Monday, August 9, 2021

लेखी आश्‍वासनानंतर शेळके यांचे उपोषण मागे

 

ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे संपूर्ण सुविधा मिळणे बाबत लेखी आश्‍वासनानंतर डॉ.एस.एन. नेवसे व माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडताना बबनराव शेळके समवेत उपस्थित डॉ.सोनाली बांगर आदी...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बबनराव शेळके यांनी भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सिव्हिल सर्जन,सिव्हिल  हॉस्पिटल अहमदनगर यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे, गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना तपासणीसाठी विविध मशिनरी मिळाव्यात याकरिता ९ ऑगस्ट २०२१ क्रांती दिनाच्या दिवशी , ग्रामपंचायत चिचोंडी पाटील समोर सकाळी  ११वाजता.बेमुदत उपोषणास बसले होते यावेळी सिव्हिल हॉस्पिटल चे वर्ग एकचे संपर्क अधिकारी डॉ. सोनाली बांगर,ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील चे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एन.नेवसे व सचिन तोडमल हे उपोषणा पासून बबनराव शेळके यांना परावृत्त करण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी तीन महिन्याच्या आत मध्ये काही नवीन स्टाफ व मशिनरी यांची उपलब्धता करून दिली जाईल असे लेखी पत्र बबनराव शेळके जिल्हा चिटणीस भाजपा किसान मोर्चा अहमदनगर यांना दिले .बबनराव शेळके यांसह आबासाहेब वाडेकर,संभाजी खडके,महादेव बोरूडे,सतीश शेळके ,ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे ,महादेव खडके, संतोष शेळके रघुनाथ कोकाटे प्रकाश तनपुरे दत्तात्रेय शेळके,सचिन इंगळे उपोषणास बसले होते. या उपोषणास माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे,हरिओम ग्रामविकास पॅनल च्या वतीने माजी उपसरपंच शरद पवार, चंद्रकांत पवार,शिवसेना नगर तालुक्याच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती इंजि.प्रवीण कोकाटे,शिवसेना नेते डॉ.मारुती ससे,ग्रा.प.सदस्य विश्वसागर कोकाटे,दत्ता बडे, सचिन ठोंबरे,ग्रा.प.सदस्य प्रशांत कांबळे,सुधीर कोकाटे, यांनी उपोषणास पाठिंबा दिला तर  ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रीरंग कोकाटे सर तर कॉम्रेड भगवान कोकाटे यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. उपोषण  प्रसंगी शेळके म्हणाले की

 ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे छोटे-मोठे ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर नाहीत,गोर -गरीब,सर्वसामान्य,रुग्णांची तपासणी  करण्यासाठी मशिनरी नाहीत,गोळ्या -औषधे, सलाईन आणि रक्त चेक करण्या व्यतिरिक्त या

 भव्य- दिव्य,अवाढव्य, हॉस्पिटलमध्ये कुठल्याच सुविधा मिळत नाहीत,या ठिकाणी पीएम केले जात नाही,डिलिव्हरी होत नाहीत,या सर्व सुविधा आपल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हाव्यात, म्हणजे शासनाने गोरगरीब जनतेसाठी बांधलेले हॉस्पिटलचा चांगल्या पद्धतीने रुग्णांना लाभ घेता येईल आणि शासनाचे ध्येय पूर्ण होईल.या सर्व सुविधा गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना मिळाव्यात याकरिता भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने हे उपोषण करावे लागले.अशी प्रतिक्रिया बबनराव शेळके यांनी दिली.याप्रसंगी अण्णा कोकाटे, विजय कोकाटे,सय्यद असद अशरफ,दीपक कांबळे,जयसिंग दळवी,राजू तनपुरे,अशोक बी. कोकाटे,दत्तात्रय कोकाटे, ग्रामसेवक देविदास मोरे ,अशोक फसले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment