Saturday, April 23, 2022

डिझेलचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांना प्रति एकरी डिझेल अनुदान द्यावे - सुधीर भद्रे

 

चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार


डिझेलचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांना प्रति एकरी डिझेल अनुदान द्यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष श्री . सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे .

शेतकरी सध्या येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे . यामध्ये सर्वप्रथम जमिनीची नांगरट करून उन्हामध्ये जमीन तापू द्यावी लागते .


नांगरट केल्यामुळे हानीकारक बुरशीचा नाश होतो व तणांचे प्रमाणही कमी होते . मात्र डिझेलचे शंभरी पार केलेले दर पाहता या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेती पडीक राहू शकते . 


पडजमीनीमुळे अन्नधान्य उत्पादनामध्ये घट येऊन राष्ट्रीय उत्पन्न बुडेल .शेतीवर ज्या शेतमजुरांना रोजगार दिला जातो अशा मजुरांचीही उपासमार होईल .


सध्या नोकऱ्या नसल्यामुळे अनेक शिक्षित व अशिक्षित तरुण मुलांनी शेती मधील पिक काढणी, खुरपणी, इत्यादी कामे करण्यासाठी टोळ्या बनविलेल्या आहेत . 


रोजगार न मिळाल्यास बेरोजगारी वाढून शेतीकाम करणाऱ्या  टोळ्या गुन्हेगारी टोळ्या बनु शकतात . शासन आपल्या देशात कमी प्रमाणात उत्पन्न होत असल्यामुळे अनेक प्रकारचे अन्नधान्य आयात करते .


शेती पडीक राहिल्यास आयातीमधे आणखी वाढ करावी लागेल . पर्यायाने देशावरील कर्जाचा डोंगर वाढतच जाईल आणि इकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यांमध्ये वाढ होईल . 


यासाठी केंद्र व राज्य सरकारने डिझेलवर अनुदान देऊन शेतकऱ्यांना नांगरट व इतर शेती मशागतीसाठी येणाऱ्या खर्चासाठी हातभार लावावा


अशी मागणी कारभारी गवळी, अशोक सब्बन, अशोक ढगे , कैलास पठारे भगवान जगताप ,सुनील टाक व जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर भद्रे यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे 



No comments:

Post a Comment