Friday, July 23, 2021

प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा-सदिच्छा मंडळाची मागणी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


शिक्षक बँकेचे  विद्यमान संचालक मंडळाची मुदत मार्च 2021 रोजी संपलेली आहे तरीसुद्धा संचालक बोर्ड अनेक सभासद विरोधी निर्णय घेत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घड्याळ खरेदीत झालेला घोटाळ्याची 83 सहकार कायद्या अंतर्गत चौकशी चालू असल्यामुळे ती चौकशी निःपक्षपाती पणे व्हावी म्हणून संचालक बोर्ड बरखास्त करावे अशी मागणी सदिच्छा मंडळाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक याना करण्यात आली.

        मागील जवळपास पाच वर्षांपासून संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, याला वेळोवेळी सदिच्छा मंडळाने प्रखर विरोध केलेला आहे आता ही घड्याळ खरेदीची चौकशी 83 अंतर्गत चालू आहे त्यामुळे ही चौकशी निःपक्षपाती पणे व्हावी यासाठी हे मुदत संपलेले संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी आता सदिच्छा मंडळाच्या वतीने जोर धरू लागली आहे .
यासाठी नुकतीच सदिच्छा मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक साहेबांची भेट घेऊन बँकेत चालत असलेल्या गौरकरभराची चर्चा केली यावेळी शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, अनिल आंधळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष माधव हासे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, माजी व्हॉईस चेअर मन संतोष दळे, सरचिटणीस राजेंद्र बेहेळे, बाळकृष्ण कंठळी, राजेंद्र कुदनर , किशोर शिंदे,उपस्थित होते.


No comments:

Post a Comment