Wednesday, October 19, 2022

पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या- सुधीर भद्रे

 

महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देताना सुधीर भद्रे व शेतकरी बांधव...

( छाया:सोहेल मनियार चिचोंडी पाटील )

चिचोंडी पाटील ( वार्ताहर ) 

नगर तालुक्यात व चिचोंडी पाटील मंडळामध्ये गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी


अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुधीरदादा भद्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सुधीर भद्रे यांच्या नेतृत्वाखाली चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.


तलाठी व मंडळाधिकारी यांना सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.सर्व शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून, शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.



Sunday, October 16, 2022

सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 12 टक्के लाभांश वाटप

 

 सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना १२ टक्के लाभांश वाटप करताना चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळ...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)


चिचोंडी पाटील सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये झालेल्या नफ्यातून 12% लाभांशचे वाटप पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे मा.सरपंच राजूशेठ हजारे व मा.सरपंच शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर होते.संस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळी भेट म्हणून एकूण ९ लक्ष २५ हजार रुपये रकमेचे लाभांश वाटप करण्यात आले.या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले व संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांचे ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. दिवाळी सण जवळ आला असताना लाभांश वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.


चिचोंडी पाटील सेवा सहकारी संस्था कायमच सभासद हिताचे निर्णय घेत असते व सोसायटी शेतकऱ्यांना न्याय देण्यास समर्थ असल्याचे प्रतिपादन यावेळी मा.सभापती प्रविण कोकाटे यांनी केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केले तरच संस्थेस नफा होतो व त्यामुळेच लाभांश वाटप करणे शक्य होते. शेतकऱ्यांना वेळेवर लाभांश मदत मिळाल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी संस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक मंडळाचे आभार मानले.


यावेळी कामधेनू पतसंस्थेचे चेअरमन डॉ.ययाती फिसके,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,सोसायटी चेअरमन महादेव खडके,व्हाईस चेअरमन डॉ.मारुती ससे,अंबादास फिसके,संदीप कोकाटे, दिलीप पवार,पंडित कोकाटे,विठ्ठल देवा कोकाटे,बबन कोकाटे,सुरेश ठोंबरे,महेश पाटील जगताप, कासमशेठ सय्यद,काशिनाथ बेल्हेकर, चंद्रकांत सदाफुले,अर्जुन वाडेकर, काशिनाथ वाडेकर,सचिव दत्ता झांबरे, रघुनाथ कोकाटे,तात्या देवकर, रावसाहेब कोकाटे,अब्बास पठाण गुरुजी,शेषराव ठोंबरे,अनिल कोकाटे, प्रशांत लबडे,जगन्नाथ ठोंबरे,कल्याण कोकाटे,खंडू मांढरे, पोपट कोकाटे,शंकर देशमाने, तुळशीराम कोकाटे,संजय कोकाटे, संजय दानवे,बाबासाहेब काळे आदींसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.