Friday, April 29, 2022

१ कोटी ९७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर ; सरपंच मनोज कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश ; जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिचोंडी पाटीलचा होणार कायापालट

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनिया


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्वकांक्षी अशी समजली जाणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिचोंडी पाटील गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९७ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला.


यामुळे निश्चितच चिचोंडी पाटील गावचा कायापालट होणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.


यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, चिचोंडी पाटील गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सण २००५ साली कार्यन्वित झाली. सदर योजनेतून वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा व्हावा, सद्य परिस्थितीच्या लोकसंख्येचा विचार करून योजनेमध्ये सुधारणा व्हावी 


तसेच पाण्याची साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची होती. त्याच मागणीचा विचार करून ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार श्री.बबनराव पाचपुते यांच्याकडे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा 


अशी विनंती केलेली होती. त्याच मागणीनुसार व ग्रामपंचायतच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे सदर निधी मंजूर झाला असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.


सदर निधीतून गावामध्ये दोन अतिरिक्त पाण्याच्या टाक्या, प्रत्येक वाडी व वस्तीवर पाणी पुरवठा योजना व सध्याच्या फिल्टर प्लांट मध्ये सुधारणा होणार असून यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून पाणी पुरवठा होण्याचा कालावधी कमी होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


सदर निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, आमदार श्री.बबनराव पाचपुते, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आनंद रुपनर, श्री.हजारे, श्री.गोरे, श्री.सोनार, श्री.येवले, ग्रामविकास अधिकारी श्री.मोरे या सर्वांचे सरपंच मनोज कोकाटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.



Monday, April 25, 2022

सूर्यभान पाटोळे यांचे निधन


सूर्यभान पाटोळे यांचे अल्पशा आजाराने निधन                  

नगर-प्रतिनिधी

नगर औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहा जवळील रहिवासी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त मॅनेजर सूर्यभान रंगनाथ पाटोळे यांचे शुक्रवारी (22एप्रिल) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

ते 75 वर्षांचे होते.                               जेऊर बायजाबाई या मूळ गावी ख्रिस्ती धर्मा प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

त्यांच्या मागे पत्नी,2मुले,2भाऊ,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्व. सूर्यभान हे धार्मिक मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



Sunday, April 24, 2022

सर्वांनी सण,उत्सव शांततेत साजरे करावेत- स.पो.नि.राजेंद्र सानप ; रमजान ईदनिमित्त शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन

 

चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे रमजान ईदनिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली.चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थ जातीय सलोख्याने, बंधुभावाने राहतात.यामुळे गावातील सामाजिक वातावरण चांगले राहते.


लोकांमध्ये सहकार्याची, दुसऱ्या धर्माचा आदर करण्याची भावना आहे असे प्रतिपादन नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.


येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन उत्साहात, शांततेच्या वातावरणात, जातीय तेढ, वाद-विवाद निर्माण न करता,

जातीय सलोखा,सद्भावना व शांतता ठेवून,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आशा वातावरणात सण उत्सव साजरे करावेत असे आवाहनही स.पो.नि. राजेन्द्र सानप यांनी केले.


याप्रसंगी नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना नेते इंजिनीयर प्रवीण कोकाटे यांनी चिचोंडी पाटील या गावात हिंदू-मुस्लीम एकतेने राहतात,रमजान ईद शांततेत व हिंदू मुस्लीम भाईचारा निर्माण होईल अशा वातावरणात साजरी होईल असे सांगितले,


शांतता कमिटीच्या बैठकीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच बाजीराव हजारे,माजी सरपंच कासमशेठ सय्यद,पत्रकार सोहेल मनियार,


मुजाहिद मनियार,पोलिस पाटील संतोष खराडे, महेमूद शेख,जब्बार खान सर,खुद्दुस सय्यद,जहांगीर मनियार,इम्रान अत्तार, फारुख सय्यद,बाबूशेठ सय्यद,मदिना मस्जिद कमिटी,दायरा मस्जिद कमिटी,जमिया मस्जिद कमिटी चे सदस्य उपस्थित होते. 


चिचोंडी पाटील गावात आजपर्यंत कुठलाही जातीय वाद, तणाव निर्माण झाला नाही व यापुढील काळातही  होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थ घेत आहेत. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली.




चिचोंडी पाटील साठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर ; सरपंच मनोज कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश

 


चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजनेअंतर्गत चिचोंडी पाटील गावासाठी निधी उपलब्ध व्हावा

 अशी मागणी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने मा.आ.निलेशजी लंके  यांच्या मार्फत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.श्री.धनंजय मुंढे  यांच्याकडे करण्यात आलेली होती.


त्याच मागणीनुसार चिचोंडी पाटील गावासाठी २० लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये १० लक्ष रुपयांचे रस्ता काँक्रीटीकरण व १० लक्ष रुपयांच्या बंदिस्त गटार कामाचा समावेश आहे.


