हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र तपासणी करताना याप्रसंगी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले आदी... (छाया : सोहेल मनियार)
हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र तपासणी करताना याप्रसंगी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले आदी... (छाया : सोहेल मनियार)
गाव तेथे लसीकरण मोहिमेअंतर्गत कॅम्पचा शुभारंभ करताना जि.प.सदस्य संदेश कार्ले,राजेश परकाळे,विलास दवणे,प्रवीण कोकाटे आदी...(छाया:सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले,संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास दवने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते डॉ.मारूती ससे,दत्तात्रेय हजारे,मा.सरपंच दिपक चौधरी,अर्चनाताई चौधरी,उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे,सोसायटी चेअरमन राजेंद्र कोकाटे,व्हा.चेअरमन काशिनाथ बेल्हेकर,मा.उपसरपंच सुरेश देवकर,विश्वसागर कोकाटे,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे, राजेंद्र इंगळे,यशोदाताई कोकाटे,प्रशांत कांबळे,संदीप काळे, भाऊसाहेब वाडेकर,जयसिंग दळवी,ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे,सचिन नालकूल,सचिन ठोंबरे,गणेश वाडेकर,पोलिस पाटील संतोष खराडे,महादेव खडके,नानासाहेब कोकाटे,राजू तनपुरे,बालू बोरुडे तसेच CHO डॉ.शुभांगी सांगळे,आशा सायंबर मॅडम,ज्ञानदेव शेळके सर,विकास कोकाटे सर,राम कोकाटे सर,MPW पोपट लिपणे,आरोग्य सहा.सुनिल काळे,विकास वाघमारे,इंदू फुंदे सिस्टर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील येथे ध्वजारोहण करताना स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन ठकसेन मेहेत्रे...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भारतीय सैन्यदलातील सेवेची उज्ज्वल परंपरा असणार्या कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांनी आपल्या २८ वर्षे सैनिकी सेवेत आणि कठीण प्रसंगांचा सामना केला आहे .दि. १ ऑगस्ट १९४५ रोजी अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.पाच भावंडे आणि तीन बहिणी अशा कुटुंबात रोजच्या जगण्याची आंत असताना ते १० ऑगस्ट १९६५ रोजी भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर भरती झाले.
यशस्वी प्रशिक्षणानंतर फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री मध्ये त्यांनी त्यांचे सैनिक सेवा करत असतानाच ऑनररी कॅप्टन पदापर्यंत विविध परीक्षा व खडतर सैनिकी प्रशिक्षणातून मजल मारली. कॅप्टन मेहेत्रे यांचा बांगलादेश मुक्ती संग्राम मध्ये १९७१ चाली सहभाग होता. नंतरच्या काळात लेह-लडाख या पाकिस्तान सीमेवर दीर्घकाळ ते कार्यरत होते.खालिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात केलेले ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये देखील ते सहभागी होते.
त्याचबरोबर आयोध्या येथील बाबरी मशीद पाडली. तेव्हा देखील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पाठवलेल्या सैन्यामध्ये त्यांचा सहभाग होता. श्रीलंका सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल एलम या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी भारताची मदत घेतली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी श्रीलंकेमध्ये भारतीय शांती सेना पाठवली .या शांती सेनेमध्ये कॅप्टन मेहेत्रे यांनी सलग साडेतीन वर्ष कर्तव्य बजावले. या सर्व गोष्टींचा सन्मान म्हणून ठकसेन नाना मेहेत्रे यांना १५ ऑगस्ट १९९३ साली ऑनररी कॅप्टन हे पद बहाल करण्यात आले.आपली बहुतांश सेवा सीमेवर बजावणारे कॅप्टन ठकसेन नाना मेहेत्रे यांचा यथोचित सन्मान तत्कालीन महामहीम राष्ट्रपती यांनी केला आहे.आपल्या खडतर सैनिकी सेवेनंतर ते ३१ ऑगस्ट १९९३ रोजी सेवानिवृत्त झाले.
