पेट्रोल डिझेल या पारंपारिक इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असताना आता वाहनचालकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत असल्याचं दिसतंय.
पेट्रोल डिझेल या पारंपारिक इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असताना आता वाहनचालकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत असल्याचं दिसतंय.
कोरोना काळात महिलांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी जिम सुरू करण्यात आली आहे.स्मार्ट ग्राम आठवड येथील ओपन जिम मध्ये उत्स्फूर्तपणे व्यायाम करताना महिला...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती
आज कोरोणाच्या काळात प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे त्यासाठी आवश्यकता आहे ती दररोज व्यायामाची.नियमितपणे व्यायाम केल्याने आरोग्य उत्तम राहते.
नगर तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त आठवड येथे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेमधून खुले व्यायाम साहित्य मिळाले आहे.
कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर त्यासाठी नियमितपणे व्यायाम गरजेचा आहे.स्मार्ट ग्राम आठवड येथे शासकीय योजनेतून मिळालेल्या साहित्याचा वापर करुन महिलांसाठी ओपन जिम ची सुरुवात केली आहे.हिरवाईने नटलेल्या आठवडच्या निसर्गरम्य परिसरात पहाटे व्यायाम करण्यासाठी महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.नियमित व्यायाम केल्याने आळस नाहीसा होऊन गावातील महिलांना कामामध्ये स्फूर्ती वाढत असून प्रसन्नता जाणवत आहे.
यापूर्वी गावामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे व्यायाम करता येत नव्हता.उद्योजक विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड गावचे सरपंच राजेंद्र मोरे हे गावचा विकास उत्तम प्रकारे करीत असून त्यांच्यामुळे आज महिलांना याठिकाणी स्वतंत्रपणे व्यायाम करण्याची संधी मिळत आहे आणि यामधून महिलांचे आरोग्य ठणठणीत राहणार आहे. शारीरिक व्याधी,हाडांचे त्रास, मणक्यांचे त्रास,वाढलेले वजन स्थूलता यातून नक्कीच कमी होणार आहे.उद्योजक विजय मोरे व सरपंच राजेंद्र मोरे यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे गावाचा कायापालट होत आहे अशी प्रतिक्रिया महिलांकडून मिळाली.या ठिकाणी महिलांना व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते.आठवड गावामध्ये स्वतंत्रपणे महिलांना व्यायाम करण्यासाठी जिमचे साहित्य उपलब्ध झाले त्याबद्दल महिलांनी उद्योजक विजय मोरे व सरपंच राजेंद्र मोरे यांचे आभार मानले.
प्रतिक्रिया-
शासनाच्या व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेमधून व्यायाम साहित्य आम्ही उपलब्ध करून महिलांसाठी ओपन जिमची सुरुवात केली.गावातील महिला रोज पहाटे व्यायाम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे येतात.यापूर्वी गावात महिलांच्या आरोग्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती. जिम सुरू केल्यामुळे महीलांची रोगप्रतिकार शक्ती,आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.आज गावात सर्वत्र स्वच्छता,पाणीपुरवठा, हागणदारीमुक्त गाव,कचऱ्याचे व्यवस्थापन पाहावयास मिळते. उद्योजक विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड गावचा विकास आम्ही करत आहोत.
- सरपंच
राजेंद्र मोरे ,आठवड
शिक्षक संघ-कामात दंग
अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
धाकटी पंढरी,स्वयंभू कपारीचा विठोबा तीर्थक्षेत्र नांदूर येथील मंदिर..(छाया: सोहेल मनियार चिचोंडी पाटील)
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी):अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदूर विठ्ठलाचे येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपारीच्या विठोबाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने विठ्ठल भाविकांचा हिरमोड झाला.मंदिराला कुलूप असल्याने भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही.
आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नांदूर येथील कपारीच्या विठोबाची यात्रा सालाबादप्रमाणे दरवर्षी भरते. हजारो भक्तांच्या, दिंड्यांच्या उपस्थितीत,विठ्ठल नामाचा जयघोष करीत, टाळ, मृदुंग,पखवाज यांनी दुमदूमनारे रस्ते,पायवाटा,मंदिर परिसर, हजारो भाविक दिंडीत सहभागी होऊन,विठ्ठलाचा नामघोष करत, पायी चालत येऊन तसेच काही भाविक वाहनाने धाकटी पंढरीला, स्वयंभू पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने येतात परंतु गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने, त्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ नांदूर यांनी विठ्ठल मंदिराला कुलूप लावले आहे. आजच्या आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटता आले नाही, दर्शन घेता आले नाही, पायीवारी करता आली नाही तरी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये हा विठ्ठल पांडुरंग वसलेला आहे. कोरोना रोगाच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस कॉन्स्टेबल मंजुळे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट दिसत होता.भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, मंदिर परिसरावर कोरोनाचे सावट पहावयास मिळाले.
विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ बलभीम विधाते यांनी सांगितले की आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रा भरत असते परंतु कोरोना महामारीमुळे व शासनाच्या आदेशामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात आपलं जवळचं कुणी तरी हरवलय अशी दुःखद भावना मनामध्ये येत आहे. या स्वयंभू पांडुरंगाला एकच साकडे आहे लवकरात लवकर या करोना पासून सर्वांना मुक्त कर, या कोरोनातून सर्वांना वाचव.सरपंच आजिनाथ विधाते यांनी सांगितले की,पांडुरंगाच्या दर्शनाला प्रत्यक्ष शरीराने जरी जाता आले नाही तरी मनाने घरूनच पांडुरंगाचे स्मरण करून, दर्शन घेऊन आषाढी वारी करावी, या कोरोनाचा लवकरच नायनाट होवो, पांडुरंगच सर्वांचे रक्षण करणार आहे अशी देवाकडे मागणी केली.
याप्रसंगी सरपंच आजिनाथ विधाते, ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ विधाते,मा.सरपंच तथा विश्वस्त संजय विधाते,ट्रस्टचे विश्वस्त अमृत खिळकर,प्रा.कारभारी विधाते,पप्पू गवळी,राजू विधाते सर,उद्धव राऊत सर,शिवाजी गायकवाड,कैलास गुरव,विठ्ठल मंदिर ट्रस्ट व सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत नांदूर भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याबाबत माहिती देत होते.विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.भाविकांचा हिरमोड झाला.
हा अपघात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.धडक देऊन वाहन अपघात स्थळी न थांबवता वाहनचालकाने अपघाताचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहन पळवून नेले.
नगर जामखेड राज्यमार्गावर चिचोंडी पाटील येथे वाहनाच्या अपघातात घोड्याचा मृत्यू...(छाया : सोहेल मनियार)
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरने गळफास घेतला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथील करंजी गावात ही घटना घडली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ.गणेश शेळके यांनी उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्या केली.घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यामध्येेे प्रशासनातील अनेक जणांची नावे आहेत.अधिकाऱ्यांचेे धाबे दणाणले असून पोलीस कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि 03/07/2021 रोजी 14/20 वा.चे सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला ता. कर्जत जि. अहमदनगर येथे यातील आरोपी हे गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आले. आरोपींकडून 48,020 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49,020 रु. किंमतीचा मुद्देमाल सह मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.क्लब मालक नामे स्वप्निल संभाजी कु-हाडे हा याच्यासह खालील नमूद 21 आरोपींवर पो.कॉ/ सुनिल दिलीप खैरे, ब.नं 616 नेम-कर्जत पोलीस स्टेशन यांचे फिर्यादी वरून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(1) गोटीराम दत्तात्रय अजबे, वय 30वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 2) शिवाजी भिमराव धोत्रे वय 34 वर्षे, रा.शिराळ ता. आष्टी जि.बीड 3) सुनिल विष्णु इंगळे वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 4 ) अशोक नामदेव जाधव वय-33 वर्षे, रा.घुमरी ता.कर्जत जि.अ.नगर 5 ) कैलास भाउसाहेब तनपुरे वय 44 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर 6) विलास | दगडु अजबे वय 43 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 7) बालाजी प्रभु कुदाले वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर 8) राजेंद्र हिरालाल शेळके वय 48 वर्षे, रा. लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 9) चंद्रकांत खुशाबा चांडे वय-30 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 10) मच्छिंद्र पांडुरंग दुधावडे वय 44 वर्षे, रा.लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 11 ) नवनाथ लक्ष्मण | लष्करे वय 32 वर्षे, रा. बहिरोबावाडी ता.कर्जत जि.अ.नगर 12) बाळु पांडुरंग पवार वय-32 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 13) कचरु दगडु आजबे वय 48 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 14) रेवनाथ भिमराव सरपते वय 42 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 15) महंमद युनूस शेख वय-36 वर्षे, रा. मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड 16) संभाजी शिवाजी कु-हाडे वय 49 | वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 17 हनुमंत सिताराम बुधीवंत वय-33 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि. बीड | 18) मच्छिंद्र धोंडीबा कर्डीले वय 52 वर्षे, रा. कडा ता.आष्टी जि.बीड 19) रतन बबन नलवडे वय-57 वर्षे, रा. हिंगणे ता.आष्टी | जि.बीड 20) राजेंद्र हिरालाल घोडके वय-50 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 21) स्वप्निल संभाजी कु-हाडे रा.मिरजगाव ता. कर्जत
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील, अहमदनगर जिल्हा मा.अपर पोलीस अधिक्षक,श्री सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग ,श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने यांनी केली आहे. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.
रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आ.बबनराव पाचपुते यांचे आभार मानताना मा.सभापती प्रवीण कोकाटे... (छाया:सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी): सोहेल मनियार
नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी चिचोंडी पाटील येथील पशु वैद्यकीय दवाखाना ते बेकरी पर्यंत तसेच जामा मस्जिद ते दायरा मस्जिद पर्यंतचा रस्ता कॉंक्रीटिकरणासाठी 10 लक्ष निधी मंजुर केला आहे. दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री तथा नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव (दादा) पाचपुते यांचे चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी आभार मानले.
या कामासाठी नगर तालुका पंचायत समिती मा.सभापती इंजि. प्रविणदादा पांडुरंग कोकाटे यांनी आमदार बबनदादा पाचपुते यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता
पशुवैद्यकीय दवाखाना ते विक्रीपर्यंत परिसर तसेच जामा मजीत ते दयारामजी पर्यंतच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना रस्त्याचा खूप त्रास होत होता.परंतु आता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
छत्रपती खासदार संभाजी महाराज यांची मराठा आरक्षणासंबंधी चिचोंडी पाटील ता. नगर येथे धावती भेट.
चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्वागत केले.
मराठा आरक्षणा संबंधी जामखेड येथे जात असताना चिचोंडी पाटील येथील धावती भेट दिली याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका या कोरोना काळाच्या महामारीत,सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची बाई म्हणजे अर्धवेळ परिचारिका होय.केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे 7 ते 8 तास रोज काम करते परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी 50 रुपये महिना ते आज मात्र 3 हजार रुपये महिना एवढाच वाढलेला आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 100 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने,2900/-- रुपये असे मानधन मिळते.
या महागाईच्या काळात 100 रुपये रोजाने कुणी काम करणार दुसरं मिळणार नाही.परंतु आज ना उद्या या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राब-राब,राबत,आहेत. कुठल्याही मोठ्या इमारतीच्या पायाचा प्रत्येक दगड जसा महत्वाचा असतो,त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत.त्यांची आजची अवस्था ही आई जेवू घालीना, आणि बाप भीक मागू देईना अशी झालेली आहे सदर प्रमुख मागण्या सिंदखेड राजा,(जिल्हा बुलढाणा) येथील PTL पदावर काम करत असताना सर्प दौंशाने मृत पावलेल्या गीता बुरकुल यांच्या मुलास शासनाने भरगोस मदत करावी तसेच मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता,अद्याप ही मिळालेला नाही.आणि आजही त्या,या कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचाही, प्रोत्साहन भत्ता देण्याची उपाययोजना करावी तसेच,आपण किमान वेतनानूसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी व यापुढील सर्व वेतन (मानधन)हे त्यांना ऑनलाइन पध्दतीने देण्याची व्यवस्था करावी व हे सर्व आपल्या कडून होत नसल्यास निदान आमचे प्रश्न मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री ,यांचे कडे तातडीने मांडावेत अशी मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शहेजान शेख, लता कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, किरण जावळे, उमेश करपे आदीसह परिचारिक महिला उपस्थित होते.
मागणी मान्य न झाल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने येणाऱ्या 5 जुलैला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.