Friday, April 15, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन ; जयंतीनिमित्त मुलांना शालेय साहित्याचे वाटप

 

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

तुम्ही, जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही, जर संघटीत होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तर न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना मात्र माणसाला माणुसकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा,


असा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन दशमीगव्हाण च्या सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांनी केले.

नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, समाजमंदिर या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


जयंतीचे औचित्य साधून शाळेतील मुलामुलींना वही व पेन चे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी सरपंच संगीता उद्धवराव कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे,चेअरमन बाळासाहेब काळे,व्हाईस चेअरमन गंगाधर काळे,विजय काळे ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत काळे बाळासाहेब काळे जयसिंग काळे, शिवाजी काळे पोपट कांबळे,लक्ष्मण शिंदे,पोलीस पाटील जयसिंग काळे,उत्तम कांबळे,बाबासाहेब कांबळे,संजय कांबळे,शुभम कांबळे,सुरेश कांबळे,सोमीनाथ चंदनशिव, ग्रामविकास अधिकारी शेळके भाऊसाहेब,अजय भद्रे सर, साईनाथ काळे, किरण काळेकानिफ गायकवाड, पंढरीनाथ कांबळे आदि उपस्थित होते.


   
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे म्हणाले , माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाफ घडवून बिन चेहर्‍याचे आयुष्य जगत असलेल्या वंचितांना अस्मितेची ओळख मिळवून दिली. 


शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाबरोबर समतेचे सत्य, प्रज्ञेचे पाईक आणि करुणेचा कलश म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. 


त्यांच्या जयंतीनिमित्त ही विचारांची प्रेरणा आपण प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.  

नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी सरपंच संगीता उद्धवराव कांबळे,माजी संचालक उद्धवराव कांबळे, शुभम कांबळे आदि. (छाया : सोहेल मनियार)


No comments:

Post a Comment