सदर कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री मा.ना.धनंजयजी मुंढे , मा.आ.निलेशजी लंके

ज्यांचे विशेष सहकार्य लाभलेले असे मा.ना.धनंजयजी मुंढे  यांचे स्वीय सहाय्यक पंडितराव खेडकर यांचे चिचोंडी पाटील ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने विशेष आभार सरपंच मनोज कोकाटे यांनी मानले.



Saturday, April 23, 2022

पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न ; वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी -डॉ.बंगेरा

 

डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी व आयआयटी खरगपुर यांच्या संयुक्त विद्यमाने झोनल सेंटर कार्यशाळा प्रमाणपत्र प्रशिक्षण संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शक डॉ.सुधाकर बंगेरा, डॉ.करीशेट्टी बसप्पा, प्रा.अनुराधा चव्हाण, प्रा.सुरेखा बारवाल, प्रा. रोशनी सूर्यवंशी, डॉ.रेखाराणी खुराणा आदि. (छाया : विजय मते)

 नगर - प्रतिनिधी


प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर घडविण्यासाठी जीवनात चांगल्या उच्च पदावर जाण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द यांची सांगड घालून विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे.


नोकरी करणारांसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तज्ञांची आवश्यकता असते तसेच स्वत:चा व्यवसाय करु इच्छित असाल तर त्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी आपण फार्मसी क्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन हैद्राबादच्या प्रोफेशनल क्लिनिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉ.सुधाकर बंगेरा यांनी केले.


सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी व आयआयटी खरगपुर यांच्या संयुक्त विद्यमाने झोनल सेंटर कार्यशाळा प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम फार्माकोव्हीजीलन्स नुकतेच कॉलेजमध्ये संपन्न झाले.


यप्रसंगी हैद्राबादच्या प्रोफेशनल क्लिनिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉ.सुधाकर बंगेरा यांनी फार्माकोव्हीजीलन्सबद्दल पायाभूत आणि करिअर विषयी व  कर्नाटकचे प्रोफशनल ट्रेनर क्लिनिक रिसर्च फार्माकोव्हीजन्सचे डॉ.करीशेट्टी बसप्पा यांनी फार्मसी विषयक मेडिकल कोडिंगबद्दल सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.


या कार्यशाळेत 49 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील गुणवंत विद्यार्थ्यांची आयआयटी खरगपुर या ठिकाणी होणार्‍या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.


कर्यक्रमाचे नियोजन प्रा.अनुराधा चव्हाण, प्रा.सुरेखा बारवाल, प्रा. रोशनी सूर्यवंशी यांनी केले.


त्यांना संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व पदाधिकारी तसेच बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांचे मार्गदर्शन लाभले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणाली अनमल यांनी केले तर आभार प्रा.भक्ती बिडवे यांनी मानले.



डिझेलचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांना प्रति एकरी डिझेल अनुदान द्यावे - सुधीर भद्रे

 

चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार


डिझेलचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांना प्रति एकरी डिझेल अनुदान द्यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष श्री . सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे .

शेतकरी सध्या येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे . यामध्ये सर्वप्रथम जमिनीची नांगरट करून उन्हामध्ये जमीन तापू द्यावी लागते .


नांगरट केल्यामुळे हानीकारक बुरशीचा नाश होतो व तणांचे प्रमाणही कमी होते . मात्र डिझेलचे शंभरी पार केलेले दर पाहता या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेती पडीक राहू शकते . 


पडजमीनीमुळे अन्नधान्य उत्पादनामध्ये घट येऊन राष्ट्रीय उत्पन्न बुडेल .शेतीवर ज्या शेतमजुरांना रोजगार दिला जातो अशा मजुरांचीही उपासमार होईल .


सध्या नोकऱ्या नसल्यामुळे अनेक शिक्षित व अशिक्षित तरुण मुलांनी शेती मधील पिक काढणी, खुरपणी, इत्यादी कामे करण्यासाठी टोळ्या बनविलेल्या आहेत . 


रोजगार न मिळाल्यास बेरोजगारी वाढून शेतीकाम करणाऱ्या  टोळ्या गुन्हेगारी टोळ्या बनु शकतात . शासन आपल्या देशात कमी प्रमाणात उत्पन्न होत असल्यामुळे अनेक प्रकारचे अन्नधान्य आयात करते .


शेती पडीक राहिल्यास आयातीमधे आणखी वाढ करावी लागेल . पर्यायाने देशावरील कर्जाचा डोंगर वाढतच जाईल आणि इकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यांमध्ये वाढ होईल . 


यासाठी केंद्र व राज्य सरकारने डिझेलवर अनुदान देऊन शेतकऱ्यांना नांगरट व इतर शेती मशागतीसाठी येणाऱ्या खर्चासाठी हातभार लावावा


अशी मागणी कारभारी गवळी, अशोक सब्बन, अशोक ढगे , कैलास पठारे भगवान जगताप ,सुनील टाक व जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर भद्रे यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे