रुईछत्तीसी येथे शिवसेना शाखा नूतनीकरण व फलक अनावरण कार्यक्रम
गाव तिथे शाखा अभियान अंतर्गत रुईछत्तीसी येथे फलकाचे अनावरण करताना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, जि.प.सदस्य संदेश कार्ले,शरद झोडगे,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,माजी सभापती प्रवीण कोकाटे, प्रवीण गोरे यांसह उपस्थितीत शिवसैनिक (छाया: सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे गाव तिथे शाखा अभियानांतर्गत फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गावामध्ये शिवसेना शाखेचा फलक दिसल्यानंतर सर्वसामान्य माणसाला आधार मिळतो अनुभव अनेक वर्षे सर्वांनी घेतला आहे. त्यामुळेच आता नगर तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेना शाखा व फलक बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रुईछत्तिशी गावाने जिल्हा परिषद,पंचायत समितीला शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे. आता बाजार समितीची सत्ता ही महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. बाजार समितीतील सत्ताधाऱ्यांनी केलेला मोठा भ्रष्टाचार जगजाहीर आहे. रिकाम्या जागा, शौचालय कोंडवाड्याच्या ठिकाणी गाळे बांधून ते विकण्याचा उद्योग चालू आहे. संचालक मंडळ केवळ नामधारी असून सर्व कारभार एकाच व्यक्तीच्या हातात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समिती वाचवण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. नगर तालुक्यातील जनतेने साथ द्यावी,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.
नगर तालुक्यात शिवसेनेने
गावागावात शिवसेना शाखा नूतनीकरण,फलक अनावरण कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत रुईछत्तीसी येथे शिवसेना फलकाचे अनावरण प्रा.गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जि.प.सदस्य शरद झोडगे, सभापती संदीप गुंड,उपसभापती डॉ. दिलीप पवार,युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे, माजी सभापती प्रवीण कोकाटे,नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत,रवींद्र भापकर,किरण भापकर,प्रकाश कुलट,सोमा पोकळ,आदिनाथ नवसुपे, संजू भोर,संपत वाघमारे आदी उपस्थित होते.
प्रा.गाडे पुढे म्हणाले की,शिवसेना म्हणजे विश्वासाचे नाव आहे. नगर तालुका पंचायत समिती अनेक वर्षापासून शिवसेना व महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे.या माध्यमातून दर्जेदार कामे करण्यावर भर दिला जातो. त्यामुळेच इतक्या वर्षात कोणालाही आमच्या कारभारावर बोट ठेवता आलेले नाही. लोकांसाठीची कामे भ्रष्टाचारमुक्त व दर्जेदार व्हावीत हाच शिवसेनेचा प्रयत्न असतो. रुईछत्तिशी परिसरात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ग्रामस्थांनी एकत्रित बसून सोडवावा.नंतर कामासाठी निधी थेट मुंबईहून मंजूर करून आणू,अशी ग्वाही त्यांनी दिली.
तालुकाप्रमुख राजेंद्र भगत म्हणाले की प्रा.गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात शिवसेना अतिशय समक्षपणे काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते हे सर्वांना माहीत आहे. तालुक्यात संघटना मजबूत करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी जि.प. सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले म्हणाले की बाजार समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तो जनतेसमोर आणण्याचे काम आम्ही करत आहोत.सर्वसामान्य जनतेला, शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले.जि. प.सदस्य शरद झोडगे यांनी शिवसेनेच्या पाठीमागे सर्वांनी खंबीर पणे उभे रहा असे आवाहन केले. कार्यक्रमास राजकुमार गोरे, बिभीषण सपाटे,नाथ महाराज, माणिक गोरे,प्रभाकर गोरे,राहुल कुंजीर,संजू बोरकर,अजिनाथ नवसुपे,सोमनाथ गोरे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:
Post a Comment