Friday, December 24, 2021

सरपंच संगीता उद्धवराव कांबळे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

 

नगर तालुक्यातील दशमिगव्हाण ग्रामपंचायत च्या सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर...(छाया : सोहेल मनियार)


चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी) 

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नगर शहरातील माऊली संकुल येथे पार पडला.

या सन्मान सोहळ्यात 51 सत्कार मूर्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नगर तालुक्यातील दशमिगव्हाण ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ.संगीता उद्धवराव कांबळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच संगीता उद्धव कांबळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल कांबळे यांना सन्मानित करण्यात आले स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा राज्यस्तरीय शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांनी गावपातळीवर आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरु डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज,कानसा वारणा  फाऊंडेशनचे संस्थापक दीपक दादा पाटील,संत मीराबाई आईसाहेब संस्थान बीड चे ह.भ. प.राधाताई सानप महाराज, आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील,महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ.राधेशाम गुंजाळ,ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, प्रख्यात शिवव्याख्याते विजयराव  तनपुरे महाराज,आदर्श गाव राळेगण सिद्धीचे युवा सरपंच लाभेल 

औटी, ग्रामसेवक युनियन  राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, समाजसेविका विजयाताई काचावार,आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनंजय विसपुते सर,आदर्श सरपंच रवींद्र महल्ले, समाजसेविका करुणा धनंजय मुंडे, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, देवगड ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ पावसे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक उद्धवराव कांबळे, ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत काळे,शिवाजी काळे,जयसिंग काळे, बाळासाहेब काळे, सोसायटीचे माजी चेअरमन विजय काळे, लक्ष्मण काळे,ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब,शुभम कांबळे यांसह  दशमिगव्हाण चे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य,प्रियदर्शनी महिला बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,युवा नेते बाबासाहेब पावसे ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 पत्रकार सोहेल मनियार

9284856967


Thursday, December 9, 2021

जेऊर गटातून मोकाटे यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी, जिल्हाप्रमुख यांनी केली मोठी घोषणा...

 

नगर:जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल.


त्यामुळे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विरोधकांनी गोविंद मोकाटे यांचे राजकीय भवितव्य संपवण्याचे षड्यंत्र आखले असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. विरोधकांचे कारणामुळे सर्वश्रुत असून जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातून मोकाटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी असेल असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी जाहीर केले.

 मांजरसुंबा येथे सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाबासाहेब हराळ,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे,प्रवीण कोकाटे,डॉ.राम कदम, पंढरीनाथ कदम, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे उपस्थित होते.

सोहेल मनियार पत्रकार

9284856967

Wednesday, December 8, 2021

सन फार्मा कंपनीला भीषण आग ; नगरच्या एमआयडीसीत बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

अहमदनगर  एमआयडीसी मधील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली.


ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती कंपनीत पसरली आहे. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. आग लागली त्या ठिकाणी काही कामगार काम करीत होते. त्यांची निश्चित संख्या समजू शकली नाही. आग लागली त्याच्याजवळ लिक्विड टँक आहेत. या टँकने पेट घेतला तर अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली. याची माहिती एमआयडीसी, अहमदनगर महानगरपालिकेला मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. व्हक्युम पंप फुटल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते. दरम्यान आगी बाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967