी रुपये पैकी ३ कोटी रुपये सीना वाहतूक दूध संघ या संस्थेला घेतले. ज्यांनी  हे उद्योग केले तेच मात्र स्वतःच झाकवण्यासाठी आमच्यावर आरोप करतात. एखाद्या शिपाया सारखं सकाळी जिल्हा परिषद उघडायला जातात आणि जिल्हा परिषद बंद करेपर्यंत तिथेच हजर असतात यापलीकडे त्यांना काम नाही.आमच्यावर टीका करण्याआधी तुमचे योगदान दाखवा. महाराष्ट्रात एक नंबरची मार्केट कमिटी उभारण्याचे काम कोतकर साहेब व काका यांच्या माध्यमातून केले. कुठेतरी आरडाओरडा करायचा, कुठेतरी आंदोलन करायचं यातून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न काही पुढारी मंडळी करीत असल्याचे शिवाजीराव कर्डिले म्हणाले. तुम्ही धंदे काय करतात तुमचे क्रेशर कसे चालतात,कोठून डबर वाहून आणतात,किती रॉयल्टी भरतात,यांतून किती पैसे मिळवतात हे जर आम्ही उघडकीस आणलं तर त्यांना जेलमध्ये जाऊन बसावे लागेल. परंतु आम्ही तसं काम करत नाहीत.आपल्या कामाशी काम ठेवून जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत.पंधरा वर्षात बँकेत आम्ही जेवढे काम केले तेवढे काम आतापर्यंत कोणी केले नाही.शेतकरी हाच केंद्रबिंदू समजून त्यांच्या हिताचे काम आम्ही आतापर्यंत करत आलो आहोत.इथून पुढे देखील बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. नगर तालुक्याने मला पंधरा वर्षे आमदार केले त्याचा विसर मी कधी पडू देणार नाही असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले म्हणाले की कोरोनाव्हायरस महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना डोळ्यांचे आजार, तिरळेपणा,लासुर,मोतीबिंदू पडदा या सारख्या आजाराने त्रस्त झाले असून मोतीबिंदू मुळे काही रुग्णांना दृष्टी गमावण्याची वेळ आली असल्याने त्यांना पुन्हा दृष्टी मिळावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील रुग्णांची सेवा करता यावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले असल्याचे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,शिबिराचे आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते विष्णू खांदवे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के,भाजपा नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे,भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीपराव भालसिंग,शिक्षक नेते पंडित सर,भाजपा किसान मोर्चा चे चिटणीस बबनराव शेळके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबापाटील खर्से,उद्धवराव कांबळे,बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव,बन्सी कराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव हजारे,डॉ.निक्रड,दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप, माजी जि.प.सदस्य बापू सदाफुले,सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कोकाटे,व्हा. चेअरमन काशिनाथ बेल्हेकर, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष अर्चना चौधरी,पत्रकार सोहेल मनियार,दशमिगव्हाणचे उपसरपंच बाबासाहेब काळे, उपसरपंच पोपटराव शेळके,माजी सरपंच भाऊसाहेब काळे,माजी उपसरपंच पांडुरंग निमसे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशराव पिंपळे यांसह तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ,गोरगरीब रुग्ण उपस्थित होते. केके बुधरानी हॉस्पिटल पुणे यांचे डॉ. गिरीश पाटील,माया आल्हाट,मीरा पठारे, मनीषा कोरडे,आदींनी रुग्णांची तपासणी केली.गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांनी हरिभाऊ कर्डिले यांना भरभरून आशीर्वाद दिले.



Thursday, September 9, 2021

बाजार समितीत परिवर्तन घडवण्यासाठी नगर तालुक्याने महा विकास आघाडीला साथ द्यावी:प्रा.शशिकांत गाडे

 रुईछत्तीसी येथे शिवसेना शाखा नूतनीकरण व फलक अनावरण कार्यक्रम

गाव तिथे शाखा अभियान अंतर्गत रुईछत्तीसी येथे फलकाचे अनावरण करताना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, जि.प.सदस्य संदेश कार्ले,शरद झोडगे,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,माजी सभापती प्रवीण कोकाटे, प्रवीण गोरे यांसह उपस्थितीत शिवसैनिक (छाया: सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)


नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे गाव तिथे शाखा अभियानांतर्गत फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

गावामध्ये शिवसेना शाखेचा  फलक दिसल्यानंतर  सर्वसामान्य माणसाला आधार मिळतो अनुभव अनेक वर्षे सर्वांनी घेतला आहे. त्यामुळेच आता नगर तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेना शाखा व फलक बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रुईछत्तिशी गावाने जिल्हा परिषद,पंचायत समितीला शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे. आता बाजार समितीची सत्ता ही महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांनी केलेला मोठा भ्रष्टाचार जगजाहीर आहे. रिकाम्या जागा, शौचालय कोंडवाड्याच्या ठिकाणी गाळे बांधून ते विकण्याचा उद्योग चालू आहे. संचालक मंडळ केवळ नामधारी असून सर्व कारभार एकाच व्यक्तीच्या हातात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समिती वाचवण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. नगर तालुक्यातील जनतेने साथ द्यावी,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.

