शिक्षक संघ-कामात दंग
अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मा.शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी खालील प्रश्नांबाबत चर्चा झाली
१) शिक्षकांचे वेतन . C M P प्रणालीने व्हावे
२) २४ वर्ष सेवा पूर्ण झालेल्यां शिक्षकांचे निवड श्रेणी साठी प्रस्ताव मागवावेत
३) वरीष्ठ श्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव मंजुर करावेन
४) तालुकास्तरीय प्रलंबित बिलासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे
५)५० % उपस्थितीचे धोरण जिल्ह्यात समान असावे६
६) अवघड शाळा निश्चिती लवकर करावी
७) पी. एफ फंड प्रस्ताव मंजुर करावेत
८) सन २०२० = २१ चे पी एफ पाव
त्या मिळाव्यात.
९) केंद्रप्रमुख बदल्या फक्त १५ मे२०१४ च्या शासन निर्णया प्रमाणे फक्त विनंती कराव्यात,
वरील प्रश्नां बाबत चर्चा करताना मा. शिंदे साहेब यांनी सांगितले की ' शिक्षकाचे महत्वाचे तीन प्रश्न उदया मार्गी . लागत आहे. तुम्ही मांडलेल्या एक एक प्रश्नाचा अभ्यास करून ते मार्गी लावण्याचा प्रयल चालू आहे,
cmp नुसार वेतन करण्यात काही अडचणी आहेत त्या ऑगस्ट अखेर दूर करण्याचा प्रयल करू,
निवड श्रेणी प्रसाव मागवून घेतो,
मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच केली जाईन
वरीष्ठ श्रेणीचे प्रस्ताव १५ऑगस्ट नंतर मार्गी लावू
शिक्षक 50% उपस्थिती बाबत बोलताना त्यांनी द्वि शिक्षकी शाळां बाबत एका शिक्षकाने शाळेत थांबावे व एकाने गृहभेट करावी,
शासन आदेश आल्या नंतर शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाईन. शिक्षक संघाने शाळा सुरु करण्याची मागणी केली त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले,
निवडश्रेणी व पी.एफ. पावल्या मिळणे बाबत १५ ऑगस्ट नंतर भेटा,
सर्वच प्रश्न टप्याटप्प्याने मार्गी लावले जातील.
आता शिक्षकांचे वेतन CMP होणार
.. पण ...
जालना जि.प प्रमाणे शिक्षक वेतन CMP ने होणार नाहीत.
तर नगर जिल्ह्यात cmp ची पुढील पायरी म्हणून *प्रायोगिक तत्वावर नगर जिल्हा प्रथमच थेट कोषागरातून शिक्षकांच्या खातेवर पगार जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. . त्यासाठी मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कोषागरातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी या बाबत सकारात्मक ता दाखवली आहे.
१५ ऑगस्ट नंतर शिक्षकांचे खाते कोषागरात अपडेट करून दिल्यास शिक्षकांचे वेतन थेट कोषागरातून बँकेत पाठवले जाईन
मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.धनराज आंधळे साहेब यांनी त्यांना भेटून सविस्तर चर्चेअंती आश्वासित केले.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर जी तांबे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभ त आहे.
मा. तांबे साहेब यांना शिक्षक संघाच्या वतीने मनापासून धन्यवाद.
शिक्षकांच्यां वेतनासाठी कोषागरातून थेट बँकेत वेतन जमा करणारा नगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिक्षक संघ संपूर्ण सहकार्य करील. आवश्यकता वाटल्यास खाते अपडेट करण्यास शालार्थ टिमचे तज्ञ शिक्षक सहकार्यासाठी शिक्षण विभागाला देवू
असे शिष्टमंडळाने मा आंधळे साहेब यांना सांगितले. ३१ ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे शेवटी मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगितले
शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या शिष्टमंडळात शिक्षक संघाचे नेते राजेंद्र शिंदे अनिल आंधळे,बाळासाहेब खिलारी,संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत ,शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन संतोष दळे राजेंद्र कुदनर ,संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ बेहळे ,किशोर शिंदे ,बाबा आव्हाड रहीमान शेख आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment