Wednesday, October 20, 2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटप

 

दशमीगव्हाण येथे शेतकऱ्यांना हरभरा बियाणाचे वाटप करताना मंडल कृषी अधिकारी बोरुडे, कृषी सहाय्यक सरोदे,बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, सरपंच संगीता कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे आदी उपस्थित...(छाया: सोहेल मनियार)


चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य विकास कार्यक्रम नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे घेण्यात आला.दशमी गव्हाण येथील दोन शेतकरी गटांना नगर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत हरभरा बियाणे वाटप करण्यात आले.चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाणी चांगले असल्यामुळे हमखास यावर्षी पिकांचे उत्पादन ही भरघोस निघणार आहे.

कृषी मंडळ अधिकारी बोरुडे यांनी बीज प्रक्रिया कशी करायची याचे मार्गदर्शन केले. हरभऱ्याची लागवड,खते,पाणी पुरवठा, कीटकनाशके याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे पिकांसंबंधी असलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

हरभरा बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संगीता उद्धव कांबळे यांनी आभार मानले.

यावेळी बाजार समितीचे संचालक उद्धवराव कांबळे,सरपंच संगीता कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे,कृषी मंडल अधिकारी बोरुडे,कृषी सहाय्यक सरोदे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब काळे,विजय काळे,भाऊसाहेब काळे,लक्ष्मण काळे,पोलीस पाटील जयसिंग काळे,सुधीर सर, सुरेश काळे,अरुण काळे,रामेश्वर काळे,शिवाजी काळे,राजेंद्र काळे,किरण काळे,गंगाधर काळे, बाबासाहेब मेजर,काशिनाथ मेजर,बहिरू काळे,इरफान शेख, बाळासाहेब कांबळे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment