अहमदनगर : (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रसार रोखण्यासाठी दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये कडक निर्बंध लागू केले होते.त्यात आता आणखी आठ गावांची भर पडली आहे .नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेर तालुक्यातील निघोज,वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर,आळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंपरी लौकी,अजमपुर,शेवगाव तालुक्यातील वदुले बु. अशी आठ गावे सिल करण्यात आले आहेत.
दिनांक 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान सदर गावात फक्त अत्यावश्यक सेवा खुल्या राहतील. नवरात्र,दसरा, दिवाळीच्या तोंडावर नगर जिल्ह्यात कोरोना व्याप्ती वाढत असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे.
सोहेल मनियार पत्रकार 9284856967




No comments:
Post a Comment