नगर तालुक्यात शिवसेनेने 

गावागावात शिवसेना शाखा नूतनीकरण,फलक अनावरण कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत रुईछत्तीसी येथे शिवसेना फलकाचे अनावरण प्रा.गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जि.प.सदस्य शरद झोडगे, सभापती संदीप गुंड,उपसभापती डॉ. दिलीप पवार,युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे, माजी सभापती प्रवीण कोकाटे,नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत,रवींद्र भापकर,किरण भापकर,प्रकाश कुलट,सोमा पोकळ,आदिनाथ नवसुपे, संजू भोर,संपत वाघमारे आदी उपस्थित होते.

प्रा.गाडे पुढे म्हणाले की,शिवसेना म्हणजे विश्वासाचे नाव आहे. नगर तालुका पंचायत समिती अनेक वर्षापासून शिवसेना व महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे.या माध्यमातून दर्जेदार कामे करण्यावर भर दिला जातो. त्यामुळेच इतक्या वर्षात कोणालाही आमच्या कारभारावर बोट ठेवता आलेले नाही. लोकांसाठीची कामे भ्रष्टाचारमुक्त व दर्जेदार व्हावीत हाच शिवसेनेचा प्रयत्न असतो. रुईछत्तिशी परिसरात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ग्रामस्थांनी एकत्रित बसून सोडवावा.नंतर कामासाठी निधी थेट मुंबईहून मंजूर करून आणू,अशी ग्वाही त्यांनी दिली.

तालुकाप्रमुख राजेंद्र भगत म्हणाले की प्रा.गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात शिवसेना अतिशय समक्षपणे काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते हे सर्वांना माहीत आहे. तालुक्यात संघटना मजबूत करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी जि.प. सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले म्हणाले की बाजार समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तो जनतेसमोर आणण्याचे काम आम्ही करत आहोत.सर्वसामान्य जनतेला, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले.जि. प.सदस्य शरद झोडगे यांनी शिवसेनेच्या पाठीमागे सर्वांनी खंबीर पणे उभे रहा असे आवाहन केले. कार्यक्रमास राजकुमार गोरे, बिभीषण सपाटे,नाथ महाराज, माणिक गोरे,प्रभाकर गोरे,राहुल कुंजीर,संजू बोरकर,अजिनाथ नवसुपे,सोमनाथ गोरे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.




Thursday, September 2, 2021

नागरदेवळे गटावर पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार - प्रा.शशिकांत गाडे

 

शिवसेना शाखा फलकाचे अनावरण व विविध विकास कामांचे उद्घाटन करताना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, जि.प.सदस्य शरद झोडगे,संदेश कार्ले,सभापती सुरेखाताई संदीप गुंड आदी उपस्थित...(छाया: सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

पारेवाडी व भातोडी येथे शिवसेना शाखेचे फलकाचे अनावरण व विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले.त्याप्रसंगी प्रा. शशीकांत गाडे सर बोलत होते. नगर तालुक्यात शिवसेना भक्कम उभी आहे.जनता आमच्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. आम्ही विकास कामाच्या विश्वासावर पुन्हा एकदा पंचायत समितीवर भगवा फडकवणार असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला.

शाखा नुतणी करण व विविध विकास कामाचे उद्घाटन  त्यांच्या हस्ते करण्यात आले.

    आज गटामधे जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडगे व पंचायत समिती सभापती सौ सुरेखा संदिप गुंड यांच्या माध्यमातून दोन्ही गावात एक कोटी च्या विकास कामाचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडगे,संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती सौ सुरेखा संदिप गुंड,उपसभापती दिलीप पवार,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,उपतालुका प्रमुख निसार भाई ,उपसरपंच राजु पटेल,ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम,दिलीप गुंड,वैभव शिंदे,तान्हाजी गुंड,बाळासाहेब शिंदे,दत्ता शिंदे,जयदिप गुंड,प्रसाद पवार,पेंशनर संघटनेचे अध्यक्ष हारुण शेख, दिपक गुंड,अनिल गुंड,बंडू गायकवाड,वसंत गुंड, ठकाजी शिंदे,गणेश गुंड, परमेश्वर गुंड, सुरेश शिंदे, दिपक शिंदे यांसह ग्रामस्थ व महीला उपस्थित होते.




Wednesday, September 1, 2021

शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे सर यांचे आवाहन ; गाव तिथे शाखा अभियानाचा चिचोंडी पाटील मध्ये शुभारंभ


चिचोंडी पाटील ता.नगर येथे शिवसेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाचा शुभारंभ करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेशजी कार्ले,जि.प.सदस्य शरद झोडगे, नगर तालुका पंचायत समितीचे मा.सभापती प्रवीण कोकाटे,नगर तालुका शिवसेनाप्रमुख राजेंद्र भगत, उपतालुका प्रमुख जिवाजी लगड, नगर तालुका पंचायत समितीचे सभापती सुरेखा संदीप गुंड, सरपंच शिवसैनिक व पदाधिकारी...
( छाया: सोहेल मनियार चिचोंडी पाटील )

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

शिवसंपर्क अभियानांतर्गत नगर तालुक्यात शिवसेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाचा शुभारंभ चिचोंडी पाटील येथे करण्यात आला.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,पंचायत समिती सभापती संदीप गुंड,मा.सभापती प्रविण कोकाटे,उपतालुकाप्रमुख प्रकाश कुलट,जिवाजी लगड,अजय बोरुडे,मा.सरपंच डॉ.मारुती ससे,मा.उपसभापती दत्तात्रय हजारे, कामधेनु पतसंस्था चेअरमन डॉ.ययाती फिसके,सोसायटी चेअरमन राजेंद्र कोकाटे,व्हा.चेअरमन काशिनाथ बेल्हेकर,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,पंडित कोकाटे,आदिनाथ कोकाटे,चंद्रकांत सदाफुले,सुरेश ठोंबरे,सोसायटी संचालक भाऊसाहेब वाडेकर,अजय कांकरिया,उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे,भगवान पवार,महादेव खडके,दत्ता जाधव,बाबासाहेब शेंडकर,जयसिंग दळवी,शशिकांत आगलावे,ग्रामपंचायत सदस्य विश्वसागर कोकाटे,महादजी कोकाटे,संदीप काळे,प्रशांत कांबळे,माऊली ठोंबरे,राजूभाऊ कोकाटे,बाबासाहेब परकाळे,वनाधिकारी किसनराव आगलावे,महादेव कोकाटे,गणेश इंगळे,दत्तात्रय कोकाटे,सुधीर कोकाटे,संजय शिंदे,दादासाहेब लगड,संजय ठोंबरे,बाळासाहेब खांदवे,अनिल चव्हाण,संतोष वाडेकर,रमेश कुलथे,गोरख वाडेकर,रघुनाथ कोकाटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मा.सभापती प्रविण कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो व मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा करता येते.जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत चिचोंडी पाटील येथे केलेल्या विविध कामांची त्याचप्रमाणे राबवलेल्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांनी 18 ते 20 वयोगटातील तरुणांना शिवसेनेत सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच गावातील जुन्या व नवीन शिवसैनिकांनी समन्वयाने जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले.चिचोंडी पाटील व शिवसेना यांचे अतूट नाते असून या गावाने कायमच शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्य दिल्याचे आवर्जून सांगितले. 

शिवसंपर्क अभियान तालुकाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांनी दिली.तसेच यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मिळालेल्या पदामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत झाली असे सांगून जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मारुती ससे यांनी केले व आभार भगवान पवार यांनी मानले.



ओबीसी बाराबलुतेदार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड


ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकारी...(छाया: सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील: (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील प्रकाश जाधव यांची ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने प्रकाश जाधव यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.

मातंग समाज पंच कमिटी जिल्हा अध्यक्ष साहेबराव पाचारणे, माणिकराव वाघ यांनी संघटनेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. समाजोपयोगी काम करा, लोकांचे प्रश्न सोडवा ,आपल्या पदाचा लोकहितासाठी वापर करा असे मार्गदर्शन केले.

ओबीसी बारा बलुतेदार समाजातील लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली.

याप्रसंगी मातंग समाज पंच कमिटीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचरणे पाटील, माणिकराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू धुळे, अनिल बर्डे,तालुका कार्याध्यक्ष महादेव पवार,मेजर संतोष वाघ, साईनाथ बर्डे,छबाबाई काळे, रशिदा शेख,शिवाजी ससाने, वाटाडे सर,भानुदास माळी, मच्छिंद्र बाळू माळी, बाबासाहेब बर्डे, सुभाष वाघ आदींनी प्रकाश जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.