Wednesday, July 28, 2021

डिझेल कारऐवढी झाली मागणी...दिवसेंदिवस वेगाने वाढतेय देशातल्या स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्हीची 'डिमांड'

 

पेट्रोल डिझेल या पारंपारिक इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असताना आता वाहनचालकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत असल्याचं दिसतंय. 
मुंबई (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

कारण, देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्सची (Tata Motors) इलेक्ट्रिक एसयूव्ही निक्सॉन ईवीची (Nexon EV) मागणी गेल्या काही दिवसांत इतकी वाढलीये की आता या कारच्या डिझेल व्हेरिअंट इतकीच इलेक्ट्रिक एसयूव्हीलाही मागणी मिळत असल्याचं समोर आलं आहे. टाटा निक्सॉन डिझेल व्हेरिअंट इतकीच आता Nexon EV ची मागणी झाल्याचा दावा टाटा मोटर्सने केला आहे. जुलै २०२१ मध्ये Nexon EV आणि निक्सॉन डिझेलसाठी ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डरचं प्रमाण सारखंच असल्याचं कंपनीने सांगितलं. टाटा मोटर्सचे मुख्य वित्तीय अधिकारी पी.बी.बालाजी यांनी याबाबत माध्यमांना सोमवारी माहिती दिली. जुलै २०२१ मध्ये निक्सॉन ईवीसाठी आणि डिझेल निक्सॉनसाठी ग्राहकांकडून समान प्रमाणात ऑर्डर आल्या असं बालाजी यांनी सांगितलं. "FAME-II योजना आणि राज्य सरकारांकडून दिली जात असलेली सब्सिडी या प्रमुख दोन कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे.


No comments:

Post a Comment