"महाधन" तर्फे आयोजित कांदा पिक कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिकारी...(छाया : सोहेल मनियार)
पारनेर : (प्रतिनिधी)
कांदा पिकासाठी बाजारात नव्याने आलेल्या क्रॉपटेक ८:२१:२१ खताच्या वापरामुळे झालेले फायदे शेतकऱ्यांना दाखवून देण्यासाठी
महाधन कंपनीचे DGM BTL मार्केटिंग (कांदा तज्ञ् ), संभाजी बेरड , वरिष्ठ विक्री व्यवस्थापक ओंकार पडवळ, मार्केटिंग मॅनेजर उम्मीद मुजावर, साखरे ऋषिकेश, नांगरे प्रविण , दत्ता फरांडे
तसेच महाधनचे सहविक्रेते अतुल मुळे व सारथी शेतकरी श्रीमती. मोनिका प्रमोद मुळे यांनी महाधन क्रॉपटेक कांदा पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन तर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये अधिकाऱ्यांनी शेतकरी व व्यापारी यांना मार्गदर्शन केले.
महाधन क्रॉपटेक कांदा पिकाला वापरल्यामुळे खतावरील खर्च २०% पर्यंत कमी झाला, ८५-९०% कांदा (अ) व (ब) ग्रेडचे तयार झाले, १०ते १२% अधिक उत्पादन मिळाले, ५ ते ६ महिन्यापर्यंत कांदा चाळीमध्ये चांगला टिकतो. हे फायदे संभाजी बेरड यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच उस पिकासाठी आलेल्या क्रॉपटेक ऊस या उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना कांदा पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन अधिकाऱ्यांनी त्यावर योग्य मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या.कांदा पीक लागवडीची योग्य पद्धत, योग्य प्रमाणावर खते,पाण्याचे उत्तम व्यवस्थापन,कांदाचाळी मध्ये कशाप्रकारे साठवावा आदी विषयांवर मार्गदर्शन केले.या कांदा पीक कार्यशाळेस शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








No comments:
Post a Comment