नगर तालुक्यातील स्मार्ट ग्राम आठवड च्या उपसरपंचपदी उषाताई मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सरपंच राजेंद्र मोरे व सर्व सदस्य ...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त आठवड गावचे उपसरपंच बाबासाहेब मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते त्या पदासाठी दि.२२ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसरपंचपदी श्रीमती उषाताई मोहन मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष अधिकारी म्हणून सरपंच राजेंद्र मोरे यांनी काम पाहिले व सचिव म्हणून ग्रामसेवक कोतकर भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
याप्रसंगी सरपंच राजेंद्र मोरे,नूतन उपसरपंच उषाताई मोरे,माजी उपसरपंच बाबासाहेब मोरे,शरद मोरे,भाऊसाहेब लगड,मीराताई मोरे, सविता लगड आदी सदस्य यांसह ग्रामसेवक कोतकर भाऊसाहेब उपस्थित होते.
प्रतिक्रिया-
बाबासाहेब मोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल मी आमचे मार्गदर्शक उद्योजक विजयभाऊ मोरे ,सरपंच राजेंद्र मोरे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानते.उद्योजक विजयभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड गावचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.- श्रीमती.उषाताई मोहन मोरे, नूतन उपसरपंच



