नगर:जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल.
त्यामुळे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विरोधकांनी गोविंद मोकाटे यांचे राजकीय भवितव्य संपवण्याचे षड्यंत्र आखले असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. विरोधकांचे कारणामुळे सर्वश्रुत असून जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर गटातून मोकाटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी असेल असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी जाहीर केले.
मांजरसुंबा येथे सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाबासाहेब हराळ,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे,प्रवीण कोकाटे,डॉ.राम कदम, पंढरीनाथ कदम, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे उपस्थित होते.
सोहेल मनियार पत्रकार
9284856967
No comments:
Post a Comment