हा अपघात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.धडक देऊन वाहन अपघात स्थळी न थांबवता वाहनचालकाने अपघाताचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहन पळवून नेले.
नगर जामखेड राज्यमार्गावर चिचोंडी पाटील येथे वाहनाच्या अपघातात घोड्याचा मृत्यू...(छाया : सोहेल मनियार)
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावामध्ये नगर जामखेड राज्यमार्गावर वाहनाच्या धडकेने घोड्याचा मृत्यू झाला.हा अपघात दिनांक ८.७.२०२१ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला.अहमदनगर वरून जामखेड कडे जाणाऱ्या MH12 KQ5786 या वाहनाने धडक दिली असे प्रथमदर्शनी दिसते कारण या वाहनाची घोड्याला धडक दिल्यानंतर याठिकाणी पडलेली नंबर प्लेट सापडली.धडक देऊन वाहन अपघात स्थळी न थांबवता वाहन चालकाने,अपघाताचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन वेगाने चालून जामखेड रोड कडे पसार झाली अशी माहिती नंदा गोरख साळुंखे यांनी दिली.श्रीमती नंदा गोरख साळुंखे वय ६५ या आपल्या परिवारासह गावोगावी फिरून कुराड,विळे, कोयते,शेती अवजारे बनवण्याचा व शेवटण्याचा व्यवसाय करतात.
लोणी सय्यद मीर तालुका आष्टी जिल्हा बीड येथून हे कुटुंब व्यवसायानिमित्त चिचोंडी पाटील येथे काही दिवसापूर्वी आले होते. कोरोना महामारी च्या संकटामुळे आधीच हाताला काम नाही, पोटभर खायला नाही, रोजगार नाही.धंदा नसल्याने आर्थिक नियोजन ढासळलेले त्यातच घोड्याचा मृत्यू झाल्याने आता व्यवसायासाठी गावोगावी जायचे कसे असा प्रश्न या घिसाडी व्यवसाय करणाऱ्या जमातीच्या कुटुंबावर आला.एका गरीब हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबावर उपजीविकेचे साधन असलेल्या घोड्याच्या निधनाने उपासमारीची वेळ आली आहे.



No comments:
Post a Comment