हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र तपासणी करताना याप्रसंगी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,माजी सभापती हरिभाऊ कर्डिले आदी... (छाया : सोहेल मनियार)
हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ दरेवाडी गट आयोजित के.के. आय.बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमाने २३५ वे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी बालयोगी अमोल महाराज वाकोडीकर होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की , कोरोणा काळात सर्वत्र रुग्ण संख्या वाढत असल्याने ज्यांना मोतीबिंदू,डोळ्यांचे आजार आहेत अशा रुग्णांनी कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रुग्णालयात जाणे टाळले.नेत्र रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर चे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.हरिभाऊ कर्डिले हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी
केले.
कोरोना व्हायरस महामारी मुळे गेल्या २ वर्षांपासून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना डोळ्यांचे आजार,तिरळेपणा,लासुर, मोतीबिंदू पडदा या सारख्या आजाराने त्रस्त झाले असून मोतीबिंदू मुळे काहींना नेत्र गमावण्याची वेळ आली असल्याने त्यांना पुन्हा दृष्टी मिळावी.वाढदिवसानिमित्त परिसरातील रुग्णांची सेवा करता यावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले असल्याचे माजी सभापती हरिभाऊ लक्ष्मण कर्डिले यांनी सांगितले.
के.के.आय.बुधरानी हॉस्पिटल पुणे यांचे डॉ.गिरीश पाटील,माया अल्हाट,मीरा पठारे,मनीषा कोरडे आदींनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गोरगरीब,सर्वसामान्य रुग्णांनी हरिभाऊ कर्डिले यांना भरभरून आशीर्वाद दिले.
शिबिर याप्रसंगी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिलाष घिगे,उपसभापती संतोष म्हस्के,दरेवाडीच्या सरपंच स्वातीताई बेरड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव भालसिंग,उद्धवराव कांबळे,बबन आव्हाड, बाबासाहेब खर्से, संतोष कुलट,ऊकडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे,बालयोगी अमोल महाराज वाकोडीकर,दशमिगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे,दरेवाडी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ ससे, मच्छिंद्रभाऊ बेरड, वाळुंज ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड,बाळासाहेब निमसे,नेत्रसेवक बबनराव शेळके,भाजप किसान मोर्चा प्रदेश सदस्य रमेश पिंपळे, दशमिगव्हणचे माजी सरपंच भाऊसाहेब काळे, निंबोडी चे माजी सरपंच दत्तात्रय पोकळे, नारायणडोह चे सरपंच पोपट साठे,नारायणडोह सेवा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र साठे,मांडवा सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर निमसे,वाकोडी ग्रामपंचायत सरपंच मंगल ताई गवळी, निवृत्ती भाऊ गवळी, वाकोडीचे उपसरपंच आदिनाथ मोढवे,वाकोडी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मुरलीधर गोरे, वाकडी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन नाथा भाऊ कराळे, वाकोडी ग्रामपंचायत सदस्य बच्चू मोढवे, योगेश कर्डिले, शनेश्वर पवार, वाकोडी सेवा सोसायटीचे सदस्य मुरलीधर मोढवे, न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक आबासाहेब तोडमल,अंकुश सांगळे,वाकोडी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊरामा पवार,रावसाहेब मोढवे,जगन्नाथ मोढवे,अंकुश गवळी,गणेश तोडमल,अशोक कर्डीले आदी उपस्थित होते.
शिबिरास परिसरातील उपस्थित रुग्ण, सर्व ग्रामस्थ सर्व आजी- माजी सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक,सर्व डॉक्टर्स,सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळाने आभार मानले.




No comments:
Post a Comment