Thursday, October 19, 2023

शिवाजी कर्डिले यांची मोबाईलवर लिंक पाठवून लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक

लोकमन महाराष्ट्र न्यूज : पत्रकार सोहेल मनियार 

शिवाजी कर्डिले यांची मोबाईलवर लिंक पाठवून बँक खात्याचा प्रॉब्लेम ऑनलाईन सोडविण्याच्या बहाण्याने, लिंक वर भरलेल्या माहितीच्या आधारे, बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने २ लाख ६१ हजार ६४८ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 जखणगाव तालुका नगर येथील राहणारे  शिवाजी भिकाजी कर्डिले वय वर्ष ४३ असे फसवणूक झालेल्या फिर्यादी व्यवसायिकाचे नाव आहे. फसवणूक झालेल्या शिवाजी भिकाजी  कर्डिले यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय असून त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्यांना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून मी आय सी आय सी आय बँकेतून बोलत आहे तुमच्या बँक खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तो ऑनलाइन सोडविण्यासाठी तुमच्या व्हाट्सअप वर एक लिंक पाठवतो त्यात तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा असे सांगितले. फिर्यादी कर्डिले यांचा त्या व्यक्तीवर विश्वास बसल्याने त्यांनी लिंक ओपन करून सर्व माहिती अचूक भरली.त्यानंतर बँकेच्या डेबिट कार्डचा फोटोही पाठवला त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने लिंक वर भरलेल्या माहितीचा व डेबिट कार्ड माहितीचा गैरवापर करत कर्डिले यांच्या बँक खात्यातून लागोपाठ चार वेळा विविध रकमा काढून घेतल्या आहेत. एकूण २लाख ६१हजार ६८४ रुपये शिवाजी कर्डिले यांच्या खात्यातून काढले गेल्याचे मेसेज कर्डिले यांना आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तीने मोबाईल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कर्डिले यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

 कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भा.द.वि.  कलम  ४२०,४१७,४१९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून सदरील गुन्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967

तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत ; जेसीबीने फुलांची उधळण

चिचोंडी पाटील : सोहेल मनियार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले . 

पाचवी माळ ला चिचोंडी पाटील येथे आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे चिचोंडी पाटील गावात भक्तिमय वातावरणात प्राचीन परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या दरोदरी दर्शन व स्वागत झाले.

गावात वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी दाखल झाली. गावातील अबालवृद्धांनी  पालखीचे दर्शन घेतले.

पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जगदंबा माता ट्रस्ट , गावातील सर्वच पदाधिकारी, ग्रामस्थ आदींनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

पलंगे बंधू व सेवेकरी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.

भक्तिमय वातावरणात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ यावेळी गावातील सर्व देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरात साठी संपर्क

पत्रकार सोहेल मनियार 9284856967

तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत

लोकमन महाराष्ट्र न्यूज 

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले . 

पाचवी माळ ला चिचोंडी पाटील येथे आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे चिचोंडी पाटील गावात भक्तिमय वातावरणात प्राचीन परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या दरोदरी दर्शन व स्वागत झाले.

गावात वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी दाखल झाली. गावातील अबालवृद्धांनी  पालखीचे दर्शन घेतले.

पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जगदंबा माता ट्रस्ट, गावातील सर्वच पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

पलंगे बंधू व सेवेकरी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.

📌 बातम्या व जाहिरात साठी संपर्क
💥 पत्रकार सोहेल मनियार 9284856967

भक्तिमय वातावरणात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ

 यावेळी गावातील सर्व देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिचोंडीत तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत

Saturday, October 14, 2023

‘त्या’ रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेर्‍यात

लोकमन महाराष्ट्र न्यूज : सोहेल मनियार 

पुणे : ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शुक्रवारी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची समितीने कसून चौकशी केली. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने मागितली आहे.

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. समितीच्या सदस्यपदी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार हे आहेत.

समितीने शुक्रवारी सकाळीच ससूनमध्ये हजेरी लावली. समितीने अधिष्ठाता कार्यालयात चौकशी सुरू केली. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची समितीने चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजीत धिवारे, कैदी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कैदी कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि कैदी रुग्ण समिती अध्यक्षांना याप्रकरणी लेखी अहवाल देण्यास समितीने सांगितले आहे. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैदी रुग्णांचा अहवाल समितीने मागितला आहे. त्यात कैदी रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयात दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे डॉक्टर आदी माहितीचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

📌 ससूनच्या चौकशीचा फेरा -

अधिष्ठात्यांपासून शिपायापर्यंत चौकशी

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागविला

रुग्णालयात २०२० पासून आतापर्यंत दाखल कैदी रुग्णांचे अहवाल

कैदी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी

कैदी रुग्ण समितीच्या नियुक्तीबाबतही विचारणा

बातम्या व जाहिरात साठी संपर्क 9284856967

Monday, October 9, 2023

सरपंच पदी प्रवीण खांदवे यांची बिनविरोध निवड

लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी): सोहेल मनियार

नगर तालुक्यातील सांडवे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रवीण उर्फ बापूसाहेब तात्याराम खांदवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सरपंच मंगल निकड यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.

सरपंच पदासाठी प्रवीण ऊर्फ बापूसाहेब खांदवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी बाळासाहेब नांदूरकर यांनी प्रविण खांदवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीसाठी ग्रामविकास अधिकारी सागर खळेकर यांनी सहकार्य केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य परशुराम घोलप, त्रिंबक आरु, चंद्रकला कराड, निलोफर शेख उपस्थित होते. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सांडवे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रवीण उर्फ बापूसाहेब खांदवे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर सांडवे सहकारी सोसायटी चेअरमन विष्णू खांदवे गुरुजी यांच्यासोबत जाऊन त्यांनी सरपंचपद मिळवले.

सरपंच पदी निवड झाल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार , मा. सरपंच अमोल निक्रड आदी मान्यवरांनी प्रवीण खांदवे यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बातम्या व जाहिरात साठी संपर्क

पत्रकार सोहेल मनियार  9284856967

Sunday, October 1, 2023

साई इलेक्ट्रिकल्स चा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते शुभारंभ

चिचोंडी पाटील - सोहेल मनियार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे प्रसाद चोभे व हनुमंत चोभे यांच्या साई इलेक्ट्रिकल्स या नवीन दालनाचा शुभारंभ करण्यात आला. 

इलेक्ट्रिकल्स मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य योग्य दरात उपलब्ध आहे.वायर, बल्ब, लाईट फिटिंग साठी लागणारे सर्व सामान मिळेल.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, साजन पाचपुते, पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार, आठवडे गावचे मा.सरपंच राजेंद्र मोरे, मा. ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, खडके बाबासाहेब, प्रवीण चोभे,हनुमंत चोभे ,भाऊसाहेब लगड, दत्तात्रय चोभे , विष्णू लगड , सागर रसाळ,  बापू मोरे, पोपट मोरे  यांसह चिचोंडी पाटील , आठवड पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई इलेक्ट्रिकल्स या नव्या दालनाच्या शुभारंभ निमित्त प्रसाद चोभे व हनुमंत चोभे यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या व जाहिरात साठी संपर्क - 

पत्रकार सोहेल मनियार 9284856967