नगर तालुक्यातील दशमिगव्हाण ग्रामपंचायत च्या सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नगर शहरातील माऊली संकुल येथे पार पडला.
या सन्मान सोहळ्यात 51 सत्कार मूर्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नगर तालुक्यातील दशमिगव्हाण ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ.संगीता उद्धवराव कांबळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच संगीता उद्धव कांबळे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल कांबळे यांना सन्मानित करण्यात आले स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा राज्यस्तरीय शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.सरपंच संगीता उद्धवराव कांबळे यांनी गावपातळीवर आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरु डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज,कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक दादा पाटील,संत मीराबाई आईसाहेब संस्थान बीड चे ह.भ. प.राधाताई सानप महाराज, आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील,महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ.राधेशाम गुंजाळ,ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, प्रख्यात शिवव्याख्याते विजयराव तनपुरे महाराज,आदर्श गाव राळेगण सिद्धीचे युवा सरपंच लाभेल
औटी, ग्रामसेवक युनियन राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, समाजसेविका विजयाताई काचावार,आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनंजय विसपुते सर,आदर्श सरपंच रवींद्र महल्ले, समाजसेविका करुणा धनंजय मुंडे, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, देवगड ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ पावसे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक उद्धवराव कांबळे, ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत काळे,शिवाजी काळे,जयसिंग काळे, बाळासाहेब काळे, सोसायटीचे माजी चेअरमन विजय काळे, लक्ष्मण काळे,ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब,शुभम कांबळे यांसह दशमिगव्हाण चे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य,प्रियदर्शनी महिला बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,युवा नेते बाबासाहेब पावसे ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment