Tuesday, January 30, 2024

प्रजासत्ताक दिनी सीईओ आशिष येरेकर यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज 

अहमदनगर (सोहेल मनियार)

जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा विशेष कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

     अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मुंबईत झालेल्या, टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ४२ कि.मी. अंतर ५ तासात पूर्ण करण्याची कामगिरी केली. मुंबई मॅरेथॉन ची तयारी त्यांनी एक वर्षापासून चालवली होती अहमदनगर रनर्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी रोज सकाळी सहा वाजता धावण्याचा सराव अहमदनगरच्या भुईकोट किल्ला परिसरात केला. मुंबई मॅरेथॉन मध्ये जगभरातील ५९ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. अहमदनगर मधून शंभरहून अधिक स्पर्धक मुंबईला गेले होते.            अधिकाऱ्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना नेहमी ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशावेळी सकारात्मक राहून प्रश्नांची सोडवणूक करणे महत्त्वाचे असते यासाठी नियमित चालणे,व्यायाम करणे,योगासने करणे यामुळे शरीराची कार्यक्षमता ही वाढते आणि मनाला ऊर्जाही मिळते असा संदेश या टाटा मॅरेथॉनच्या निमित्ताने जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी व आपल्या शरीराचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना आशिष येरेकर साहेब प्रेरित करीत असतात. टाटा मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने अनेक अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सीईओ आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदी उपस्थित होते.


आपले दैनंदिन काम करून कर्तव्य बजावतानाच नियमित व्यायाम चालू ठेवून,पायी चालून इतरांनाही त्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल विखे यांनी येरेकर यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले. आशिष येरेकर यांनी अतिशय व्यस्त दिनक्रम असतानाही अनेक वर्षापासून नियमित व्यायामावर, फिजिकल फिटनेस वर भर दिलेला आहे हे विशेष.सीईओ येरेकर साहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अधिकारी,कर्मचारी शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायामाचे धडे गिरवत आहेत.

( पत्रकार सोहेल मनियार अहमदनगर )