Thursday, August 12, 2021

नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांची कौतुकास्पद कामगिरी ; चोरीस गेलेला राणीहार लांडगे कुटुंबाला मिळाला परत

चोरीस गेलेला साडे तीन तोळ्याचा राणीहार लांडगे कुटुंबाला परत करताना स.पो.नि. राजेंद्र सानप...(छाया : सोहेल मनियार)

अहमदनगर : (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेला राणीहार लांडगे कुटुंबाला नगर तालुका पोलिसांनी मिळवून दिला.चोरीस गेलेला हार पुन्हा मिळाले लांडगे कुटुंबाने विशेषत सपोनि राजेंद्र सानप यांसह सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे आभार मानले. नगर तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे नगर तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की शिवाजी मारुती लांडगे राहणार पिंपळगाव कौडा ता. नगर यांच्या घरातून घरफोडी करून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा साडे तीन तोळ्याचा राणीहार चोरट्यांनी चोरून नेला होता.नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून चोरीस गेलेला राणीहार चोरट्यांकडून मिळवला. याबाबत मंगळवार दि.८ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नगर तालुका पोलिसांनी फिर्यादी लांडगे यांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान सपत्नी लांडगे शेतकरी कुटुंबाला सोन्याचा राणीहार परत घेताना त्यांना आनंदाश्रू आले.मोलमजुरी करून या शेतकरी दांपत्याने राणी हार बनवला होता.परंतु राणी हार चोरीस गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.लांडगे कुटुंबाने विशेषत सपोनि राजेंद्र सानप यांच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment