Wednesday, November 24, 2021

कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 


 गजानन कृषी सेवा केंद्र व स्मार्टकेम टेक्नॉलॉजी (महाधन) आयोजित कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कांदा तज्ञ बिपिन चोरगे समवेत सचिन नालकुल व शेतकरी बांधव...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लि. पुणे (महाधन) व नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील गजानन कृषी सेवा केंद्र आयोजित कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झोनल मार्केटिंग मॅनेजर (महाधन) कांदा तज्ञ बिपिन चोरगे यांनी शेतकऱ्यांना कांदा पिका विषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या.

कांदा पिक लागवडीची योग्य पद्धत, योग्य प्रमाणावर खते, पाण्याचे उत्तम व्यवस्थापन,कांदाचाळी मध्ये  कशाप्रकारे साठवावा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी महाधन कंपनीचे क्रॉपटेक हा नवीन खताचा प्रकार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याची माहिती चोरगे यांनी दिली. कांदा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागणारी सर्व खते गजानन कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सचिन नालकुल यांनी दिली.शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. कांदा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना सुचविल्या.पिकास पाणी देण्याची योग्य वेळ,खत देण्याची योग्य वेळ,कांदा पिकास किती प्रमाणात खते द्यावीत, कोणती खते द्यावीत,पिकाचे उत्पादन घेताना कोणत्या चुका करू नयेत,कांदा सडू नये त्याबद्दल करावयाचे उपाय योजना याबद्दल परिसंवाद कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन केले. या कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमास शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर होते. 

याप्रसंगी पंचायत समितीचे मा. सभापती प्रवीण कोकाटे,एरिया सेल्स मॅनेजर राकेश पाटील,माजी वनाधिकारी किसन आगलावे, उद्योजक सचिन नालकुल,मार्केट कमिटीचे माजी संचालक बाजीराव हजारे,चंद्रकांत पवार,भातोडीचे मा.सरपंच राजूभाई पटेल, अजय हजारे,अशोक तरटे, मा.सरपंच भरत लबडे,दत्ता मिसाळ यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी उपस्थित राहिले त्याबद्दल गजानन कृषी सेवा केंद्राच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक सचिन नालकुल यांनी आभार मानले. कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सरोदे यांनी पीक पाहणी व शासकीय योजनांविषयी माहिती दिली.




Tuesday, November 16, 2021

तब्बल दीड वर्षानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

 

नगर तालुक्यातील भातोडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करताना मा.उपसरपंच राजूभाई पटेल, उपस्थित सर्व मान्यवर... (छाया:सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)


कोरोना महामारी मुळे तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची घंटा दीड वर्षानंतर वाजली. दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यामुळे मुले,पालक,शिक्षक सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ,मास्क ,चाँकलेट देऊन शाळेच्या प्रवेशद्वार वर जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे,मा.उपसरपंच राजुभाई पटेल,मा.ग्रा.प.सदस्य राजेंद्र काळे,ग्रामविकास अधिकारी लोखडे,मुख्याध्यापक नरवडे सर,मा.दातीर मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष पापामिया पटेल,मा. ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, डॉ.डमाळे, तलाठी झाबरे,जावळे मॅडम,पटेल मॅडम, कदम मॅडम,कचरे मॅडम,पंडीत मॅडम,शिंदे मॅडम,कदम मॅडम ,बनसोडे मॅडम,शिवाजी लबडे, शिंदे सर,म्हस्के सर,बोरुडे सर,जालिंदर शिंदे यांसह भातोडी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.




Monday, November 8, 2021

जिल्हा शल्य चिकित्सकासह 4 जण निलंबित व दोन नर्स बडतर्फ -आरोग्यमंत्री राजेश टोपे

 


मुंबई प्रतिनिधी : (सोहेल मनियार)


अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागातील अग्निकांड प्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढाकणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे तर स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चंदा अनंत त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग लागलेल्या भीषण आगीत 11 त्यांना आपला जीव गमवावा लागला.या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली.या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत ताशेर ओढले आहेत.या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपये व राज्य आपत्ती निधीमधून दोन लाख रुपये अशी सात लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पत्रकार सोहेल मनियार

 9284856967