Friday, September 17, 2021

हरिभाऊ कर्डिले बनले गोरगरिबांचे कैवारी-मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्रमंडळ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात नेत्र तपासणी करताना. या प्रसंगी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले आदी (छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळाच्यावतीने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते विष्णू खांदवे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्रमंडळ आयोजित के.के.आय बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमाने २३६ वे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की कोरोणा काळात सर्वत्र रुग्ण संख्या वाढत असल्याने ज्यांना मोतीबिंदू डोळ्यांचे आजार आहेत अशा रुग्णांनी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रुग्णालयात जाणे टाळले. नेत्र रुग्णांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर चे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे चिचोंडी पाटील येथे आयोजन केले आहे. गोरगरिबांची सेवा करण्यात हरिभाऊ कर्डिले नेहमीच पुढाकार घेतात.हरीभाऊंचा मुलगा आजारी असून  रुग्णालयात आहे तरीही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी हरिभाऊंनी या शिबिराचे आयोजन केले. यापूर्वी वाकोडी येथे मोफत मोतीबिंदू शिबिर घेतले त्यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून उपचार केले.शस्त्रक्रिया केली, मोफत चष्म्यांचे वाटप केले. हरिभाऊ कर्डिले हे जनसामान्यांचे कैवारी ठरले आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभरात ८० कोटी लोकांना मोफत लस दिली,रेशन दुकानातून ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप केले, देशातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा होत आहेत,उज्वला गॅस योजना अंतर्गत आठ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन दिले,तीन कोटी पेक्षा जास्त लोकांना घरकुल निर्मिती करून दिली,शौचालय दिल्यामुळे देशातील सहा लाखापेक्षा जास्त गावे हागणदारीमुक्त झाली, जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवला,अतिरेक्यांचा नाश सर्जिकल स्ट्राइक केले, जनधन योजना अंतर्गत ४३ कोटी लोकांचे बँकेत खाते उघडले अशी अनेक लोकोपयोगी कामे भारतीय जनता पार्टी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. काही पुढारी मंडळींना आमच्यावर आरोप करणे शिवाय दुसरी कामेच नाहीत. त्यांनी ज्या चोऱ्यामाऱ्या केल्यात,जिल्हा परिषद मध्ये जी टक्केवारी गोळा केली ती झाकण्याचा प्रयत्न होतोय .त्याचा आरोप आमच्यावर करण्याचं काम काही पुढारी मंडळी करत आहेत.आम्ही मनाचा मोठेपणा ठेवून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीला माजी खासदार कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती असे नाव दिले.त्याचं सुद्धा त्यांना दुःख झालं.ज्यांच्या मतांवर ते निवडून आले त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहण्याचे काम त्यांनी केलं नाही. प्रताप शेळके यांची सीना वाहतूक दूध संघ ही संस्था होती. जिल्हा बँकेने पैसे दिले. ४ कोटी रुपये पैकी ३ कोटी रुपये सीना वाहतूक दूध संघ या संस्थेला घेतले. ज्यांनी  हे उद्योग केले तेच मात्र स्वतःच झाकवण्यासाठी आमच्यावर आरोप करतात. एखाद्या शिपाया सारखं सकाळी जिल्हा परिषद उघडायला जातात आणि जिल्हा परिषद बंद करेपर्यंत तिथेच हजर असतात यापलीकडे त्यांना काम नाही.आमच्यावर टीका करण्याआधी तुमचे योगदान दाखवा. महाराष्ट्रात एक नंबरची मार्केट कमिटी उभारण्याचे काम कोतकर साहेब व काका यांच्या माध्यमातून केले. कुठेतरी आरडाओरडा करायचा, कुठेतरी आंदोलन करायचं यातून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न काही पुढारी मंडळी करीत असल्याचे शिवाजीराव कर्डिले म्हणाले. तुम्ही धंदे काय करतात तुमचे क्रेशर कसे चालतात,कोठून डबर वाहून आणतात,किती रॉयल्टी भरतात,यांतून किती पैसे मिळवतात हे जर आम्ही उघडकीस आणलं तर त्यांना जेलमध्ये जाऊन बसावे लागेल. परंतु आम्ही तसं काम करत नाहीत.आपल्या कामाशी काम ठेवून जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत.पंधरा वर्षात बँकेत आम्ही जेवढे काम केले तेवढे काम आतापर्यंत कोणी केले नाही.शेतकरी हाच केंद्रबिंदू समजून त्यांच्या हिताचे काम आम्ही आतापर्यंत करत आलो आहोत.इथून पुढे देखील बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. नगर तालुक्याने मला पंधरा वर्षे आमदार केले त्याचा विसर मी कधी पडू देणार नाही असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले म्हणाले की कोरोनाव्हायरस महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना डोळ्यांचे आजार, तिरळेपणा,लासुर,मोतीबिंदू पडदा या सारख्या आजाराने त्रस्त झाले असून मोतीबिंदू मुळे काही रुग्णांना दृष्टी गमावण्याची वेळ आली असल्याने त्यांना पुन्हा दृष्टी मिळावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील रुग्णांची सेवा करता यावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले असल्याचे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,शिबिराचे आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते विष्णू खांदवे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के,भाजपा नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे,भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीपराव भालसिंग,शिक्षक नेते पंडित सर,भाजपा किसान मोर्चा चे चिटणीस बबनराव शेळके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबापाटील खर्से,उद्धवराव कांबळे,बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव,बन्सी कराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव हजारे,डॉ.निक्रड,दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप, माजी जि.प.सदस्य बापू सदाफुले,सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कोकाटे,व्हा. चेअरमन काशिनाथ बेल्हेकर, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष अर्चना चौधरी,पत्रकार सोहेल मनियार,दशमिगव्हाणचे उपसरपंच बाबासाहेब काळे, उपसरपंच पोपटराव शेळके,माजी सरपंच भाऊसाहेब काळे,माजी उपसरपंच पांडुरंग निमसे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशराव पिंपळे यांसह तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ,गोरगरीब रुग्ण उपस्थित होते. केके बुधरानी हॉस्पिटल पुणे यांचे डॉ. गिरीश पाटील,माया आल्हाट,मीरा पठारे, मनीषा कोरडे,आदींनी रुग्णांची तपासणी केली.गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांनी हरिभाऊ कर्डिले यांना भरभरून आशीर्वाद दिले.



No comments:

Post a Comment