बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या २ हॉटेल वर छापे टाकून जप्त केलेला मुद्देमाल समवेत स.पो.नि. राजेंद्र सानप व नगर तालुका पोलिसांचे पथक (छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल जप्त करून संबंधित दारू विक्री करणाऱ्यांवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल सरोदे,पोलिस कॉन्स्टेबल लगड आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की दि.10 ऑगस्टला नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारातील हॉटेल पाटील च्या पाठीमागे संतोष बबन ठोंबरे हा विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला.पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खिळे यांच्या फिर्यादीवरून तर चिचोंडी पाटील शिवार हॉटेल साई गणेश च्या पाठीमागे बाळासाहेब मंजाबापू तनपुरे हा देशी-विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला.देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या 2 हॉटेलवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १३६२४ रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून संबंधित दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विशाल टाकले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




No comments:
Post a Comment