लोकमन महाराष्ट्र न्यूज
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले .
पाचवी माळ ला चिचोंडी पाटील येथे आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे चिचोंडी पाटील गावात भक्तिमय वातावरणात प्राचीन परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या दरोदरी दर्शन व स्वागत झाले.
गावात वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी दाखल झाली. गावातील अबालवृद्धांनी पालखीचे दर्शन घेतले.
पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. जगदंबा माता ट्रस्ट, गावातील सर्वच पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
पलंगे बंधू व सेवेकरी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
📌 बातम्या व जाहिरात साठी संपर्क







No comments:
Post a Comment