Thursday, October 19, 2023

तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत

लोकमन महाराष्ट्र न्यूज 

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार



नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले . 


पाचवी माळ ला चिचोंडी पाटील येथे आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे चिचोंडी पाटील गावात भक्तिमय वातावरणात प्राचीन परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या दरोदरी दर्शन व स्वागत झाले.


गावात वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी दाखल झाली. गावातील अबालवृद्धांनी  पालखीचे दर्शन घेतले.


पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जगदंबा माता ट्रस्ट, गावातील सर्वच पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.


पलंगे बंधू व सेवेकरी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.

📌 बातम्या व जाहिरात साठी संपर्क
💥 पत्रकार सोहेल मनियार 9284856967



भक्तिमय वातावरणात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ

 यावेळी गावातील सर्व देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment