नगर तालुक्यातील सांडवे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रवीण उर्फ बापूसाहेब तात्याराम खांदवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच मंगल निकड यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.
सरपंच पदासाठी प्रवीण ऊर्फ बापूसाहेब खांदवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी बाळासाहेब नांदूरकर यांनी प्रविण खांदवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीसाठी ग्रामविकास अधिकारी सागर खळेकर यांनी सहकार्य केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य परशुराम घोलप, त्रिंबक आरु, चंद्रकला कराड, निलोफर शेख उपस्थित होते. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सांडवे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रवीण उर्फ बापूसाहेब खांदवे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर सांडवे सहकारी सोसायटी चेअरमन विष्णू खांदवे गुरुजी यांच्यासोबत जाऊन त्यांनी सरपंचपद मिळवले.
सरपंच पदी निवड झाल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार , मा. सरपंच अमोल निक्रड आदी मान्यवरांनी प्रवीण खांदवे यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
बातम्या व जाहिरात साठी संपर्क
पत्रकार सोहेल मनियार 9284856967


No comments:
Post a Comment