ठकसेन नाना मेहेत्रे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत चिचोंडी पाटील येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे,ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
सराईत गुन्हेगार हर्षल काळे यास अटक.नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप व पथकाची कामगिरी..(छाया: सोहेल मनियार)
अहमदनगर : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील जखणगाव मध्ये दि. 16 जुलै रोजी रात्री घरफोडी करण्यात आली होती. त्यावेळी बंद घरातून चार शेळ्या चोरून नेल्या होत्या.या चोरीबाबत नगर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०२१ भा. द. वि, क,४५७,३८०, प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच याविषयी गोपनीय माहिती वरून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथकासोबत कोम्बिंग ऑपरेशन राबवून नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथून सराईत गुन्हेगार हर्षल काळे यास अटक करण्यात आली आहे.
जखणगाव येथील शेळी चोरीतील आरोपी अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या सराईत गुन्हेगारावर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे ही दोन गुन्हे दाखल आहेत.बेलवंडी पोलिस स्टेशन व दौंड पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप,पो.स. ई.धनराज जारवाल, सफौ/ लबडे,इथापे,पो.हे.कॉ./ धुमाळ,लगड,सरोदे,पो.ना/ योगेश ठाणगे,पो.ना.धर्मराज दहीफळे, पो.कॉ. जयदत्त बांगर,श्याम घावटे, चापोहेकॉ/काळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली असून पुढील तपास सुरू आहे.
बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या २ हॉटेल वर छापे टाकून जप्त केलेला मुद्देमाल समवेत स.पो.नि. राजेंद्र सानप व नगर तालुका पोलिसांचे पथक (छाया : सोहेल मनियार)
बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल जप्त करून संबंधित दारू विक्री करणाऱ्यांवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल सरोदे,पोलिस कॉन्स्टेबल लगड आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
चोरीस गेलेला साडे तीन तोळ्याचा राणीहार लांडगे कुटुंबाला परत करताना स.पो.नि. राजेंद्र सानप...(छाया : सोहेल मनियार)
अहमदनगर : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेला राणीहार लांडगे कुटुंबाला नगर तालुका पोलिसांनी मिळवून दिला.चोरीस गेलेला हार पुन्हा मिळाले लांडगे कुटुंबाने विशेषत सपोनि राजेंद्र सानप यांसह सर्व पोलीस कर्मचार्यांचे आभार मानले. नगर तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे नगर तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की शिवाजी मारुती लांडगे राहणार पिंपळगाव कौडा ता. नगर यांच्या घरातून घरफोडी करून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा साडे तीन तोळ्याचा राणीहार चोरट्यांनी चोरून नेला होता.नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून चोरीस गेलेला राणीहार चोरट्यांकडून मिळवला. याबाबत मंगळवार दि.८ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नगर तालुका पोलिसांनी फिर्यादी लांडगे यांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान सपत्नी लांडगे शेतकरी कुटुंबाला सोन्याचा राणीहार परत घेताना त्यांना आनंदाश्रू आले.मोलमजुरी करून या शेतकरी दांपत्याने राणी हार बनवला होता.परंतु राणी हार चोरीस गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.लांडगे कुटुंबाने विशेषत सपोनि राजेंद्र सानप यांच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे संपूर्ण सुविधा मिळणे बाबत लेखी आश्वासनानंतर डॉ.एस.एन. नेवसे व माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडताना बबनराव शेळके समवेत उपस्थित डॉ.सोनाली बांगर आदी...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बबनराव शेळके यांनी भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सिव्हिल सर्जन,सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे, गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना तपासणीसाठी विविध मशिनरी मिळाव्यात याकरिता ९ ऑगस्ट २०२१ क्रांती दिनाच्या दिवशी , ग्रामपंचायत चिचोंडी पाटील समोर सकाळी ११वाजता.बेमुदत उपोषणास बसले होते यावेळी सिव्हिल हॉस्पिटल चे वर्ग एकचे संपर्क अधिकारी डॉ. सोनाली बांगर,ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील चे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एन.नेवसे व सचिन तोडमल हे उपोषणा पासून बबनराव शेळके यांना परावृत्त करण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी तीन महिन्याच्या आत मध्ये काही नवीन स्टाफ व मशिनरी यांची उपलब्धता करून दिली जाईल असे लेखी पत्र बबनराव शेळके जिल्हा चिटणीस भाजपा किसान मोर्चा अहमदनगर यांना दिले .बबनराव शेळके यांसह आबासाहेब वाडेकर,संभाजी खडके,महादेव बोरूडे,सतीश शेळके ,ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे ,महादेव खडके, संतोष शेळके रघुनाथ कोकाटे प्रकाश तनपुरे दत्तात्रेय शेळके,सचिन इंगळे उपोषणास बसले होते. या उपोषणास माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे,हरिओम ग्रामविकास पॅनल च्या वतीने माजी उपसरपंच शरद पवार, चंद्रकांत पवार,शिवसेना नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती इंजि.प्रवीण कोकाटे,शिवसेना नेते डॉ.मारुती ससे,ग्रा.प.सदस्य विश्वसागर कोकाटे,दत्ता बडे, सचिन ठोंबरे,ग्रा.प.सदस्य प्रशांत कांबळे,सुधीर कोकाटे, यांनी उपोषणास पाठिंबा दिला तर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रीरंग कोकाटे सर तर कॉम्रेड भगवान कोकाटे यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. उपोषण प्रसंगी शेळके म्हणाले की
ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे छोटे-मोठे ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर नाहीत,गोर -गरीब,सर्वसामान्य,रुग्णांची तपासणी करण्यासाठी मशिनरी नाहीत,गोळ्या -औषधे, सलाईन आणि रक्त चेक करण्या व्यतिरिक्त या
भव्य- दिव्य,अवाढव्य, हॉस्पिटलमध्ये कुठल्याच सुविधा मिळत नाहीत,या ठिकाणी पीएम केले जात नाही,डिलिव्हरी होत नाहीत,या सर्व सुविधा आपल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हाव्यात, म्हणजे शासनाने गोरगरीब जनतेसाठी बांधलेले हॉस्पिटलचा चांगल्या पद्धतीने रुग्णांना लाभ घेता येईल आणि शासनाचे ध्येय पूर्ण होईल.या सर्व सुविधा गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना मिळाव्यात याकरिता भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने हे उपोषण करावे लागले.अशी प्रतिक्रिया बबनराव शेळके यांनी दिली.याप्रसंगी अण्णा कोकाटे, विजय कोकाटे,सय्यद असद अशरफ,दीपक कांबळे,जयसिंग दळवी,राजू तनपुरे,अशोक बी. कोकाटे,दत्तात्रय कोकाटे, ग्रामसेवक देविदास मोरे ,अशोक फसले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिचोंडी पाटील ता. नगर येथे बलभीम जाधव यांची नेत्र तपासणी करून शिबिराचे उद्घाटन करताना हरिभाऊ कर्डिले, बबन शेळके आदी...( छाया: सोहेल मनियार )
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बबनराव शेळके मित्रमंडळ आयोजित २३४ वे के.के.आय (बुद्रानी) हॉस्पिटल पुणे व भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.६/८/२०२१ रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगर तालुका मार्केट कमिटीचे संचालक हरिभाऊ कर्डिले साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य पती ज्ञानेश्वर ठोंबरे होते.कोरोना महामारी सारख्या रोगाला न जुमानता, सर्वसामान्य गोरगरीब नेत्रहीन वयोवृद्धांसाठी जिवाची पर्वा न करता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करून या वृद्धांना एक प्रकारे नेत्र, दृष्टी देण्याचे कार्य नेत्रसेवक बबनराव शेळके यांनी केले आहे .
आजच्या युगात काही मुलं स्वतःच्या आई वडीलांना सांभाळत नाहीत,एवढी काळजी आज शेळके यांनी घेतली आहे.त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे उद्गार उद्घाटन प्रसंगी हरिभाऊ कर्डिले यांनी काढले, या शिबिराचा नगर, आष्टी, पाथर्डी तालुक्यातील ७० नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. बलभीम बाबुराव जाधव या ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यातील ३५नेत्र रुग्णांवर पुण्याच्या के,के हॉस्पिटल येथे नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे.शिबिर यशस्वितेसाठी शिबिर आयोजक बबनराव शेळके,अनिल शेलार, पत्रकार सोहेल मनियार, मुस्तफा मनियार सर, अब्रार सय्यद,दत्तात्रय कोकाटे,बलभीम जाधव,अनिल बोरुडे,आबासाहेब वाडेकर,गणेश इंगळे, संभाजी खडके, प्रकाश तनपुरे ,मीरा पठारे,मनीषा कोरडे ,आशिद शेख तसेच संगम तरुण मंडळ यांनी सहकार्य केले.